शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मीरा गेली, नकोशींचे काय?

By किरण अग्रवाल | Updated: January 3, 2019 08:05 IST

समाजात रुजलेल्या पारंपरिक गैरसमजांमधून अजूनही लोक बाहेर पडलेले नाहीत, स्री-पुरुष समानतेचा कितीही जागर घडून येत असला तरी मुलगा तो मुलगाच, अशी धारणाही त्यापैकीच एक.

किरण अग्रवालसमाजात रुजलेल्या पारंपरिक गैरसमजांमधून अजूनही लोक बाहेर पडलेले नाहीत, स्री-पुरुष समानतेचा कितीही जागर घडून येत असला तरी मुलगा तो मुलगाच, अशी धारणाही त्यापैकीच एक. त्यामुळे मुलगा हवा या अट्टाहासापोटी दहाव्यांदा बाळंतपणास सामोरी गेलेल्या व त्यात जीव गमवावा लागलेल्या भगिनीबद्दल हळहळ व्यक्त होत असताना आता तिच्या पाठीशी असलेल्या मुलींचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.माता-पित्यांना टाकून देणाऱ्या अगर वृद्धाश्रमाच्या दारी नेऊन पोहचविणाऱ्या मुलांच्या कहाण्या कमी नाहीत. त्याउलट माहेर सोडून सासरी गेलेल्या मुलींनी आपल्या वृद्ध आई-वडिलांचा मनोभावे सांभाळ व अंतिमत: क्रियाकर्मही केल्याची अनेक उदाहरणे अवतीभोवती आहेत. असे असतानाही वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही मानसिकता पूर्णत: संपुष्टात येऊ शकलेली नाही. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये घडलेल्या एका प्रकाराने तर यासंदर्भातील समाजातले मागासपणच ढळढळीतपणे समोर आणून ठेवले आहे. मीरा एखंडेनामक भगिनी वयाच्या ३८व्या वर्षी तब्बल दहाव्या बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. अर्थातच, सात मुली असलेल्या व दोनदा गर्भपाताला सामोरे जावे लागलेल्या या मातेला मुलगा हवा होता. परंतु या बाळंतपणात तिचा जीव गेला. येथे या मातेचीच तशी इच्छा होती, की कुटुंबाच्या इच्छेखातर ती अल्पावधीत पुन्हा पुन्हा बाळंतपणाला राजी झाली, हा खरा प्रश्न आहे; पण त्याकडे गांभीर्याने बघितले जाताना दिसत नाही.कोणत्याही मातेसाठी मुलगा असो की मुलगी, तो तिच्या पोटचा गोळा असतो. त्यात आई तरी सहसा भेद करीत नसते. पण, अनेकदा घरातील बुरसटलेल्या विचारांचे कुटुंबीय वा आप्तेष्ट अशा काही टीका-टिप्पण्या करीत असतात की, ज्यातून मुलगाच हवा, असा संकेत घेता यावा. मीरा एखंडेही त्याचीच बळी ठरली नसेल कशावरून? मीरा तर ग्रामीण भागातली होती. तिच्या शिक्षणाचे माहीत नाही; पण मागे दीड-दोन महिन्यांपूर्वी मुलीस जन्म दिला म्हणून एका प्राध्यापकाने आपल्या पत्नीस घराबाहेर काढून दिल्याची तक्रार नाशिकमध्ये नोंदविली गेली होती. ही उदाहरणे कशाची लक्षणे म्हणावीत? सामाजिक, आर्थिकच नव्हे तर लिंगभेदाबाबतही समानता अजून साकारू शकली नसल्याचेच यातून स्पष्ट होणारे आहे. म्हणूनच, नारीशक्तीच्या जागराला व बेटी बचाव, बेटी पढावसारख्या उपक्रम-योजनांना अधिक गती देण्याची गरज आहे. वरवरच्या उत्सवी कार्यक्रमांना व घोषणांना न भुलता ग्रामीण भागात मुळापर्यंत पोहचून याबाबतची जाणीव जागृती करावी लागेल. अन्यथा, मीरासारख्या भगिनींचे अनिच्छेने पडणारे बळी टाळता येणार नाहीत.महत्त्वाचे म्हणजे, मीरा किंवा तीच्या कुटुंबीयांचा मुलासाठीचा अट्टाहास लक्षात घेता यापूर्वीची तिची अपत्ये ही ‘नकोशी’च ठरणारी आहेत. तेव्हा, मीराच्या मृत्यूनंतर तिच्या सात मुलींच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे हा खरा सुजाणांना अस्वस्थ करणारा प्रश्न ठरावा. मुलगाच हवा या मानसिकतेपायी जन्मास येऊनही दुर्लक्षिल्या जाणाऱ्या ‘नकोशी’ची समस्या किंवा त्यांची अवहेलना हा चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१७-१८च्या आर्थिक सर्वेक्षणात पहिल्यांदा याकडे लक्ष वेधले गेले. इच्छेविरुद्ध जन्मास आलेल्या ‘नकोशी’ची संख्या देशात सुमारे दोन कोटींहून अधिक असल्याचे त्यातून पुढे आले होते. या मुली वाढतात, जगतात. परंतु समन्यायी सन्मान, अधिकार त्यांच्या वाट्याला येत नाही. समानतेपासून त्या दूर-उपेक्षित राहतात. या भेदाभेदकडे लक्ष पुरवून त्यासंदर्भातली मानसिकता बदलणे आज गरजेचे आहे. समाजधुरिणांनीच त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मीराबाईच्या पश्चात असलेल्या कन्यांकडेही याचदृष्टीने बघता येणारे आहे.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला