शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रोलिंग’ करणं हा आजार आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 16:20 IST

Trolling : ट्रोलिंग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणारं ऑनलाइन वर्तन. ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषयुक्त टिपण्या केल्या जातात.

ऑनलाइन चर्चा, वाद आणि ट्रोलिंग यात फरक असतो हे अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. ‘मी कुठं काय केलं. मी तर चर्चा करत होतो.’ असं अनेकांना वाटतं; पण चर्चा, टीका आणि ट्रोलिंग यांच्यातली पुसटशी सीमारेषा लक्षात न आल्यानं अनेकांचा गोंधळ उडतो.  ट्रोलिंगची तशी व्याख्या नाही; पण ट्रोलिंग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणारं ऑनलाइन वर्तन. ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषयुक्त टिपण्या केल्या जातात. एखाद्या वादामध्ये शब्दांची आणि अभिव्यक्तीची, सभ्यतेची मर्यादा ओलांडलेली नसते त्या चर्चेला, टीकेला ट्रोलिंग म्हणता येत नाही; पण जिथं समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा, नामोहरम करण्याचा, शारीरिक आणि मानसिक इजा पोहोचवण्याचा, लैंगिक छळ करण्याचा, बदनामीचा हेतू असतो त्याला ट्रोलिंग म्हटलं जातं. सभ्य शब्दातही वाद होऊ शकतात; पण एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक गलिच्छ शब्दांत लिहायला सुरुवात करते ते ट्रोलिंग! ऑनलाइन पोस्ट, कमेंटस्‌च्या माध्यमातून धमक्या देणं, त्रास देणं, इजा पोहोचवण्याची भाषा करणं, शिव्या देणं, कुटुंबाबद्दल अपशब्द वापरणं, या सगळ्या गोष्टी ट्रोलिंगमध्ये मोडतात. 

ट्रोलिंग हे व्यसन आहे का? 

- या प्रश्नाचं सरळ उत्तर देणं अवघड आहे; पण  मनोविकारतज्ज्ञांनुसार सायकोपाथ हा मानसिक आजार बरा होत नाही. सायकोपाथ म्हणजे काय तर समाजविरोधी, दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्तीच व्यक्तिमत्त्वात असणं. अनेकदा ट्रोल्स सायकोपाथही असू शकतात. हे ट्रोल्स कधीतरी बदलून सकस संवाद साधू शकतात का? हो... आणि नाही! ट्रोलिंग थांबणं, व्हर्चुअल जगात वावरण्याचं भान लोकांना येणं ही अत्यंत व्यक्तिसापेक्ष प्रक्रिया आहे. माध्यम शिक्षणानं कदाचित या वृत्तीत फरक पडू शकतो.

ट्रोलिंग का केलं जातं? 

१) दुसऱ्याला त्रास देण्यातून मजा येते. आनंद मिळतो.२) वैयक्तिक मतभेद, हेवेदावे, खुन्नस ३) राजकीय आणि विचारधारेतील मतभेद ४) संबंधित व्यक्तींचे लैंगिक अग्रक्रम न पटल्यानं  ६) सेलिब्रिटींबद्दल वाटणारी असूया ७) प्रकाशझोतात राहण्याचा अट्टहास ८) आपल्या आवडत्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी ९) एका विशिष्ट गटात जागा मिळवण्यासाठी 

- मुक्ता चैतन्य, समाज माध्यमाच्या अभ्यासकmuktaachaitanya@gmail.com

टॅग्स :Trollट्रोलIndiaभारत