शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

परि उमगले ना तंत्र जीवनाचे !

By किरण अग्रवाल | Updated: June 28, 2018 08:32 IST

शिक्षणाने जबाबदारीची जाणीव घडविली जातेय का किंवा कोणत्याही अडचणींना हिमतीने सामोरे जाण्याचे धाडस बिंबवले जातेय का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा.

शाळा, महाविद्यालयातील परीक्षेत उत्तीर्ण होणारे जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी होतातच असे नाही, कारण शिक्षणातील मूल्याधिष्ठितपणा तर कमी होत चालला आहेच; शिवाय आयुष्यातील चढ-उताराला धैर्याने सामोरे जाण्याचे शिक्षण त्यात घडून येईनासे झाले आहे. नोकरीसाठीचे शिक्षण वाढले असून, जीवनासाठी झगडाव्या लागणाऱ्या कसरतीचे भान त्यातून जागवले जात नाही. त्यामुळे शिक्षित होऊनही असहायता अनुभवव करणारी तरुण मंडळी शुल्लक समस्यांमुळे मानसिकदृष्ट्या कोलमडून पडताना दिसते व त्यातूनच टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवायलाही मागेपुढे पाहत नाही. शिक्षणाने जबाबदारीची जाणीव घडविली जातेय का किंवा कोणत्याही अडचणींना हिमतीने सामोरे जाण्याचे धाडस बिंबवले जातेय का, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित व्हावा.

शिक्षणामुळे विचाराच्या कक्षा रुंदावतात. विवेकाच्या ज्योती प्रज्वलित होतात व त्यामुळे भल्या-बुºयाची जाण होते, असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. बव्हंशी ते खरेही आहे, तसा अनुभवही समाजात वावरताना येतो. परंतु त्याचबरोबर अडीअडचणीच्या अगर कसोटीच्या प्रसंगी भलेभले उच्चविद्याविभूषित गांगरून गेलेलेही दिसून येतात. अर्थात, इथवरही ठीक. कारण शिक्षणाने आलेले भान संबंधितांना अधिक चिकित्सक बनवत असेल, त्यामुळे ते निर्णयप्रक्रियेत गोंधळलेले दिसूनही येत असतील कदाचित; परंतु याची पुढची पायरी गाठत प्रश्न सोडविता येत नसेल किंवा तशी शक्यता दिसत नसेल तर चक्क आयुष्य संपवायला निघण्याच्या निर्णयाप्रत ते येत असतील तर मग शिक्षणाने त्यांना काय शिकवले, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे. अनेक ठिकाणच्या विविध प्रकरणांत शिक्षित तरुण हिंमत सोडून किंवा हतबलतेतून अप्रिय निर्णय घेताना दिसून येतात, तेव्हा आश्चर्य वाटून जाते ते त्यामुळेच.

लाथ मारीन तेथे पाणी काढेन, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती ज्याच्या ठायी असते ती तरुण पिढी. पण या तरुणांतील शिकलेली मुलेही आत्महत्येचा मार्ग अनुसरतानाची अलीकडची दोन उदाहरणे या संदर्भातील गंभीरता लक्षात आणून देणारी आहे. यातील एक घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील. ईश्वर वठार येथील अनिशा लवटे या पॉलिटेक्निकला शिकणा-या तरुणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. कारण काय तर, शिक्षणाचा वाढता खर्च भागवताना वडिलांची होणारी ओढाताण तिला बघवत नव्हती. तिची एक बहीण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर भाऊ वारणा येथे शिकतो आहे. एक एकर शेतीतून या तीनही मुलांचा शिक्षणाचा भार पेलवत नसल्याने वडिलांवरील कर्ज वाढत होते. त्यामुळे अनिशाने आयुष्य संपविले. असे करताना जे वडील कर्जबाजारी होऊन तिला शिकवण्यासाठी धडपडत होते, त्यांच्यावर किती दु:खाचा डोंगर कोसळेल याचा विचार केला गेला नाही. हतबलतेतून तिने हे पाऊल उचलले; पण तिचे शिक्षण तिला याबाबत मार्गदर्शक ठरूशकले नाही, असेच म्हणायला हवे. शिक्षणातून विचार करण्याची क्षमता लाभली असती तर कदाचित तिने असा टोकाचा निर्णय घेतला नसता. अडचणीतून मार्ग निघण्याची वाट बघत ती परिस्थितीला सामोरे गेली असती. पण तसे होऊ शकले नाही.

दुसरे उदाहरण असेच काहीसे आहे. गुजरातच्या बडोदा येथे इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षात शिकणा-या नैतिककुमार तांडेल या विद्यार्थ्याने आपल्या भावाला किडनी मिळावी म्हणून आत्महत्या केली. मुळात, भावाच्या जगण्यासाठी अशा पद्धतीने स्वत:चे आयुष्य संपविण्याचे कुणीही समर्थन करणार नाही. कारण गरजूला किडनी मिळण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे आत्महत्या करूनही वेळ दवडला गेल्याने त्याची किडनी उपयोगी पडू शकली नाही. त्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणा-या नैतिकने उगाच स्वत:चा जीव गमावल्याचे स्पष्ट व्हावे. अवयव प्रत्यारोपणासाठीची पुरेशी वैज्ञानिक माहिती नसण्यातून हे घडून आलेले दिसते. म्हणूनच अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन किंवा घेताना नैतिकने काय शिकले, असा प्रश्न उपस्थित व्हावा. यातील भाव-भावनांचा उद्वेग, असहायतेतून आलेली अपरिहार्यता आदींचा विचार ठीक असला तरी आत्महत्येचा पर्याय कसा योग्य ठरावा? शिक्षणाने मुले शिक्षित होत आहेत; पण ते सुशिक्षित होत आहेत का, यासारखा प्रश्नही त्यामुळेच केला जातो. प्रस्तुतच्या घटना पाहता व विशेषत: तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उचलेले पाऊल बघता, ते शिक्षणातील तंत्र शिकू पाहत होते; पण जीवनाचे तंत्र त्यांना काही उमगले नसावे असेच खेदाने म्हणता यावे. समाजमन अस्वस्थ करणा-या या घटनांकडे गांभीर्याने बघून तरुणातील हतबलतेवर इलाज शोधण्याची वेळ आली आहे, ती त्यामुळेच.

टॅग्स :educationशैक्षणिक