शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

फुफाट्यातला पाक! पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:05 IST

लोकशाहीचे वावडे असलेला पाकिस्तान केवळ सैन्याच्या टाचेखालीच नसतो, तर दहशतवादाचाही प्रचंड पगडा तिथल्या व्यवस्थेवर आहे. हा पगडा झुगारून द्यायचा तर कराचीसारखे हल्ले होत राहतील...

पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सुरक्षाकर्मींसह नऊजण बळी पडले. दहशतवादाला नाती ठाऊक नसतात. प्रसंगी तो आपल्याच पिलांना खाऊन टाकतो; पण ते पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या बथ्थड डोक्यात शिरणार नाही. जोपर्यंत सैन्याची आणि पर्यायाने आयएसआय या हिंसेचा विधिनिषेध नसलेल्या गुप्तहेर संघटनेची राजकीय आसमंताभोवती असलेली मगरमिठी सुटत नाही, तोपर्यंत त्या देशात विवेकाला स्थान मिळण्याची शक्यता नाही. दहशतवादाशी तिथल्या राज्यकर्त्यांची असलेली सलगी जगजाहीर आहे. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान तर हे अतूट नाते अधूनमधून बिनदिक्कत प्रदर्शित करत असतात. हल्लीच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ओसामा बिन लादेनला चक्क हुतात्म्याच्या पंगतीत नेऊन बसविले. ते अनवधानाने तसे बोलले असतील असे म्हणत कुणी त्यांना संशयाचा फायदा देऊ नये यासाठी सांगावे लागेल की त्यांनी आधी बोलण्याच्या ओघात लादेन ‘मारला गेला’ असा शब्दप्रयोग केला व मग आपला शब्द मागे घेत तो ‘शहीद’ झाल्याचे विधान केले.

पाकिस्तानची मिलिटरी अकादमी असलेल्या आणि अनेक निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या अबोटाबाद येथे ओसामा राहत होता व तेथेच रात्रीच्या अंधारात हल्ला करून अमेरिकेच्या नेव्ही सिल्सनी त्याचा खात्मा केला होता. पाकिस्तानचे दहशतवादाशी असलेले स्नेहबंध दर्शविण्यास एरवी हा पुरावा पुरेसा असला तरी चीनसारख्या त्या देशाची पाठराखण करणाºया देशांना तसे वाटत नाही. परिणामी, संदिग्धतेच्या तारेवर कसरत करत इस्लामाबाद दहशतवादाला पोसत आला आहे. अमेरिका आणि युरोपच्या दटावणीमुळे इसिस किंवा तत्सम संघटनांना खुलेआम आसरा देण्याचे पाकिस्तानने टाळलेले असले, तरी मसूद अझहर आणि त्याच्या पिलावळीचा भारतद्वेष नृशंस हिंसेच्या पातळीवर नेण्यासाठी नेहमीच उत्तेजन दिले आहे. आपणही दहशतवादाची शिकार ठरलो आहोत, हा त्या देशाचा दावा वरकरणी खरा वाटेलही; कराचीत घडलेली ताजी घटना नि:संशय दहशतवाद्यांचेच कृत्य आहे; पण हे दहशतवादी काल-परवापर्यंत तिथल्या व्यवस्थेनेच पोसलेले होते. आज युरोप-अमेरिकेसह मध्यपूर्वेच्या दबावामुळे पाकिस्तान त्यांच्यावरली छत्रछाया दूर करू पाहतो आहे.

यामुळेच बिथरून जात त्यांनी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरू शकतो, याची दाहक जाणीव तिथल्या सत्ताधीशांना आणि सैन्यालाही करून दिलेली आहे. कराची हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी त्यावरील दहशतवादी मोहर आयएसआयला सहजपणे हल्ल्याच्या उगमस्रोताकडे नेईल, याविषयी शंका नको. पाकिस्तान सध्या आर्थिक अस्थैर्याच्या लाटेत हेलकावे खात आहे. कोविड-१९मुळे उद्भवलेली परिस्थिती नवख्या इम्रान खानना व्यवस्थित हाताळता आलेली नाही. परिणामी जनतेत तीव्र क्षोभ आहे. भारतद्वेषाचा वन्ही चेतवत कळीचे अन्य मुद्दे लपविण्याची हुकमी क्लृप्तीही सध्या साथ देत नाही. काश्मीरचा पत्ता त्या देशाच्या हातून निसटण्याची शक्यता दिसू लागली आहे. एक चीन वगळता अन्य कोणताच देश मदत करण्याच्या मन:स्थितीत नाही. अफगाणिस्तानमधली सद्य:स्थितीही पाकिस्तानला प्रतिकूल बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशावेळी पाश्चिमात्य जगाकडे याचक म्हणून जायचे तर किमान अटी आणि नियमांसमोर दंडवत घालणे आले.

अटींच्या यादीत दहशतवादाच्या निर्मूलनाला अग्रस्थान असेल हे वेगळे सांगायची गरज नाही; पण इतके दिवस ज्यांना अभय दिले, त्यांना वाºयावर सोडायचे तर त्याचे परिणामही भोगावे लागतील. कराची हल्ल्याने हेच तर सूचित केले आहे. कराची स्टॉक एक्स्चेंज हे त्यामानाने बरेच सौम्य लक्ष्य होते. तेथे दहशतवादी हल्ला करण्यात मोठ्या मर्दुमकीची गरजही नव्हती; पण पाकिस्तानी व्यवस्थेला संदेश देण्यासाठी हा हल्ला पुरेसा आहे. किंबहुना हा संदेश इस्लामाबादपर्यंत प्रत्यक्ष हल्ला होण्याआधीच गेलेला असावा, अन्यथा सुसंस्कृत राजकारणी अशी आपली प्रतिमा जगापुढे जावी म्हणून आटोकाट प्रयत्न करणाऱ्या इम्रान खाननी लादेनला ‘हुतात्मा’ संबोधत दहशतवादी शक्तींसमोर पांढरे निशाण फडकवले नसते. अख्ख्या जगाचा रोष आपल्या वाट्याला येईल याचे भान असतानाही इम्रान या थरापर्यंत का गेले, याची उकल नजीकच्या भविष्यात होईलच.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाBombsस्फोटके