शिव्या देणे बंद करणाऱ्या गावाची गोष्ट
By सुधीर लंके | Updated: December 4, 2024 07:47 IST2024-12-04T07:46:56+5:302024-12-04T07:47:33+5:30
लाडक्या बहिणींसाठी 'शिवी' मुक्त गाव का नको?- नेवासा तालुक्यातील सौंदाळे ग्रामपंचायतीने गावात शिवी देण्यावर बंदी घातली आहे, त्यानिमित्ताने...

शिव्या देणे बंद करणाऱ्या गावाची गोष्ट
सुधीर लंके , निवासी संपादक लोकमत, अहिल्यानगर
एका घरासमोरील पिंजऱ्यात ठेवलेला पोपटही 'मिठू मिठू' बोलण्याऐवजी शिव्या देतो. का? तर त्याचा मालक सकाळ, दुपार, संध्याकाळ भरमसाट शिव्याच झाडतो. म्हणून त्याचे 'शिवी' पुराण पोपटानेही मुखोद्गत केले, ही गोष्ट आपण अनेकदा ऐकली. गोष्टीचे सार असे, की 'तुम्ही शिवी पेरली, तर शिवीच उगवणार!
हे 'शिवी' पुराणही थोरच आहे. ते पिढीजात हस्तांतरित होत गेले. बापजाद्याची प्रॉपर्टी असल्यासारखे. मुलांना शाळेतील पाढे पाठ झाले नाहीत. पण, शिव्या तोंडपाठ झाल्या. हे वाड्मय सर्रास वापरात असल्याने लुप्त होण्याचा धोकाही नाही. हे वाङ्मय शहरांत आहेच. पण, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात त्याची व्याप्ती अधिक आहे. पावलागणिक भाषा बदलले. तशी शिवीही बदलते.
'चॅट जीपीटी'ला 'शिवी म्हणजे काय?' असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येते 'शिवी म्हणजे संवादाचा प्रकार आहे. ज्यात राग, तिरस्कार, ताण व्यक्त करण्यासाठी अपशब्द वापरले जातात.' मानसशास्त्राचे अभ्यासकही हेच सांगतात, 'माणूस राग व्यक्त करण्यासाठी, मस्करी करण्यासाठी शिवी देतो'. म्हणजे शिवी हे राग व्यक्त करण्यासाठीचे किंवा हिणवण्यासाठीचे एक 'आउटलेट'च झाले. रागावरील औषध म्हणा हवे तर.
पण, या औषधाची खासियत म्हणजे ते जातीद्वेष, लिंगद्वेष पेरणारे अश्लील औषध आहे. शिव्या या मुख्यत्वे स्त्री, पुरुषांच्या लिंगाबद्दल, खासगी अवयवांबद्दल असतात. खेडोपाडी भररस्त्यात लोक सर्रासपणे या अश्लील शिव्या हासडतात. घरोघरी त्या ठासून भरल्या आहेत. बहुतांश शिव्या या स्त्रिया आणि जातींचाच उद्धार करतात. त्यामुळे शिवी नावाची लोकरुढी जपणे हे समाजविघातक आहे. जातीवाचक शिवीगाळ हा कायद्याने गुन्हा ठरतो. स्त्रीवाचक शिवीगाळही गुन्हाच आहे. पण, हा गुन्हा नोंदवायला खास कुणी पोलिस स्टेशनात जात नाही. त्याऐवजी माणूस दुसऱ्याच्या आई, बहिणीच्या नावाने चार शिव्या हासडून फिट्टेफाट करतो. महाभारतात स्त्री दावावर लावली. समाज आज भांडणात शिवीमधून दररोज स्त्री दावावर लावतो. हे केवळ भांडणातच घडते असे नव्हे. राजकीय सभांमध्ये, बैठकांत लोक उघडपणे शिव्या देतात. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 'काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या'.
या सगळ्या 'शिवी' पुराणाचा संदर्भ यासाठी की, राज्यातील सौंदाळा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या ग्रामपंचायतीने गावात शिव्यांना बंदी घातली आहे. शिवी दिल्यास पाचशे रुपये दंडाची पावती फाडावी लागेल, असा ठराव ग्रामसभेने केला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या गावाने महिलांसाठी कन्यादान योजना आणली. विधवांचा सन्मान करा, पुनर्विवाह करा, अशी चळवळ सुरू केली. पण, सरपंच शरद आरगडे यांच्या लक्षात आले की, एकीकडे आपण 'लाडकी बहीण' म्हणतो, दुसरीकडे गावात भांडणे झाली की, लोक शिव्या हासडताना सतत स्त्रियांबद्दल असभ्य, अश्लील शब्द वापरतात. त्यामुळे गावाने शिवी उच्चारण्यावर बंदी आणली आहे.
हरयाणा राज्यातील बीबीपूर गावानेही असा प्रयोग यापूर्वी केला होता. त्यांनी 'गालीबंद घर' ही मोहीमच राबवली. नेहा ठाकूर व तमन्ना मिश्रा या दोन तरुणींनी 'द गाली प्रोजेक्ट' म्हणून एक प्रकल्पच राबवला. शिवीला हिंदीत 'गाली' म्हणतात. लोक काय शिव्या देतात ? हे त्यांनी अभ्यासले. पण, त्यांनी पर्यायही दिला. राग किंव भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी पर्यायी शब् वेगवेगळ्या बोलीभाषेतूनच शोधले व ते लोकांना सुचविले उदाहरणार्थ, एखाद्याला चोरून ऐकण्याची सवय असते काश्मिरी भाषेत त्यास 'हकरी हूँ' असे म्हणतात एखाद्याला आपण फार काळ सहन करू शकत नाह त्यास तामिळ भाषेत 'मुदियाला' म्हणतात. असे पर्यार्य शब्द त्यांनी शिवीसाठी सुचविले.
सौंदाळ गावाने जे करुन दाखवले ते ग्रामीण शहाणपण आहे. खेड्यात पूर्वी हगणदारी होती. त्य जागेवर 'टॉयलेट' आले. खेड्यात 'भगत' होता. तेथे डॉक्ट आला. जातपंचायत जाऊन कोर्ट आले. त्यामुळे 'शिवी' ह मानसिक आजारही हद्दपार होऊ शकतो. तशी मानसिकत गावांना व शहरांनाही करावी लागेल. मुलांच्या कानाव शिवी पडलीच नाही, तर ही लोकपरंपरा आपोआप लुप होईल. अशा परंपरा जपणे समाजहिताचेही नाही. बऱ्याच् शब्दांचा, वाक्यांचा, म्हणींचा अर्थ माणसांना ठाऊकर्ह नसतो. उदाहरणार्थ, 'कुतरओढ' हा शब्द. हा शब् ओढाताण होणे, या अर्थाने वापरला जातो. पण, य शब्दाचा अर्थ थेट श्वानांच्या मैथुन क्रियेपर्यंतही पोहोचते भाषेत अशा अनेक गमतीजमती आहेत. त्या अभ्यासायल हव्यात. त्याला पर्याय शोधायला हवा.