शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

डॉक्टरेट भरपूर; पण 'प्रॉडक्ट' दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 5:45 AM

शोधनिबंधांची संख्या जगात तिसरी असल्याचा आनंद जरुर आहे; पण लोकोपयोगी ‘अ‍ॅप्लाईड’ संशोधन कोणते, भारंभार ‘डॉक्टरेट’चा समाजाला लाभ होतो का, पेटंट-शोधनिबंधांमधून ‘प्रॉडक्ट’ जन्माला येतात का, याची उत्तरे समाधानकारक असल्याचे दिसत नाही.

विज्ञान-तंत्रज्ञानातील शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात भारत जगात तिसरा असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने जाहीर केले. या बाबतीत चीन पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. आता मुद्दा येतो ती ही वाढ गुणात्मक आहे का याचा. पाच हजार वर्षे जुनी संस्कृती असलेल्या या भारतवर्षात काय नव्हते? सोन्याचा धूर निघत होता. क्षेपणास्त्रे उडवली जात होती. ‘टेस्ट ट्यूब बेबी’सारखे वैद्यकीय चमत्कार घडत होते. आयुर्वेदाच्या बाहेरची कोणतीच व्याधी अस्तित्वात नव्हती. फळे-फुलांनी, दुधा-मधाने कृषी संस्कृती बहरली होती. एकूणात काय तर मानवी प्रगतीच्या आणि त्या प्रगतीद्वारे येणाऱ्या सुखाच्या सर्वोच्च सीमा भारताने ओलांडलेल्या होत्या.

फक्त ऐहिक सुखाचीच बात नव्हे. अध्यात्म, योग, पतंजलीच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीही येथे शक्य होती. पुरातन ग्रंथांमधून हे सर्व ज्ञानभांडार ठासून भरल्याची अनेकांची ठाम धारणा आहे. अर्थात पुरावे मागू जाल तर भारतीयांच्या अचाट बुद्धीसामर्थ्याचे, प्रगतीचे आणि कौशल्याचे दाखले केवळ स्थापत्यशास्त्राच्या माध्यमातूनच पाहायला मिळतात. त्यावर युक्तिवाद असा केला जातो, की मध्यंतरीची काही शतके परचक्र, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे भारतीयांची ज्ञानासक्ती लुप्त पावली आणि भारतीय उपखंड अंधारयुगात लोटला गेला. परिणामी यंत्रयुगाच्या आधीपासून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश कायम परप्रकाशी राहिला.

ब्रिटिशांच्या काळात युरोपीय तंत्रज्ञान सुलभतेने भारतात येऊ लागले. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची कवाडे भारतीयांना खुली झाली. गेल्या दीड शतकात डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्यापासून सी. व्ही. रामनांंपर्यंत आणि रवींद्रनाथ टागोरांपासून ते डॉ. आंबेडकरांपर्यंत अनेकांनी भारतीयांची बुद्धिमत्ता पाश्चिमात्यांच्या तोडीची असल्याचे सिद्ध केले. भारतीय ज्ञानवंतांचा उदय जागतिक पटलावर होत असल्याची चाहूल लागत असतानाच पुन्हा जणू भारताला ग्लानी आली आणि विज्ञान, उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षणपद्धती आदी बाबतींत पाश्चिमात्यांचे अनुकरण सुरू झाले. सुईसुद्धा परदेशातून आयात होत असल्याचे भारताने पाहिले. खास करून स्वातंत्र्यांनंतर मूलभूत संशोधनापेक्षा ‘कॉपी-पेस्ट’वरच देश अवलंबून राहिला. हरित क्रांतीपासून संगणकांपर्यंत आणि डेअरीपासून जहाजबांधणीपर्यंत भारत पश्चिमेकडे नजर लावून बसू लागला.माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी नव्वदीच्या दशकात आर्थिक उदारीकरणाची वाट दाखवली आणि भारताने कूस बदलली. डॉ. भटकरांच्या रूपाने परमसंगणकाची निर्मिती झाली. डॉ. माशेलकरांनी हळदीच्या पेटंटची लढाई जिंकली. रशियाने अडवणूक करूनही क्रायोजेनिक इंजिनाविना भारताचा उपग्रह कार्यक्रम अडला नाही. युरोप-अमेरिकेतल्या सॉफ्टवेअर, मेडिसीन क्षेत्रात भारतीयांनी घोडदौड सुरू केली. अर्थात यातही ‘ओरिजिनॅलिटी’चा मुद्दा पुन्हा-पुन्हा ऐरणीवर येतच राहिला. गेल्या दोन-तीन दशकांत भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानाने जगाला काय दिले, याचे उत्तर चटकन सांगता येत नाही.
सध्या डिजीटल, ब्लॉकचेन, लाइफ सायन्सेस यात भारतीयांनी आघाडी घेतली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंगवर चीनचा भर आहे. लोकसंख्येच्या, शारीरिक बळावर नव्हे तर बुद्धिसंपदेच्या जोरावर जगावर स्वामित्व गाजवण्याचा हा काळ आहे. त्यामुळे नुसती संख्या नव्हे, तर शोधनिबंधांची गुणात्मकता आणि व्यावसायिकीकरण होण्याची त्याची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे ही सरकारची, विद्यापीठांची, संशोधन संस्थांची जबाबदारी असेल. भारतीय ज्ञानवंतांच्या प्रतिभेला परदेशात नव्हे, याच भूमीत धुमारे फुटतील अशा ज्ञानाला प्रतिष्ठा देणाऱ्या वातावरणाची निर्मिती करणे हे समाजाचेही दायित्व आहे; अन्यथा संख्येच्या कौतुकात फार रमता येणार नाही. अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, अलिबाबासारख्या कंपन्या भारतात जन्माला येणे महत्वाचे.