शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 08:06 IST

सर्वसामान्य मतदारांचीदेखील अशावेळी जबाबदारी वाढते. ताे मात्र प्रसारमाध्यमांना दाेष देऊन नामानिराळा हाेताे, हे काही बराेबर नाही.

अठराव्या लाेकसभेची सार्वत्रिक निवडणूक तिसऱ्या टप्प्यात आली आहे. अद्याप चार टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रात आणखी दाेन टप्पे हाेणार आहेत. अठरावी सार्वत्रिक निवडणूक असल्याने तिची वाटचाल प्रगल्भतेकडे हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भाषणे, वक्तव्ये, आरडाओरडा, टीकाटिप्पणी ऐकून असे वाटते की, राजकीय जीवनाचा स्तरच खालावताे आहे. भाषा घसरते आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

सर्वसामान्य मतदारांचीदेखील अशावेळी जबाबदारी वाढते. ताे मात्र प्रसारमाध्यमांना दाेष देऊन नामानिराळा हाेताे, हे काही बराेबर नाही. आपल्या देशासमाेर महत्त्वाचे प्रश्न काेणते आहेत? जगभरात हाेणारे बदल काेणत्या भाषेत सांगितले जात आहेत? हवामान बदलापासून ते अन्नधान्य टंचाईपर्यंत आपल्या साऱ्यांचा संबंध आहे. याचा थेट सामना करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारत खालच्या स्तरावर आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यातील धाेरणात खाेट आहे, त्याचा व्यापार झाला आहे. लाेकसंख्या वाढीचा वेग काही आवरता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे ज्या देशाची निम्मी लाेकसंख्या कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे, त्या क्षेत्रातील गंभीर प्रश्नांची उकल करणारी मांडणी करताना एकही राजकीय पक्ष गंभीर नाही. महागाई वाढते आहे, बेराेजगारीचा आकडा दरवर्षी फुगताे आहे. शिक्षण आणि राेजगाराचा संबंध दुरान्वयेही राहिलेला नाही. बहुतांश सर्वच क्षेत्रांत प्रचंड विराेधाभास निर्माण झालेला असताना आपल्या राजकीय नेत्यांची भाषा एकमेकांची उणीदुणी काढणारी आहे. ही भाषा वापरण्याचे धाडस हाेतेच कसे? काही राजकीय पक्षांनी तर धादांत खाेटा प्रचार करण्याचा विडाच उचललेला आहे. देशाचा इतिहास काय सांगताे आहे? भारतीय परंपरा काय सांगते, याचे साधे भान नाही. ज्यांना राजकारण आणि विचारसरणी म्हणजे काय असते, देश-समाज उभारणी कशाला म्हणतात याचा थांगपत्ता नाही असेच नेते बाष्कळ बडबड करतात.

महाराष्ट्रात तरी एक उच्च परंपरा गतकाळातील धुरंधर राज्यकर्त्यांनी निर्माण केली आहे. निदान त्याची तरी उजळणी करा. बारामती लाेकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना प्रथमच हाेताे आहे. संपूर्ण देशाचे लक्ष त्या मतदारसंघाकडे लागले आहे. तेथे एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली जात आहे. काैटुंबिक उणीदुणी काढली जात आहेत. असे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी घडले नव्हते. आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक प्रगती साधली असली तरी त्या प्रगतीतून असमताेल निर्माण झाला आहे. मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे या चतुष्काेनात नागरीकरणाचा स्फाेट झाला आहे. त्यातून निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांचा स्फाेट हाेण्याची वेळ आली आहे. उर्वरित महाराष्ट्र पाण्यासाठी तडफडताे आहे. राेजगारासाठी स्थलांतरित हाेताे आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बिनपाण्याची शेती कधीच गाेत्यात आली आहे. ऐंशी टक्के काेरडवाहू महाराष्ट्राचा प्रश्न कसा साेडविणार, याचे उत्तर देता येत नाही. मात्र, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या म्हणीप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांचे प्रवक्ते, नेते आणि आमदार, खासदार, उमेदवार, मंत्री एकमेकांना शिव्या देत महाराष्ट्रभर फिरत आहेत.

हेमंत करकरे यांना काेणी मारले, हा विषय आता उपस्थित करण्याची गरज आहे का? त्याचा तपास राजकारण बाजूला ठेवून करायचा असताे. ताे झालादेखील पाहिजे. कसाब या अतिरेक्याला बिर्याणी खाऊ घातली गेली, अशी खाेटी वक्तव्ये करून महाराष्ट्रासारख्या उत्तम प्रशासकीय व्यवस्थेची लक्तरे बाहेर काढताना सभ्यता कशी साेडली जाते? माजी गृहमंत्र्यांना तुरुंगात टाकले जाते, राज्य बँकेत पंचवीस हजार काेटींचा घाेटाळा झाला म्हणणारेच आता फाइल बंद करून काही घडलेच नाही, अशा आविर्भावात कसे वागू शकतात? महाराष्ट्रातील मतदार म्हणजे काेण वाटले? त्यांना गृहीत धरून वाटेल ते बाेलणाऱ्यांना लगाम घालण्याची हिंमत राजकीय नेतृत्वात नाही. मात्र, मतदार हे पाहत नाही, ऐकत नाही, त्याची सत्यता पडताळत नाही, असे काेणी समजू नये. युद्धात आणि प्रेमात सारे माफ असते, असे म्हणत म्हणत या राजकीय नेत्यांनी कोणतीही भाषा कशाही पद्धतीने वापरत काहीही केले तरी चालते असे समजू नये. सामान्य माणसांच्या मनात राग आहे. हा राग ताे संधी मिळताच व्यक्त करीत असताे याची जाणीव ठेवून प्रचार करताना भाषेची घसरण हाेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४