शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

धर्मा आजोबा, तुमचं चुकलंच!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 31, 2018 00:28 IST

तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरकारला अशी पळापळी करावी लागली नसती.

प्रिय धर्मा आजोबा,तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरकारला अशी पळापळी करावी लागली नसती. तुमच्यामुळे सगळ्यांचा सोमवार वाया गेला. म्हातारपणी हे असा त्रास देणं बरोबर नाहीय.तुम्ही तुमचं निवेदनं कलेक्टर, तहसीलदार यांना दिलं असतं तर कधी ना कधी तुम्हाला न्याय मिळाला असता. शेजारच्या नेत्याला जेवढा मोबदला मिळाला तेवढाच तुम्हाला मिळाला पाहिजे असा आग्रह कसा काय धरू शकता तुम्ही? कुठे तुम्ही आणि कुठे ते नेते? आमचे सरकार पारदर्शक आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र सिस्टिम उभी करतोय. पण तुम्हाला घाई झाली. आमची सिस्टिम उभी राहण्याच्या आतच तुम्ही विषाची परीक्षा केलीत... थोडे थांबला असता तर तुम्हाला आमची पारदर्शक यंत्रणा दिसली असती... पण तुम्ही घाई केली. तुमचं चुकलंच आजोबा... तहसीलदार, कलेक्टर, आयुक्त सगळ्यींना इतरही कामं असतात. या वयात तुम्ही सगळीकडं फिरत बसण्यापेक्षा तुमचं काम एखाद्या दलालाला द्यायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हालाही हवा तेवढा मोबदला मिळाला असता आणि त्या नेत्यालाही त्याचा हिस्सा मिळाला असता. पण नाही, तुम्ही पडलात गांधीवादी. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी ३० दिवसाच्या आत तुमचा प्रश्न सोडवण्याचे लेखी पत्र तुमच्या मुलाकडे दिलं. तुमच्या जमीन संपादनात चूक झाली असेल तर व्याजासह मोबदला देऊ असंही लिहून दिलं त्यांनी त्या पत्रात. अहो, तुम्ही गेल्याची बातमी कळताच धावत पळत, आमच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलं... अजून काय करायला पाहिजे होतं त्यांनी? तुम्ही मात्र घाई केली हे चुकलंच तुमचं! आमची घाई सुध्दा विरोधकांना पहावत नाही. आता ते म्हणू लागले की, व्याजासह मोबदला मिळेलही पण गेलेली जिंदगानी व्याजासहित थोडीच येणार? हे काय बोलणं झालं का बरं? आमच्या मंत्र्यांना नागपुरातली इतरही कामं खूप आहेत, अमृत पाणीपुरवठा योजनेचे टेंडर ५० टक्के जास्ती आलं तरी आम्ही पाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते टेंडर पास केलचं ना... मग तुम्हालाही दिला असता जास्तीचा मोबदला. पण तुम्ही पारदर्शकपणे ते काम दलालाला न देता स्वत:च पायपीट करत राहिलात. हे काय बरोबर नाही केलं तुम्ही आजोबा...नवाब मलिक सुध्दा विनाकारण आमच्या जयकुमार रावलांवर आरोप करू लागलेत. काय तर म्हणे त्यांनी त्या भागात जमिनी घेऊन ठेवल्या, तुम्हाला मोबदला देण्यासाठी ठेवलेली बैठक त्यांनीच दोनवेळा रद्द करायला लावली... अहो, इतर काही कामं असतील म्हणून बैठक रद्द झाली असेल. याचा अर्थ ती तुमच्यासाठी रद्द केली असा होता का? आता कोणीतरी म्हणालं की, मंत्र्यांच्या नावावर जर आपल्या जमिनी केल्या तर मोबदला जास्तीचा मिळेल. पण आता हे कळून काय उपयोग. तुम्ही तर घाई केलीत. नाहीतर ही आयडिया तुमच्या कामी आली असती ना...? सरकार बदललं म्हणजे सगळी सिस्टिम बदलते असं कसं वाटलं तुम्हाला? म्हणूनच म्हणालो, तुमचं चुकलचं धर्मा आजोबा... 

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र