शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

डॉ. कलामांच्या पादुकांचे स्मरण!

By चंद्रशेखर कुलकर्णी | Published: September 02, 2017 4:31 AM

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ!

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ!पाय आणि पर्सनॅलिटी यांचं नातं अतूट आहे. म्हणी आणि वाक्प्रचारात त्याचं दिसणारं प्रतिबिंब त्याचीच तर साक्ष देतं. सुलक्षण म्हणा, की अवलक्षण म्हणा, त्याचा संबंध पावलांशी जोडला जातो. फरक इतकाच, की कुणी पाय म्हणतं तर कुणी पावलं म्हणतं. असे हे पाय जपणाºया जोड्यांना सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठाही बहुधा त्यातूनच मिळाली असणार. हा हा म्हणता पादुका अन्् खडावांचा जमाना गेला. त्यासरशी पादत्राणांचं पावित्र्यही वैकुंठवासी झालं. तरीही पाय, पादत्राणं अन्् पर्सनॅलिटी हा त्रिवेणी संगम आजही टिकून आहे. पुणेरी जोडे, कोल्हापुरी, जोधपुरी अशी गावा-गावांशी जुळलेली जोड्यांच्या नात्याची वीणही घट्ट आहे. पायाची दासी होणाºया पादत्राणांची काही खासियत आहे.असं म्हणतात, की चपलेवरनं माणसाची पारख होते. पॅरागॉनपासून बाटापर्यंत आणि नाइकीपासून एसिक्सपर्यंत असंख्य ब्रॅण्ड््सनी जुत्यांच्या धंद्यात व्यवस्थित पाय पसरलेत. पण त्यातही चपला, त्यांचे रंग अन्् पोत लक्षात राहतातच. मिसाल के तौर पर सांगायचं तर पांढरी चप्पलच बघा ना! तसं पाहिलं तर शांती, शुचिता अन्् विरक्तीचं प्रतीक ही पांढºया रंगाची ओळख. ते डोक्याच्या बाबतीत खरंही आहे. हा रंग डोईवरी गेला की गांधीवादाची झाक येते पण पायात आला, की नाथाघरची उलटी खूणच जणू! वेगळ्या अर्थानं पांढºया पायाची ही माणसं खासच असतात. यांचा सेल फोन असतो, उजव्या हातात पण त्याला लावलेला कान मात्र असतो डावा! ही अशी माणसं मंत्रालयातल्या लांबच लांब लॉबीपासून दुबईतल्या मॉलपर्यंत कुठंही दिसू शकतात. त्यांच्या पर्सनॅलिटीतही बºयापैकी साम्य असतं. ममत्व, आदर, आस्था अशा ‘सोल’फुल भावना त्यांच्याप्रती निर्माण नाही होत. उलट काहीसा धाक, दरारा, दबदबा असलंच काहीसं मनात येतं. खरं म्हणाल, तर पायाच्या बाबतीतही गोºया कातड्याचं प्रेम असलेल्या मंडळींची दुनिया निराळीच असते.आपल्या मनात आणि व्यवहारात काहीही काळंबेरं नाही, हे इतरांवर ठसवण्यासाठी यांना पायातल्या चपलेच्या पांढºया रंगाचा आधार वाटतो. वन्स अपॉन अ टाईम मुंबईतल्या अंडरवर्ल्डला या रंगाचं भलतं आकर्षण होतं. पायात पांढरी चप्पल असलेल्या माणसाच्या हाताला मोगºयाचा गजरा असणार, असं उगाचच राहून राहून मनात येतं. हाजी मस्तानपासून वरदाभाईपर्यंत अनेकांना या पांढºया पायांचं आकर्षण होतं.डोक्यावर काळ्याचे पांढरे होणे, हे अनुभवाचं तर पायात होणं आर्थिक समृद्धीचं लक्षण ठरत होतं. पण त्या पावलांवर लोळण घेणारी लक्ष्मी काळी असते, की शुभ्रधवल, हे कोडं ज्याचं त्यानं सोडवलेलं बरं. पायातला हा पांढरा रंग रगेल आणि रंगेलपणाशी पाट लावतो, हे बरीक खरं...किरण बेदींनी प्रसिद्ध केलेला डॉ. कलामांच्या चपलांची जातकुळी याच्या नेमकी विरुद्ध भावना जागवते. पायात इतकी साधी चप्पल घालणाºया या वैज्ञानिकानं अवकाश कवेत घेण्याची जिद्द भारतीयांच्या मनात जागवली. त्यासाठी अग्निपंखांचं बळही दिलं. मुद्दा आंधळ्या भक्तिभावाचा नाही, पण डॉ. कलाम यांच्यासारख्या अवकाशाला गवसणी घालणाºया माणसाच्या साधेपणाचा पुरावा देणाºया या आधुनिक पादुकाच म्हणायच्या! त्यांच्या या चपला पाहिल्यावर पुलंचं एक वाक्य आठवलं...‘जेथे जेथे पाय म्हणून वंदन करायला जावे, तेथे तेथे खूर निघतात...’ जे कलामांना लागू नाही.खरंय. वंदन करावे असे पाय आता उरले नाहीत, किरण बेदींच्या टिष्ट्वटने हीच भावना तर जागवली.