शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहनसिंग यांचा अभिनंदन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:03 IST

१४ आॅक्टोबर २०१७ रोजी दिल्ली येथे डॉ. मनमोहनसिंग यांना ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रस्तुत समारंभाची निमंत्रण पत्रिका मिळाली आणि मला मनापासून आनंद झाला.

१४ आॅक्टोबर २०१७ रोजी दिल्ली येथे डॉ. मनमोहनसिंग यांना ‘डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रस्तुत समारंभाची निमंत्रण पत्रिका मिळाली आणि मला मनापासून आनंद झाला. सदर पुरस्कार महाराष्ट्रातील वनराई फाऊंडेशनतर्फे देण्यात येतो. आतापर्यंत तो पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर ज्यांनी आपल्या देशाचा लौकिक निर्माण करण्यात आयुष्य वेचले अशा व्यक्तींचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. सदर पुरस्कार कुठल्याही राजकीय पक्षाने अथवा सरकारने पुरस्कृत केलेला नाही. साहित्याच्या क्षेत्रात ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार जसा अशासकीय स्वरूपाचा आहे, तसाच हा देशपातळीवरचा ‘वनराई फाऊंडेशन’ या संस्थेने सुरू केलेला अशासकीय पुरस्कार आहे. ‘वनराई’ या प्रकल्पाची सुरुवात डॉ. मोहन धारिया यांनी त्यांच्या हयातीत केली. मोहन धारिया यांच्या अनेक चाहत्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेले हे फाऊंडेशन असून, पक्षनिरपेक्ष पद्धतीने त्यांच्या प्रकल्पाचे कार्य पुढे नेणारे एक महत्त्वाचे फाऊंडेशन आहे. स्वत: मोहन धारिया हे काही काळ भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. स्व. राजीव गांधी यांनी याच प्लॅनिंग कमिशनचे सल्लागार सदस्य म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आपल्या देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत मनमोहनसिंग यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. एका अर्थाने केवळ एका व्यक्तीचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार नव्हे.आजच्या स्फोटक अशा राजकीय वातावरणात फाऊंडेशनने डॉ. मनमोहनसिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला याचा कुणालाही सहजच आनंद व्हावा, अशी ही गौरवास्पद घटना आहे. आज मनमोहनसिंग निवडणुकीच्या राजकारणापासून काहीसे अलिप्त झालेले आहेत. त्यांच्या राजकीय पक्षालाही या पुरस्काराचा काही लाभ होईल, ही शक्यता नाही. ‘कमजोर’ पंतप्रधान, कमीत कमी बोलणारे पंतप्रधान, स्वत:च्या पदाचा रिमोट इतरांच्या हाती देऊन सत्तेत राहणारे पंतप्रधान अशा अनेक शेलक्या विशेषणांनी त्यांचा त्या काळातील माध्यमांनी ‘गौरव’ केला. काँग्रेस पक्षातील अनेक ‘घोटाळ्या’ना त्यांच्या काळात ऊत आला होता; पण यापैकी कुठल्याही घोटाळ्यात त्यांचा सहभाग नव्हता एवढे त्यांचे चारित्र्य स्वच्छ होते, हे आज आपल्या लक्षात आले आहे. आपल्या देशातील सोने विक्रीला काढले गेले ते यांच्याच काळात; पण असे असले तरी ते तेवढ्याच सामर्थ्याने परत मिळवून आपल्या देशाची अर्थव्यवस्था मूळ पदावर आणली गेली तीही त्यांच्याच काळात. यात त्यांचे ‘व्हीजन’ दिसून येते. अशा या व्हिजनरी माजी पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या धोरणाबद्दल त्याचवेळी राज्यसभेत अवघे १५-२० मिनिटांचे भाषण देऊन जे काही भीषण परिणाम या देशातील सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतील, त्याचा इशारा देऊन ठेवला होता. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतील ‘माहितीच्या अधिकाराचा’ निर्णय हे त्यांचे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचे योगदान आहे, हे समजून घ्यायलाही काही काळ जावा लागेल. त्यांचा हा गौरव म्हणजे अशा जबाबदार राज्यपद्धतीचा प्रातिनिधिक स्वरूपातील गौरव आहे.- दत्ता भगत

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस