शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 09:00 IST

सरकार आज पडणार, उद्या कोसळणार असं छातीठोकपणे जो तो सांगत फिरणार. पण म्हणजे नेमकं काय होणार?" असं विचारलं की मात्र सगळे कावरेबावरे होणार!

- यदु जोशी

चार राज्यांमधील आणि त्यातही उत्तर प्रदेशमधील भाजपच्या धडाकेबाज विजयानंतर आता महाराष्ट्रात सत्ताबदल होणार अशी चर्चा सध्या जोरात आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं तर्क देत सुटला आहे. तर्कांच्या बाजारात अर्काचा मात्र पत्ता नाही. सरकार पडणार, आज जाणार, उद्या कोसळणार असं दावे के साथ सांगणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. असे लोक सुरुवात एकदम जोरात करतात पण "सरकार पडण्याचा फॉर्म्युला काय?"- असं विचारलं की जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखे कावरेबावरे होतात. काहीतरी होईल असं छातीठोकपणे सांगणारे लोक "नेमकं काय होईल?" असं विचारलं की गोंधळतात. 

टोकाचे भाजप विरोधक असलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी धाडकन कोसळेल असं वक्तव्य केल्यानं चर्चेला अधिकच बळ आलं खरं पण सरकार खरंच पडायचं असेल तर हवेत गोळीबार करून चालणार नाही. केवळ आशावाद वा कुणाच्या इच्छेवर ते पडू शकत नाही. कोणाला वाटतं म्हणून सरकार पडलं असतं तर ते आतापर्यंत हजार वेळा पडलं असतं ना भाऊ! ‘ कानून सबूत मांगता है और सरकार के लिए आकडा मंगता है भाई आकडा’...सत्तेचं गणित कुठूनही फिरवलं तरी ते भाजपच्या बाजूनं पडताना दिसत नाही. त्यांच्यासाठी आकड्यांच्या पिचकारीतून विजयाच्या रंगांची उधळण होणं कठीण दिसतं. 

भाजपवाले राष्ट्रवादीसोबत किंवा शिवसेनेसोबत बसतील ही रेकॉर्ड घासून गुळगुळीत झाली आहे. भाजपनं या दोन्ही पक्षांशी जो कमालीचा पंगा गेल्या दोन वर्षात घेतलाय त्यानं या दोन्ही शक्यता आता संपुष्टात आणल्या आहेत. अश्यावेळी राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती आहे. भाजप दोन्ही पक्षांवर मिसाइलवर मिसाइल फेकत आहे आणि महाविकास आघाडी सरकार भाजपशी १८५७ च्या बंडातील बंदुका घेवून लढत आहे. आता कुठे दरेकरांना हात लावला. मूळ भाजपच्या एकाही नेत्याला धक्का लावण्याची हिंमत राज्य सरकार अद्याप दाखवू शकलेलं नाही.

गिरीश महाजनांना गोत्यात आणायला निघाले होते पण देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यावर बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उत्तर देता देता चार दिवस लागले, यावरून काय ते समजून घ्या. ‘गोवर्धन’ पर्वत अडचणीत आल्याची किनार त्याला असू शकते.

देवेंद्र फडणवीस हे गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उद्या महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणण्यासाठीही तेच शिल्पकार ठरतील का? उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उप-शिल्पकार ठरतील का?. बंडोबा होवून लगेच थंडोबा झालेले अजित पवार आता बंड करण्याची ताकद गमावून बसले आहेत. ते स्वत:तील शक्तीचा विसर पडलेल्या हनुमानासारखे वाटतात. सूर्य गिळायला निघालेल्या हनुमानावर इंद्राने वज्रप्रहार केला अन् नंतर सगळ्या देवांनी मिळून त्याला शक्तीचं विस्मरण होईल असा शाप दिला होता. 

मोठ्या झाडाखालचं छोटं झाड असतं, तसं अजितदादांचं  झालं आहे. एकनाथ शिंदे बंड करतील असं वाटत नाही. जय भवानी, जय शिवाजी, भगवा अन् बाळासाहेब हे चार शब्द सोडून ते चार दिवसही राहू शकणार नाहीत. अजूनही भाजपसोबत गेलं पाहिजे असा आग्रह पक्षनेतृत्वाकडे आणि तोदेखील अप्रत्यक्षपणे धरण्याइतपतच त्यांची मजल जावू शकेल.ते ठाणेदार आहेत, ठाणेदारच राहतील.

विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. विधानभवनच्या पायऱ्यांवर, पायऱ्यांखाली आजीमाजी मंत्री आमदार, पत्रकारांच्या चर्चा झडत असतात. काही जण छातीठोकपणे दावे-प्रतिदावे करत असतात. त्यातलेच एक अंदाज देत होते की तब्येतीच्या अनेक मर्यादा असलेले मुख्यमंत्री एक-दोन महिन्यात उपचारांसाठी अमेरिकेला जातील आणि त्यापूर्वी मोठा बदल होईल. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद ही जिद्द पूर्ण झाल्यानं ते आता मित्रपक्ष राष्ट्रवादीला संधी देतील आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील. सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून पक्ष त्यांना हस्तांतरित करणं मोठ्या साहेबांना सोपं जाईल... आणि मग आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील.

काँग्रेसचे दिवसच वाईट

यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही असं गेल्या अधिवेशनादरम्यान याच स्तंभात लिहिलं होतं, आता  पुन्हा तेच लिहिण्याची वेळ आली आहे. नाना पटोले यांनी ज्या घाईघाईत अध्यक्षपद सोडलं ते टाळलं असतं तर आजची वेळ आली नसती असंही बोललं जातं. राज्यपालांनी अपेक्षेनुसार खोडा टाकलाच पण काँग्रेसचे मित्रपक्षही अध्यक्षपद काँग्रेसला देण्याबाबत उत्सुक दिसत नाहीत. काँग्रेसचे एकूणच  वाईट दिवस सुरू आहेत.

अजितदादांचा विक्रम मोडला-

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांच्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नेत्याच्या नावे हा विक्रम होता. २०१९ च्या निवडणुकीत ते १६,६५,२६७ मतांनी जिंकले. आजवर देशात एवढं मताधिक्य कोणी घेतलेलं नव्हतं.

यावेळी उत्तर प्रदेशात दोघांनी त्यांचा हा विक्रम मोडला. साहिबाबादमधून भाजपचे सुनीलकुमार शर्मा २,१४,८३५ मतांनी जिंकले. नोएडामधून १,८१,५१३ मतांनी जिंकलेले पंकज सिंग हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे पुत्र आहेत. आता २०२४ मध्ये अजिदादांना नवा विक्रम करावा लागेल. तेव्हाही त्यांच्या विरोधात गोपीचंद पडळकरच लढावेत ही इच्छा ते नव्या विक्रमासाठी करीत असावेत.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस