शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मान्सूनच्या आविष्काराची नासाडी नको!

By वसंत भोसले | Updated: June 12, 2018 00:44 IST

मान्सूनचा पाऊस हा निसर्गाचा आविष्कार. त्याला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास आपण शिकलो नाही. तो दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण्यासाठी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या जोराबरोबर येणा-या ढगांकडे डोळे लागलेले असतात. तो प्रथम लक्षद्वीप समूहाच्या बेटावर येतो. दिवस उगवेल तेव्हाच आपण निसर्गाची आराधना केली असे होईल. '

दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण्यासाठी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या जोराबरोबर येणा-या ढगांकडे डोळे लागलेले असतात. तो प्रथम लक्षद्वीप समूहाच्या बेटावर येतो. केरळमध्ये प्रवेश करतो. एका सप्ताहात तो धावत धावत कोकण किनारपट्टीवरून पश्चिम घाटाला गवसणी घालतो. संपूर्ण कोकणाला ओलेचिंब करीत घाटमाथ्यावर बरसायला सुरुवात करतो आणि त्याच्या आविष्काराबरोबर कडक उन्हाने तावून निघालेल्या जमिनीचा नूरच बदलून जातो.घाटमाथ्यावर एव्हाना पेरण्यांची तयारी झालेली असते. नद्यांच्या पात्रातील कोल्हापुरी टाईप बंधा-यांच्या फळ्या काढून मान्सूनच्या पावसाच्या सरींनी धो धो वाहणा-या पाण्याला वाट करून दिलेली असते. धरणांचे दरवाजे बंद करून साठा करण्याची तयारी होते. या साठ्याची दररोज सुरू होते मोजदाद. गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसाची रोज सकाळी ८ वाजता आकडेवारी जाहीर होते.हा मान्सून पुढे विंध्य पर्वतापर्यंत धावत जातो. त्याला अडून खानदेश आणि विदर्भाची काळीभोर जमीन ओली करून सोडतो. पूर्व विदर्भातील जंगलात तर तो धो धो कोसळतो. दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधनाने निर्माण झालेले वाण पेरले जाते. त्याला धान म्हणतात. अशी ही उत्तम शेती पिकविणारा मान्सूनचा पाऊसच दैवत आहे.चालूवर्षी तो वेळेवर आला आहे. नद्या-नाल्यांना तांबडे पाणी वाहू लागले आहे. हा मान्सून दूरवर अद्याप पोहोचायचा आहे. तो अगदी भारताच्या अतिपूर्वेकडील ईशान्य प्रांतापर्यंत जाणार आहे. महाराष्टÑाचा क्रमांक केरळ, कर्नाटक आणि गोव्यानंतर लागतो. त्यामुळे खरीप हंगामाचा हमखास पेरा होतो. गेल्या काही वर्षात तो वेळेवर आला नाही. पुरेसा बरसला नाही. परतीचा पाऊसही वेळेवर पडला नाही. त्याचा फटका पिकांना बसला.असा हा मान्सून मराठी माणसाच्या जीवनाचा भाग झाला आहे. कृष्णा, गोदावरी आणि नर्मदा नद्यांच्या खोºयातील सर्व नद्या तो वाहत्या करतो आहे. त्यावर बांधलेल्या धरणांची कवाडे भरतो आहे. ते पाणी आपण वर्षभर वापरतो आहोत. मान्सून निसर्गदत्त आहे. त्याचे पाणी म्हणजे नैसर्गिक आविष्कारच आहे. तो भरभरून देतो. कृष्णा खोºयात तर जवळपास चार हजार टीएमसी पाणी वापरण्यायोग्य देतो. जमिनीत मुरणारे, विहिरीत साचणारे याची गणती किती तरी अधिक पटीची असणार आहे. त्या पाण्याचा वापर करताना मात्र आपण गैर वागतो आहे. निसर्गाने दिलेली ही देणगी नाश होणार नाही, खराब होणार नाही याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. गंगा आणि यमुना नद्यांच्या खोºयाप्रमाणेच कृष्णा नदीच्या खोºयातील सर्वच नद्यांचे साठविलेले पाणी खराब करीत आहोत. ते वापरून परत नद्यांमध्ये सोडून मूळ प्रवाहच नष्ट करीत आहोत. येत्या काही दिवसांत इतिहासप्रसिद्ध शाहूकालीन राधानगरीचे धरण तुडुंब भरेल. कोयना धरण भर भर भरत जाईल. पंचगंगेवरील पाचही धरणे महिन्याभरात भरून वाहू लागतील. या पाण्यावर ऊसशेती फुलणार आहे. माणसाची आणि पशु-पक्ष्यांची तहान भागणार आहे. उद्योगांना पाणी मिळणार आहे. त्याची नासाडी व्हायला नको! निसर्गाच्या या आविष्काराला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास अद्याप आपण शिकलो नाही. तो दिवस उगवेल तेव्हाच आपण निसर्गाची आराधना केली असे होईल. मान्सूनच्या आगमनाचे स्वागत करताना हा निर्धार करू या!(bhosalevasant@gmail.com)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊस