शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘पाकिस्तानशी चर्चा नको’ हे धोरण चुकीचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 05:11 IST

भारताने पाकिस्तानबरोबर बोलणी करावी का? भारताच्या विरोधात दहशतवादाचे समर्थन जोपर्यंत पाकिस्तानकडून होत आहे, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, ही पारंपरिक विचारधारा आहे. सध्या तरी आपण याच धोरणाचा अंगीकार करताना दिसतो.

-पवन के. वर्मा(राजकीय विश्लेषक)भारतानेपाकिस्तानबरोबर बोलणी करावी का? भारताच्या विरोधात दहशतवादाचे समर्थन जोपर्यंत पाकिस्तानकडून होत आहे, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, ही पारंपरिक विचारधारा आहे. सध्या तरी आपण याच धोरणाचा अंगीकार करताना दिसतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण समारंभाला पाकिस्तानला निमंत्रण देण्यात आले नव्हते. बोलणी सुरू व्हावीत, याविषयी पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी पाठविलेल्या संदेशांना भारताने प्रत्युत्तर दिले नाही. बिश्केकपरिषदेसाठी जाताना नरेंद्र मोदींच्या विमानाला पाकिस्तानातील हवाई हद्दीतून जाऊ देण्याचा पाकिस्तानचा देकार मोदींनी नाकारला. इतकेच नव्हे, तर बिश्केक येथील शांघाय सहकार्य शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांची अधिकृत वा अनधिकृत बैठक होऊ शकली नाही!भारताच्या विरोधात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे दिसत असताना (अलीकडच्या पुलवामा हल्ल्यात तो स्पष्टच होता.) आपली कडक भूमिका योग्यच म्हणावी लागेल. बोलणी आणि दहशतवाद एकत्र नांदू शकत नाही, हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोचायलाच हवा. यापूर्वी भारताने जसे पाकिस्तानला माफ करून विसरून जाण्याचे धोरण स्वीकारले होते आणि पाकिस्तानसोबत साधारण स्थिती लागू करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच धोरणाची पाकिस्तानची अपेक्षा होती, पण अशा मवाळ भूमिकेमुळेच पाकिस्तानने एकीकडे आक्रमक दहशतवादी हल्ले करतानाच, दुसरीकडे भारताचे लांगुलचालन करण्याची नीती अवलंबिली होती. या भूमिकेचा आपण त्याग करून कठोर भूमिकेचा स्वीकार करायला हवा.पण असे असले, तरी शेजारी राष्ट्रांच्या दोन्ही नेत्यांनी बालिशपणा करून एकमेकांविरुद्धच्या शत्रुत्वाच्या भावनेचे प्रदर्शन जगासमोर करणे कितपत योग्य होते? शांघाय शिखर परिषदेत इम्रानखान आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना अभिवादनही केले नाही, ही गोष्ट पुतिन की जिनपिंग आणि अन्य जागतिक नेत्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितली! पूर्व नियोजित किंवा साधारण चर्चा करण्याचे आपले धोरण नसले, तरी शिखर परिषदेसारख्या महत्त्वाच्या बैठकीत शत्रूराष्ट्रांनी मूलभूत शिष्टाचाराचे पालन न करण्याइतक्या गोष्टी ताणायला हव्यात का? चर्चा करायची की करायची नाही, हा राष्ट्राच्या धोरणाचा भाग असू शकतो. त्याचे काय परिणाम होतील, ते भोगण्याचीही तयारी ठेवावी लागते. अशा वेळी राष्ट्राचे हित हेच सर्वात महत्त्वाचे असते. चर्चेने राष्ट्रहित जर साधणार असेल, तर आपण बोलायला हवे. ते होत नसेल तर बोलायची गरज नाही. अशा निर्णयाचे काय परिणाम होतील, त्याची योग्य तपासणी करून मगच त्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा.याबाबत चाणक्य नीती काय होती, ती समजून घेण्याची गरज आहे. राजकारणात चर्चा करणे, चर्चा न करणे ही काही अंतिम स्थिती राहू शकत नाही. मुख्य दृष्टी राष्ट्रीय हित साधण्याची हवी. चाणक्याचे धोरण त्यांच्या साम, दाम, दंड, भेद या चार तत्त्वांत सामावलेले आहे. तडजोड, आमिष दाखवून, शासन करून किंवा विध्वंसाने गोष्ट साध्य करा, असे चाणक्यांचे म्हणणे होते. त्यात आणखी एक पाचवा पर्याय म्हणजे कुंपणावर बसण्याचा. चांगल्या परराष्ट्र धोरणात या तत्त्वांचा वापर केला जातो. बालाकोटवरील हल्ला हे ‘दंड’ तत्त्वाचे चांगले उदाहरण आहे. त्याचा पुढचा भाग म्हणून पाकिस्तानने चर्चेचा पुढे केलेला हात आपण नाकारत असतो!पण ‘दंड’ धोरण हे नेहमीसाठी उपयुक्त ठरते काय? पुलवामासारखे हल्ले आपल्या भूभागात होत राहिले, तर बालाकोटसारखे प्रतिहल्ले करण्यात काहीच चुकीचे नाही, पण प्रत्येक बाबतीत पाकिस्तानला अस्पृश्यतेची वागणूक दिल्याने दंडनीती निष्प्रभ ठरण्याची शक्यता असते, तसेच भारताशी चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे, पण भारतच त्याला तयार नाही, असा डिंडीम जागतिक पातळीवर वाजविणे पाकिस्तानला शक्य होते. दोन अण्वस्त्र सज्ज राष्ट्रे सतत भांडणाच्या स्थितीत असणे हा साºया जगासाठी चिंतेचा विषय ठरतो. सर्वात चांगले धोरण हे राहील की, आपण निवडलेल्या वेळेला आपल्या अटींवर आणि अजेंड्यावर चर्चा करण्याची आपण तयारी ठेवणे. या अजेंड्यात दहशतवादाच्या मुद्द्याला प्राधान्य असावे. त्यामुळे भारत हा तडजोडीसाठी तयार आहे, हे जगाच्या लक्षात येईल.आपले पंतप्रधान कोणतेही नियोजन नसताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विमानाने त्या देशात जातात आणि दुसºया खेपेस त्या देशाच्या नव्या प्रधानमंत्र्यांना शुभेच्छाही देण्यासाठी जात नाहीत! भावनात्मकता आणि नियोजन किंवा आत्मप्रेरणेने वागणे आणि दीर्घमुदतीचे धोरण बाळगणे या गोष्टी तेल आणि पाण्यासारख्या असतात. त्या एकमेकात मिसळत नाहीत, ही चाणक्याची शिकवण आपण लक्षात ठेवायला हवी. मला वाटते परस्परांना शुभेच्छाही न देण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर एकमेकांच्या डोळ्यालाही डोळा न भिडविण्याच्या आपल्या धोरणाचा आपण फेरविचार करायला हवा. मुत्सद्दीपणा हे आपले धोरण असायला हवे. त्यात बालिशपणा नसावा. मुत्सद्दीपणात निर्धाराची अपेक्षा असते, आवश्यक त्या सामाजिक जाणिवांचा अभाव त्यात नसावा, मग शेजारी राष्ट्रांसोबतचे प्रश्न कोणतेही असोत!

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद