शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ताजमहालला ‘द्वेषाचे प्रतीक’बनवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:27 IST

ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये.

- सविता देव हरकरेताजमहालवर आपला हक्क सांगणाऱ्या सुन्नी वक्फ मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले हे फार चांगले झाले. ताजमहालवर हक्क हवा असेल तर आधी शहाजहाँची स्वाक्षरी असलेले दस्तावेज सादर करा असा आदेशच न्यायालयाने दिला. उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ मंडळाने २००५ साली ताजमहाल ही मंडळाची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. एवढेच नाहीतर शहाजहाँने या वास्तूचा मालकी हक्क मंडळाच्या सुपूर्द केला होता असा दावाही केला होता. ताजमहालवर दावा सांगण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे. ताजमहाल हा तेजोमहाल अर्थात श्रीशंकराचे देवस्थान असल्याचा जावईशोध या देशातील काही उपद्रवींनी लावला होता. न्यायालयाने तो सुद्धा फेटाळून लावला. आग्रा येथील ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. सतराव्या शतकात मुघल सम्राट शाहजहाँने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी अप्रतिम अशा ताजमहालची निर्मिती केली होती. तेव्हापासून ही वास्तू देशविदेशातील कलाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. परंतु अलीकडच्या काळात या ऐतिहासिक वास्तूवर नैसर्गिक आघातांसोबतच धार्मिक आणि राजकीय आघातही मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. तिचा इतिहास बदलण्याचे मनसुबे आखले जात आहेत. पुरातत्त्व विभाग आणि न्यायालयाने ताजमहालकडे वक्रदृष्टी टाकणाºया उपद्रवींचे नापाक इरादे वेळोवेळी उधळून लावले, हे खरे. पण कुणीही यावे टिकली मारूनी जावे असला प्रकार ताजमहालच्या बाबतीत सध्या अनुभवास येत असून हे या देशाचे आणि ही अप्रतिम वास्तू निर्माण करणाºया कलाकारांचे दुर्दैवच म्हणायचे. ताजमहालला राजकीय खेळीचा सामना करावा लागेल याचा तरी विचार कुणी केला होता का? पण तेही घडतेय. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तर ताजमहालला वाळीत टाकण्याचा जणू चंगच बांधण्यात आला. या राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळण्यात आले. विदेशी पाहुण्यांना भेट स्वरुपात ताजमहालची प्रतिकृती देण्याची परंपरा जाणीवपूर्वक मोडीत काढण्याचा असांस्कृतिक प्रकारही घडला. पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे शतकांपासून मोठ्या डौलाने उभ्या असलेल्या या वास्तूचे अस्तित्व तसेच धोक्यात आले आहे. तिचे मूळ रूपात जतन करण्याचे सर्वंकष प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून सुरु असले तरी प्रदूषणाच्या भीषणतेपुढे ते थिटे पडतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. परवा आलेल्या वादळात ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले अन् पांढºया रंगाचा छोटा घुमटही पडून तुटला. केवळ भारतवंशाचीच नव्हे साºया जगाची शान समजल्या जाणाºया ताजमहालच्या जपणुकीचे प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून सरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे ताजमहाल भविष्यातही असंख्य वर्षे असाच डौलाने उभा राहील, याबद्दल शंका नाही. पण त्याच्यावर होणारे धार्मिक आणि राजकीय आघात तसेच मिळणाºया परकेपणाच्या वागणुकीचे काय? ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये.

टॅग्स :Taj MahalताजमहालIndiaभारत