विघ्नहर्त्या, सप्टेंबरमध्ये जीएसटीचे विघ्न दूर कर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 05:39 AM2019-09-02T05:39:55+5:302019-09-02T05:40:15+5:30

करनीती भाग-३0१

Disruptors, remove the GST disruption in September | विघ्नहर्त्या, सप्टेंबरमध्ये जीएसटीचे विघ्न दूर कर

विघ्नहर्त्या, सप्टेंबरमध्ये जीएसटीचे विघ्न दूर कर

Next

उमेश शर्मा

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ‘विघ्नहर्ता’ भगवान गणेश सप्टेंबर महिन्यात येत असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. करदात्यांसाठी सप्टेंबर महिना सर्वात महत्त्वाचा आहे़ करदात्यांना या महिन्यात कोणत्या समस्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सप्टेंबर महिना हा करदात्यांसाठी खरंच खूप महत्त्वाचा महिना आहे. ज्या करदात्यांना आॅडिट लागू आहे त्या करदात्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे ‘इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्ट’ ३० सप्टेंबर २0१९ पर्यंत दाखल करावे लागेल. त्यात करदात्यांना जीसीटीचीही माहिती देणे गरजेचे आहे. करदात्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीएसटी रिटर्नमध्ये झालेल्या चुका सुधारण्याची शेवटची संधी सप्टेंबर महिन्यात आहे.

अर्जुन : कृष्णा, करदात्यास जीएसटी आॅडिट रिपोर्ट २०१७-१८ आणि ‘इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्ट’ २०१८-१९ मध्ये काय विघ्न येऊ शकतात?
कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २०१७-१८ जीएसटीचे अ‍ॅन्युअल रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख ३0 नोव्हेंबर २0१९ आहे. परंतु ‘इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्ट’ दाखल करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे़ करदात्यांना आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या समयोजना आर्थिक वर्षासाठी असलेल्या जीएसटीआर-९ मधील टेबल नं. १०, ११, १२ व १३ मध्ये काळजीपूर्वक नोंदी कराव्या लागतील. आर्थिक वर्ष २०१८-१९ चे बुक्स आॅफ अकाउंट्स ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत निश्चित करावी लागतील. करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१७-१८ मधील जीएसटी लायबिलिटीचा परिणाम लक्षात घेऊन त्याला २०१८-१९ च्या बुक्समध्ये समाविष्ट करावे.

अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्टमध्ये जीएसटीची माहिती समाविष्ट करताना करदात्यांना कोणत्या विघ्नांना सामोरे जावे लागेल?
कृष्ण : अर्जुना, इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्टमध्ये जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या संस्थांच्या एकूण खर्चाचे विभाजन करण्याच्या अडचणीस सामोरे जावे लागेल. म्हणजेच एकूण खर्चाची विभागणी अशी असेल - वस्तू व सेवा ज्यांच्यावर जीएसटी लागू होत नाही, कम्पोझिशन योजनेअंतर्गत असलेल्या संस्था, जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या संस्था आणि इतर नोंदणीकृत संस्था. म्हणून करदात्यांनी इन्कम टॅक्स आॅडिट रिपोर्टअंतर्गत सादर करण्यासाठी लागणाऱ्या माहितीची काळजीपूर्वक तयारी करून ठेवावी.
अर्जुन : कृष्णा, सप्टेंबर महिन्याचे जीएसटी रिटर्न दाखल करताना कोणती विघ्ने येऊ शकतात?
कृष्ण : अर्जुना, आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या जीएसटी रिटर्नमध्ये झालेल्या चुका सुधारण्याची शेवटची संधी सप्टेंबर महिन्यात दाखल होणाºया रिटर्नमध्ये आहे. करदात्यांनी जीएसटी रिटर्न आणि बुक्स आॅफ अकाउंट्सशी जुळवणी करून घ्यावी. करदात्यांनी रिटर्नमध्ये दाखल न केलेले परंतु बुक्स आॅफ अकाउंट्समध्ये दाखल केलेल्या व्यवहारांचा तपशील द्यावा. जुळवणी करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अ‍ॅन्युअल रिटर्न आणि आॅडिट रिपोर्टला अंतिम रूप येईल.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध
घ्यावा?

कृष्ण : अर्जुना, करदात्यांना त्यांचे विघ्न दूर करण्यासाठी सप्टेंबर महिना हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात विघ्नहर्ता गणपतीचेही आगमन झाले आहे. जीएसटीचे रिव्हाइज रिटर्न दाखल करता येणार नाही ही सर्वात मोठी अडचण करदात्यांसमोर उभी आहे. सरकारने रिव्हाइज रिटर्न दाखल करण्याची योजना आणावी आणि करदात्यांचे विघ्न दूूर व्हावे हीच विघ्नहर्त्याकडे प्रार्थना असेल.

( लेखक सीए आहेत )

Web Title: Disruptors, remove the GST disruption in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.