शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

एक मुलखावेगळी मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 04:12 IST

मजल दरमजल करत आम्ही मनाने परवा दिल्लीचा फेरफटका मारून आलो. द्वापारयुगात नारदांचा जसा त्रिलोकी संचार असायचा, तसा कलयुगी आमचा असतो. समर्थांच्या कृपेने कल्पनाशक्तीच्या जोरावर अवघे ब्रह्मांड मनचक्षुसमोर उभे करण्याचे सामर्थ्य आम्हांस लाभले आहे.

- नंदकिशोर पाटीलमजल दरमजल करत आम्ही मनाने परवा दिल्लीचा फेरफटका मारून आलो. द्वापारयुगात नारदांचा जसा त्रिलोकी संचार असायचा, तसा कलयुगी आमचा असतो. समर्थांच्या कृपेने कल्पनाशक्तीच्या जोरावर अवघे ब्रह्मांड मनचक्षुसमोर उभे करण्याचे सामर्थ्य आम्हांस लाभले आहे. कळी लावणे, कलागती करणे यात तर आमचा भारीच हातखंडा! किंबहुना, तोच आमच्या धंद्याचा कोडमंत्र. असो. तर सांगायचा मुद्दा असा की, राजधानी दिल्लीतील १० अकबर रोडवर भटकत असताना काहीतरी तळल्याचा (जळल्याचा नव्हे!) घमघमाट सुटला होता. जमेल तेवढे नाक फुगवून आम्ही अदमास घेण्याचा प्रयत्न केला असता कुणाच्या तरी घरी पकोडे, भुजिया, फाफडाचा बेत शिजत असल्याचे जाणवले. खात्री पटावी म्हणून फाटकामागून फाटकं किनकिनी करत आम्ही तिथल्या बंगल्यांमध्ये नाक खुपसले. काहींना आमचे असे नको तिथे नाक खुपसणे न खुपल्यामुळे त्यांनी फटीतूनच फटके मारले. नशीब बलवत्तर. अन्यथा, आम्हीही शूर्पणखा झालो असतो! असो. शेवटी त्या बंगल्यात आम्ही गनिमी काव्याने प्रवेश केला. अहाहा!! काय तो मिष्टान्नयोग! येथेच्छ ताव मारून तृप्तीची ढेकर देणार तोच एका दाढीधारी भार्इंनी आम्हांस हटकले. नाव, गाव आणि पेशा जाणून घेतल्यानंतर आमच्याकडे अत्यंत तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून ते तरातरा आतमध्ये निघून गेले. शत्रूच्या गोटातील कुणी गनिम असावा, असा कदाचित त्यांचा ग्रह झाला असावा. मग आम्ही त्यांच्या सेवकांना विनंती केली की, आम्हांस मिष्टान्न नव्हे, तर भाईश्रींची मुलाखत हवी आहे. अनंतवार विनवणी केल्यानंतर भार्इंनी आम्हांस बैठकीच्या दालनात पाचारण केले. पार गुडघ्यापर्यंत वाकून नमस्कार करत आम्ही आमच्या मनातील साºया शंका-कुशंकांचे समाधान करून घेतले.-भाईश्री, आपण अध्यक्ष झाल्यापासून आपल्या पक्षाने १९ राज्यांमध्ये सत्ता हस्तगत केली, याचे श्रेय आपण कुणाला देता. स्वत:ला, पक्षाला की नमोजींना?भाईश्री: काँग्रेसला!-गुजरातमध्ये आपणास पुन्हा विजय मिळाला, पण खूप दमछाक झाली. जागाही कमी झाल्या, हे कशामुळे घडले?भाईश्री: काँग्रेसमुळे!-येत्या काही महिन्यात राजस्थान, कर्नाटक आदी राज्यात निवडणुका आहेत. तिथे प्रचाराचा मुद्दा काय असेल?भाईश्री: अर्थातच काँग्रेस!-गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळातील आपल्या सरकारची ठळक कामगिरी काय?भाईश्री: काँग्रेस की सफाई!- देशाचा विकास दर आणि शेअर मार्केटचा निर्देशांक सतत घसरत आहे. औद्योगिक उत्पादनही घटले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा हा परिणाम आहे का?भाईश्री: यह तो काँग्रेस का पाप है!-अच्छे दिन, प्रत्येकी १५ लाख आणि १० कोटी युवकांना रोजगाराचे काय झाले?भाईश्री: काँग्रेस परिवारवादी पार्टी है!-सत्तेवर येताच आपण पाकिस्तानला अद्दल घडविणार होतात. पण आज राजरोसपणे आतंकवादी हल्ले करत आहेत, आपले जवान शहीद होताहेत, तरीही आपण गप्प का?भाईश्री: काँग्रेसने देश का विभाजन किया है, इस का जबाब भी काँग्रेसने देना चाहिए! 

टॅग्स :Amit Shahअमित शाह