शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रोबोने विद्यार्थिनीला मिठी मारली? पण खरी गोष्ट पुढे आहे; उद्या तो काय करेल अन् आपण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 08:44 IST

प्रश्न रोबोने खरोखरच स्वत:हून मिठी मारली का, याचा नाही... प्रश्न आहे, उद्या तो काय करेल आणि आपण त्यासाठी तयार आहोत का?..

पवन देशपांडे, सहायक संपादक, लोकमत

कल्पना करा... तुम्ही एका सांस्कृतिक कार्यक्रमात बसलेले आहात. मंचावर विद्यार्थी नृत्य करत आहेत. सगळं अगदी सुरळीत चालू आहे... आणि अचानक - बाजूला काम करत असलेला रोबो विद्यार्थिनीजवळ जातो आणि तिला मिठी मारतो! क्षणभर टाळ्या थांबतात... चेहऱ्यावरचं हसू गोठतं... आणि डोक्यात एकच प्रश्न घुमतो - हे नेमकं काय झालं? बीजिंगमधील या घटनेने केवळ एक व्हायरल व्हिडीओच दिलेला नाही, तर एक मोठी चर्चा रंगवली आहे. एआय आणि रोबो आता आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहेत का? 

आजचा रोबो म्हणजे केवळ लोखंड आणि वायरचा पुतळा नाही. त्याच्या ‘डोक्यात’ असते कृत्रिम बुद्धिमत्ता.. म्हणजेच एआय. रोबोला पाहायला, ऐकायला, समजून घ्यायला आणि निर्णय घ्यायला एआयच शिकवते. कॅमेरे त्याचे डोळे असतात, सेन्सर्स त्याची त्वचा असतात आणि अल्गोरिदम त्याचा मेंदू असतो. त्यामुळे तो केवळ आदेश पाळत नाही, तर परिस्थिती ओळखून प्रतिक्रिया देतो. पण इथेच सगळा खेळ आहे, कारण एआय कितीही प्रगत झाले तरी ते ‘डेटा’वर चालते. एआयला जे दिसते, जे कळते, त्यावरच त्याचा निर्णय होतो. जर त्या डेटामध्ये गोंधळ झाला, सिग्नलमध्ये व्यत्यय आला किंवा सेन्सरने चुकीची माहिती दिली तर निर्णयही चुकतो. आणि बीजिंगमध्ये नेमके तेच घडले.

कार्यक्रमादरम्यान अनेक ड्रोन उडत होते. त्यांच्या सिग्नलमुळे रोबोच्या नियंत्रणात अडथळा आला. एआयला मिळणारा इनपुट गोंधळला... आणि आउटपुट? अनपेक्षित मिठी! आता प्रश्न असा की ही केवळ तांत्रिक चूक होती का, की एआयने स्वतःहून काहीतरी केले? सोशल मीडियावर लगेच चर्चा पेटली. काहींना वाटले, एआय आता ‘मानवी वर्तन’ शिकून स्वतः निर्णय घेऊ लागले आहे. तर काहींनी स्पष्ट सांगितले की ही तांत्रिक चूक आहे. कारण, एआय अजून माणसासारखा विचार करत नाही. त्याला भावना नाहीत, हेतू नाहीत आणि जाणीव तर अजिबात नाही. पण एआय ‘शिकते’ आणि शिकताना कधी कधी अशा पद्धतीने प्रतिक्रिया देते, जी आपल्याला मानवी वाटते. म्हणूनच हा गोंधळ निर्माण होतो.

पण खरी चिंता इथे संपत नाही... ती इथूनच सुरू होते. आज आपण रोबोला नाचवतो आहोत. उद्या तो आपल्या घरात असेल. स्वयंपाक करत, वृद्धांची काळजी घेत, मुलांना शिकवत असेल. सध्याही रुग्णालयात तो ऑपरेशनमध्ये मदत करतोच, त्यात आणखी वाढ होईल. रस्त्यावर तो वाहन चालवेल. अशा वेळी जर एका छोट्या सिग्नलच्या गोंधळामुळे तो चुकीचा निर्णय घेत असेल, तर त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, याचा विचार करा. म्हणूनच आता एआयच्या जगात ‘स्मार्ट’ असण्यापेक्षा ‘सेफ’ असणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे.

एआयला केवळ काम शिकवणे पुरेसे नाही, तर मर्यादा शिकवणे गरजेचे आहे. माणसाच्या पर्सनल स्पेसचा आदर कसा करायचा, कोणत्या परिस्थितीत थांबायचे, कोणत्या हालचाली टाळायच्या हे सगळे कोडमध्येच लिहावे लागेल. म्हणजेच, एआयमध्ये ‘एथिक्स’- नैतिक वर्तनाचे संकेत घालावे लागतील.त्याचबरोबर, प्रत्येक रोबोवर मानवी नियंत्रणाचा एक स्तर कायम ठेवावा लागेल. ‘किल स्विच’सारख्या यंत्रणांनी एका क्षणात रोबो थांबवता आला पाहिजे. सिग्नल सिस्टम अधिक सुरक्षित करावी लागेल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी कठोर चाचण्या आणि नियम लागू करावे लागतील.बीजिंगमधील ही मिठी कदाचित निरुपद्रवी होती. त्या विद्यार्थिनीला कोणतीही इजा झाली नाही. पण ही घटना एक इशारा आहे. एआय अजूनही शिकत आहे... आणि आपणही शिकत आहोत की, एआयसोबत कसे जगायचे? शेवटी, प्रश्न रोबोने मिठी मारली का, याचा नाही... प्रश्न आहे उद्या तो काय करेल आणि आपण त्यासाठी तयार आहोत का?..    pavan.deshpande@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Robot's Hug Raises AI Safety Concerns: Are We Prepared?

Web Summary : A robot hugging a student in Beijing sparks debate about AI safety. The incident highlights potential risks as AI advances, emphasizing the need for ethical guidelines, human oversight, and rigorous testing to prevent future unintended consequences.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल