शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष वाढला की सूज आली?

By अतुल कुलकर्णी | Updated: August 8, 2018 05:48 IST

प्रिय रावसाहेब,नमस्कार. जळगाव आणि सांगलीत आपल्या पक्षाने भरभरून मते मिळवली आणि या दोन महापालिकेत कमळ फुलले हे चांगले झाले. त्यासाठी आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे. पण भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांनी काही प्रश्न या निमित्तानं लिहून पाठवलेत. त्यांची उत्तरे कुणाकडून मिळतील अशी विचारणा त्यांनी केलीय. आपण जर यावर काही प्रकाश टाकू शकलात ...

प्रिय रावसाहेब,नमस्कार. जळगाव आणि सांगलीत आपल्या पक्षाने भरभरून मते मिळवली आणि या दोन महापालिकेत कमळ फुलले हे चांगले झाले. त्यासाठी आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे. पण भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांनी काही प्रश्न या निमित्तानं लिहून पाठवलेत. त्यांची उत्तरे कुणाकडून मिळतील अशी विचारणा त्यांनी केलीय. आपण जर यावर काही प्रकाश टाकू शकलात तर बरे होईल.वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या, पक्ष वाढावा म्हणून कष्ट केलेल्या काही कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे की हा विजय आपल्या पक्षाचा आहे की बाहेरच्या पक्षातून आपल्या पक्षात आलेल्यांचा? कन्फ्यूज्ड् झाले आहेत सगळे. एक कार्यकर्ता तर डोकं भणभण करायला लागलंय असे म्हणत होता. प्रश्नच प्रश्न. काय करावं सुचत नाही असे म्हणला. सांगलीत डझनाहून अधिक आयात केलेले अनेकजण निवडून आले. या आधी पण राज्यात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या ठिकाणी आयाराम, गयारामांनाच जास्ती महत्त्व आले.निवडणुकीच्या तोंडावर जे स्वत:चा पक्ष सोडून आपल्याकडे येतात त्यांना आपण निष्ठावान म्हणायचे का? जर ते निष्ठावान तर मग आपल्या पक्षात वर्षानुवर्षे काम करणारे आणि ज्यांना सत्तेचे कोणतेही लाभ मिळत नाहीत त्यांना काय म्हणायचे? निष्ठा ठेवणारे महत्त्वाचे, की निसटून इकडे तिकडे जाणारे महत्त्वाचे? या प्रश्नांची उत्तरं कुणी द्यायची असेही तो कार्यकर्ता विचारत होता.जळगावात तर लोकांनी रांगा लावून मतदान केले आणि नंतर रांगा लावून दहा रुपयाच्या नोटाच्या बदल्यात ५०० रुपयाची नोट नेली म्हणे. हजार रुपये द्यायचे ठरले होते. त्यापैकी ५०० रुपये अ‍ॅडव्हॉन्स दिले, आणि सोबत १० रुपयाची एक नोट पण दिली. मतदान करून आल्यानंतर ती विशिष्ट नोट दाखवली की दुसरे ५०० रुपये मिळत होते. त्यासाठी देखील लोकांनी रांगा लावल्या होत्या असे एका न्यूज चॅनलवर दाखवत होते. रांगेतल्या बाया बापड्या आशेने उभ्या होत्या. त्या कोणत्या पक्षाच्या होत्या? त्यांचा आपला काही संबंध होता का? ज्या बंगल्यापुढे ती लांबच लांब रांग लागली होती तो कुणाचा होता? कुणी म्हणत होतं भाजपवाल्याचा होता.खरं, खोटं काही तुम्हाला कळालं तर आम्हाला पण सांगाल का? उगाच आपल्याला पण माहिती असावी म्हणून विचारले साहेब. पालघरमध्ये आपण ३० खोके दिले म्हणे. ते देखील काँग्रेस सोडून आपल्या पक्षात आलेल्या माणसासाठी...! लोक काय बोलतील आणि काय नाही याचा काही नेम नाही बघा साहेब. खरंच ३० खोके दिले साहेब...? पोलिसांना कोणतीही गाडी अडवायची, तपासायची नाही अशा सूचना होत्या म्हणे..?या सगळ्यामुळे आपली शक्ती वाढली की सूज..? कारण अजूनही आपला खरा कार्यकर्ता महामंडळाच्या नियुक्त्या, विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची पदं याच्याच प्रतीक्षेत आहे आणि बाहेरून आलेल्यांना खासदारकी, आमदारकी, नगरसेवकपद मिळताना पाहतो आहे. याचे उत्तर आहे का आपल्याकडे असेही तो विचारत होता. साहेब, ते तटकरे, भुजबळ, अजितदादा, जयंत पाटील आपल्या सोबत येणार आहेत अशी बातमी आहे, ती खरी आहे का हो...? 

टॅग्स :BJPभाजपा