शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

आभासी चलनापेक्षा ‘डायमंड’ बरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:47 AM

गेल्या सहा महिन्यांत आभासी चलनातील (व्हर्चुअल करन्सी) घटनांमुळे प्रकाशझोतात आलेल्या डॉ. अमित लखनपाल यांनी आता डायमंड व्यवसायात उडी घेतली आहे. ‘ब्लॉकचेन अ‍ॅप’वर आधारित असलेल्या त्यांच्या या नव्या प्रयोगाविषयी.

विनायक पात्रुडकर 

गेल्या काही वर्षांत ‘डायमंड’ची मागणी प्रचंड वाढली आहे. सोन्याचे आकर्षण कायम असले तरी डायमंडची बाजारपेठ विस्तारते आहे. भारतीयांनीही डायमंडमध्ये उत्सुकता दाखवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच अल् कासीर ग्रुपने डायमंड व्यवसायात उडी मारली. अल् कासीर ग्रुपची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. आॅगस्टपासून आॅनलाइनवर हे व्यवहार उपलब्ध होतील. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल १०० टक्क्यांची सूटही या कंपनीने दिली आहे. अर्थात काही दिवसांसाठीच ही सूट असेल.तब्बल सहा महिन्यांपूर्वी मनी ट्रेड कॉइन ग्रुपचे सर्वेसर्वा डॉ. अमित लखनपाल यांनी आभासी चलनाच्या व्यवसायात प्रवेश केला होता. दुबईतून त्यांनी ही घोषणा केली होती. त्या वेळी या चलनाची जगभर चलती होती. ‘बिट कॉइन’ किंवा अन्य चलनांच्या माध्यमातून हा व्यवहार होत असे. पैसे दुप्पट, तिप्पट आणि चौपट होण्याच्या मोहापायी लाखो लोकांनी या आभासी चलनात गुंतवणूक केली; परंतु त्याच वेळी याची कोणतीही कागदोपत्री नोंद नसल्याने तसेच आॅनलाइन व्यवहार असल्याने सरकारचे नियंत्रणही नव्हते. त्यामुळे चीनसह अनेक देशांनी हे आभासी चलन बेकायदा ठरविले. काही देशांनी थेट बंदी घातली. आपल्याकडेही हा व्यवहार समजायला उशीर झाला. मात्र, केंद्राने हे चलन बेकायदा ठरविले.भारतीय रुपयांमध्ये या व्यवहाराची किंमत तपासायची असेल, तर गेल्या सहा महिन्यांत क्रिप्टो करन्सीचा दर ७०० ते ८०० रुपयांवरून १५ हजार रुपयांपर्यंत गेला होता. अनेकांनी आपले उखळ यात पांढरे करून घेतले; परंतु त्याची कुठेच नोंद नव्हती. कोट्यवधीची गुंतवणूक तर झाली. मात्र, नोंद कुठेच नाही, त्यामुळे सरकारही गोंधळले होते. अनेकांनी काळा पैसा गुंतविल्याचा संशयही होता; परंतु त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडणे अवघड होते. अखेर केंद्राने हे चलनच बेकायदा ठरविले. भारताबरोबरच अनेक देशांनीही हे चलन बेकायदा ठरविले आहे. मात्र, काही देशांनी या चलनाला चक्क कायदेशीर स्वरूपही दिले आहे. भारतात इंटरनेटवर चालणाऱ्या या व्यवहाराचा तितका प्रसार नसल्याने त्याची चर्चा फार झाली नाही.हा क्रिप्टो करन्सीचा व्यवहार नेमका कसा असतो? कसा चालतो? या चलनी विश्वाचा आढावा घेणारे पुस्तक डॉ. अमित लखनपाल यांनी प्रकाशित केले. ‘द वर्ल्ड आॅफ क्रिप्टो करन्सी’ या नावाने हे पुस्तक असून, त्याची मोठी चर्चा झाली. मूळचे मुंबईकर असलेल्या लखनपाल यांनी रिअल इस्टेटच्या माध्यमातून व्यवसायात पाऊल ठेवले. त्यानंतर भारतीयांना फारशा माहीत नसलेल्या क्रिप्टो करन्सी व्यवसायात प्रवेश केला. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या चलनाविषयी गूढ वाढल्याने तसेच त्याची नकारात्मक चर्चा झाल्याने लखनपाल यांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला. त्यांना तर अनेक धमक्याही आल्या. या व्यवसायाची माहिती नसल्याने काहींना वाटले ‘क्रिप्टो करन्सी’चा दर लखनपालच ठरवितात. त्यामुळे दर वाढविला नाही तर कुटुंबाला धक्का पोहोचवू, अशा धमक्याही आल्या. त्यामुळे पुढील व्यवसाय त्यांनी दुबईतूनच चालविण्याचा निर्णय घेतला. तिथल्या शेख कुटुंबीयांसोबत ते डायमंड व्यवसायात उतरले. ‘ब्लॉकचेन अ‍ॅप’च्या माध्यमातून डायमंड खरेदी करता येणारा हा व्यवसाय त्यांनी आता सुरू केला आहे. मुख्य म्हणजे शरियत कायद्यांतर्गत याची नोंद ‘युराई’मध्ये झालेली असल्याने कायद्याने हा व्यवसाय आता चौकटीत आला आहे. अमित लखनपाल यांनी भारत सरकारच्या आयकर खात्याकडे क्रिप्टो करन्सीतील व्यवहाराची माहितीही दिली आहे. केवळ चुकीच्या माहितीआधारे आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या राजेशाही घराण्यातील शेख अहमद बिन आबेद अल् मख्तुम आणि अमित लखनपाल यांच्या संयुक्त विद्यमाने अल् कासीर ग्रुपतर्फे या नव्या कंपनीची घोषणा करण्यात आली.गेल्या काही वर्षांत ‘डायमंड’ची मागणी प्रचंड वाढली आहे. सोन्याचे आकर्षण कायम असले तरी डायमंडची बाजारपेठ विस्तारते आहे. भारतीयांनीही डायमंडमध्ये उत्सुकता दाखवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवरच अल् कासीर ग्रुपने डायमंड व्यवसायात उडी मारली. अल् कासीर ग्रुपची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. आॅगस्टपासून आॅनलाइनवर हे व्यवहार उपलब्ध होतील. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल १०० टक्क्यांची सूटही या कंपनीने दिली आहे. अर्थात काही दिवसांसाठीच ही सूट असेल. अमित लखनपाल यांनी क्रिप्टो करन्सी व्यवसायात हात पोळल्यानंतर थेट डायमंडमध्ये उडी घेऊन नव्या व्यवसायासाठी जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. अनेक भारतीय तरुण त्यांच्याकडे कामाला आहेत. रोजगाराच्या नव्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. कुठल्याही मध्यस्थींना या व्यवहारात ओढू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.अल् कासीरच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर थेट डायमंड खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. थेट शो-रूम उघडण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. युरोप, इंग्लंड, दक्षिण-मध्य आशिया, अरब देशांमध्ये जवळपास १००० स्टोअर ते उघडणार असून, त्यातून थेट डायमंड मिळण्याची व्यवस्था ते उपलब्ध करून देणार आहेत. आभासी चलनामध्ये थेट चलन उपलब्ध होण्याची कोणतीच रचना नव्हती. या चलनाचे रूपांतर आता डायमंडमध्ये करता येणार आहे. त्यामुळे या व्यवहारात विश्वासार्हता वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या नव्या व्यवसायाला कितपत यश मिळते ते येत्या वर्षभरात कळेलच.

टॅग्स :Goldसोनं