शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिन संचलनाचे समालोचक : जसदेवसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 03:27 IST

अमीन सयानी...आकाशवाणीवरील आवाजाच्या जादुई दुनियेतील हे नाव कधीही न विसरता येणार नाही. श्रोते आजही त्यांच्या आवाजाला भूलतात. निवेदन

टेकचंद सोनवणे (खास प्रतिनिधी)

अमीन सयानी...आकाशवाणीवरील आवाजाच्या जादुई दुनियेतील हे नाव कधीही न विसरता येणार नाही. श्रोते आजही त्यांच्या आवाजाला भूलतात. निवेदन, सूत्रसंचालन, समालोचकांच्या विश्वात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कालच झाला. हा सोहळा कोट्यवधी भारतीयांपर्यंत समालोचनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम सलग ४५ वर्षे केले जसदेवसिंग यांनी. जसदेवसिंग यांचे वर्णन एकाच वाक्यात करता येईल.-‘मेरी आवाज ही मेरी पहचान है...आकाशवाणीवरून केवळ आवाजाने श्रोत्यांच्या डोळ्यासमोर घटनाक्रम उभा करणे असो किंवा दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण सुरू असताना समालोचन करणे हे विलक्षण कौशल्याचे काम. हे काम जसदेवसिंग यांनी इमानेइतबारे केले. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्येकाला याचि देही याचि डोळा पाहणे शक्यच नसतो. कोट्यवधी भारतीय हा सोहळा दूरदर्शनवर पाहतात. सोहळ्याचा भाग होतात. देशाचे शक्तिप्रदर्शन अनुभवतात. समालोचकाच्या एखाददुसºया वाक्याने रोमांचित होतात तर कधी राष्ट्रप्रेमाने त्यांचा ऊर भरून येतो! जसदेवसिंग यांच्या आवाजात, शब्दफेकीत ही विलक्षण क्षमता होती.राजपथ हा देशातील सर्वात हाय प्रोफाईल रस्ता. प्रजासत्ताक दिन जवळ आला की हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. इंडिया गेटपासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा हा एकरेषीय रस्ता सदासर्वकाळ सुरक्षारक्षकांच्या नजरेखाली असतो. राजपथाची खडान्खडा माहिती जसदेवसिंग प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सुरू असताना सांगत. जानेवारीत राजपथावर कोणती फुलं उमलली आहेत ते विजय चौकातील कारंजी कधी निर्माण झाली, याचीही माहिती ते देत असत. त्यांच्या समालोचनाचे हेच वैशिष्ट्य होते.जसदेवसिंग मीळचे जयपूरचे. त्यांच्यातील समालोचकाला साद घातली ती पहिल्यांदा मेल्व्ही डिमेलो यांनी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. जसदेवसिंग तेव्हा १७ वर्षांचे असावेत. डिमेलो यांनी महात्मा गांधी यांच्या अंत्ययात्रेचे धावते समालोचन अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये केले. महात्मा गांधींना देशाने गमावले म्हणजे नेमके काय गमावले - याची जाणीव त्यांनी शब्दाशब्दातून भारतीयांना करून दिली होती. जसदेवसिंग यांच्यासाठी तो क्षण महत्त्वाचा ठरला. तेव्हाच त्यांनी ठरविले - आपण समालोचक व्हायचे. हिंदीतून समालोचन करायचे. जसदेवसिंग याची हिंदी भाषेवर पकड नव्हती. जुजबी बोलण्यापुरतं हिंदी त्यांना येत असे. त्यांच्या आईने तर तुला हे जमणार नाही, असेच सांगितले. जसदेवसिंग यांनी मात्र आईच्या बोलण्यातून प्रेरणा घेतली. हिंदी शिकले. बोलण्यातील कौशल्य आत्मसात केले होते. पहिल्या टप्प्यात आकाशवाणीत त्यांची निवड झाली नाही. दुसºया टप्प्यात मात्र हिंदी व उर्दू समालोचक म्हणून १९५५ साली त्यांना जयपूरमध्ये संधी मिळाली. आकाशवाणीसाठी त्यांनी अधिकृत समालोचक म्हणून पहिल्यांदा काम केले ते एका फुटबॉल मॅचसाठी. १९६० साली जयपूरला झालेल्या सामन्यांचे समालोचन त्यांनी केले. पुढचा टप्पा होता राजपथ. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा. चीनकडून झालेल्या पराभवाचे सावट त्या सोहळ्यावर होते. लोकांच्या नजरा खिळल्या होत्या. पराभवानंतरचे शक्तिप्रदर्शन होते ते. जसदेवसिंग यांनी समालोचनातून शक्तिप्रदर्शन केले. आवेशपूर्ण पद्यपंक्ती त्यांनी शांत, परंतु संयमित भावनेने म्हटल्या. देशाला एका सूत्रात बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.२६ जानेवारी १९६३. सकाळी ५.३० वाजता जसदेवसिंग राजपथावर पोहोचले. कडाक्याची थंडी होती. दृश्यमानता तर जवळजवळ नव्हतीच. सूर्यदर्शन होईल की नाही, अशी स्थिती होती. आतासारखा कडेकोट बंदोबस्त तेव्हा नसे. स्वतंत्र भारताला नुकतंच सोळावं वरीस लागलं होतं. लोक आपापले बिछाने घेऊन राजपथाच्या नजीकच राहायला होते. ठराविक भागातच संचारबंदी होती. राजपथाचा आसपासचा परिसर फुलून गेला होता. (आता प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसआधी व दोन दिवसानंतर ल्युटन्स दिल्ली बंद असते.) ६-६.१५ वाजता आभाळ स्वच्छ झालं. लोकांची गर्दी वाढली. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे थेट समालोचन आकाशवाणीवरून जसदेवसिंग यांनी केले. आकाशवाणीवरून समालोचन ऐकणाºया प्रत्येकाला जणू काही आपण हा सोहळा याचि देही याचि डोळा पाहत असल्याची अनुभूती झाली. तेव्हापासून जसदेवसिंग व प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे समालोचन (आकाशवाणी व त्यानंतर दूरदर्शनसाठी) हे समीकरण पक्के झाले.राजपथसे मैं जसदेवसिंग बोल रहा हूँ, हे समालोचनाची सुरुवात करणारे त्यांचे वाक्य! राजपथावर अगदी खारे दाणे विकणारा असो किंवा गराडू (महाराष्ट्रातील रताळी) चाट विकणारा - त्यांचा उल्लेख करीत जसदेवसिंग यांनी हा सोहळा खºया अर्थाने प्रजासत्ताक करीत. झाडांची-पानांची-फुलांची माहिती देत रेडिओ ऐकणाºया प्रत्येकाला राजपथाची सैर घडवीत. इतकी वर्षे जसदेवसिंग यांनी कोणताही कागद समोर न धरता समालोचन केले. संरक्षण विभागाकडून संचलनात सहभागी प्रत्येक चमूची माहिती ते घेत असत. तेवढी माहिती त्यांना पुरे. समालोचनात ते जान ओतत. प्रजासत्ताक दिन जवळ आला की आपल्या शायर मित्रांना जसदेवसिंग फोन करून त्यांच्याकडून शेर लिहून घेत. योग्य जागी त्याचा वापर करीत. तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी त्यांना एकदा म्हणाले होते - ‘आपकी आवाज से मैं आपको पहचानता हूँ.’जसदेव यांचा हा कौतुक सोहळा केवळ प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या समालोचनासाठी नाही. नऊ प्रकारच्या आॅलिम्पिक खेळांचे त्यांनी समालोचन केले आहे. १९८२ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा, १९७५ साली झालेली हॉकी विश्वचषक स्पर्धा, राकेश शर्मा यांची चंद्र मोहीम - या साºया ऐतिहासिक घटना जसदेवसिंग यांनी समालोचनातून जिवंत केल्या. कोणत्याची खेळाचे तज्ज्ञ नसलेल्या जसदेवसिंग यांनी हॉकी, फुटबॉल सामन्यांचे अप्रतिम समालोचन केले आहे. हॉकी विश्वचषक स्पर्धेनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या होत्या - ‘तुम्ही समालोचनात किती जिवंतपणा आणता! संसदेचे कामकाजही तुमच्या जादुई आवाजामुळे प्रभावित झाले होते. तुमच्या आवाजामुळे काळजाचा ठोकाच चुकतो.’प्रजासत्ताक दिन व जसदेवसिंग हे सूत्र आता विभागले गेले. जसदेवसिंग ८८ वर्षांचे आहेत. काही आठवणी विस्मरणात गेल्या. आजही जुनेजाणते त्यांना प्रजासत्ताक दिनी फोन करून शुभेच्छा देतात. तुमच्या आवाजाने त्या काळी आमचा प्रजासत्ताक दिन सुरू होई, अशी हृद्यभावना व्यक्त करतात. जसदेवसिंग वयोमानानुसार सर्वांशीच बोलू शकत नाहीत. अनेक गोष्टी त्यांना आठवतही नाहीत. त्यांचा आवाज मात्र अनेक पिढ्यांच्या कानात प्रजासत्ताकदिनी आजही रुंजी घालतो.

(editorial@lokmat.com)

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८