शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कर्टनी, ख्रिस आणि त्यांची बारा मुलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 12:58 IST

Family Planning: खरंतर मुलं जन्माला घालणं हे जरी स्त्रिया करत असल्या, तरी शतकानुशतकं आपल्याला किती मुलं हवी आहेत? कधी हवी आहेत? आणि मुळात आपल्याला मुलं किंवा एक मूलसुद्धा हवं आहे का? हे ठरवण्याचा अधिकार स्त्रियांना कधीही नव्हता.

अमेरिकेसारख्या प्रगत देशात एखाद्या कुटुंबाला ११ मुलं असतील तर? आणि त्या मुलांच्या आईच्या पोटात तिचं बारावं मूल वाढत असेल तर?  लग्न झाल्यानंतर गेल्या बारा-तेरा वर्षात या अमेरिकन जोडप्याने एकदाही गर्भनिरोधक वापरलं नसेल तर? आणि एवढं करूनही आपल्याला जेवढी जास्त मुलं होतील तेवढं छानच असं या जोडप्याचं म्हणणं  असेल तर ? - जरा विचित्र वाटते ना ही शक्यता? पण हे वास्तव आहे. तर या ११ मुलांच्या आईची ही गोष्ट! खरंतर मुलं जन्माला घालणं हे जरी स्त्रिया करत असल्या, तरी शतकानुशतकं आपल्याला किती मुलं हवी आहेत? कधी हवी आहेत? आणि मुळात आपल्याला मुलं किंवा एक मूलसुद्धा हवं आहे का? हे ठरवण्याचा अधिकार स्त्रियांना कधीही नव्हता. पूर्वी मुलं होऊ द्यायची नसतील तर संपूर्ण ब्रह्मचर्य हा एकच शोध माणसाला लागलेला होता. उष्ण कपड्यांच्या घट्ट अंतर्वस्त्रांनी पुरुषांच्या जननक्षमतेवर परिणाम होतो, हे जगाच्या काही भागात लोकांच्या लक्षात आलेलं होतं; पण हे सगळे मार्ग पुरुषांनी वापरण्याचे होते. त्यांची इच्छा हीच त्यासाठी महत्त्वाची होती. स्त्रीला गर्भनिरोधक उपलब्ध झाल्यानंतरही ती वापरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं.१३ मे १९६८ साली युनायटेड नेशन्समध्ये कुटुंब नियोजन हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केला गेला. त्यानंतर कुटुंब नियोजनाच्या साधनांमध्ये आणि त्याच्या वापरामध्ये झपाट्याने बदल घडून आला. कुटुंबाचा आकार लहान होत गेला. पूर्वी एकेका घरात पाच सात भावंडं सहज असायची. त्यातून ‘हम दो - हमारे दो’चा विचार जगभर बळावला. त्याचं स्वरूप ‘हम दो - हमारा एक’ असं होऊन नंतर तर प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये DINK म्हणजे डबल इन्कम नो किड्स असाही विचार जोर धरू लागला.विभक्त कुटुंबात मुलं सांभाळणे आणि वाढत्या महागाईत त्यांना वाढवणे हे दिवसेंदिवस कठीण होत गेल्यामुळे एक किंवा दोन मुलं असणं हे नॉर्मल होऊन गेलं. अशा वेळी एखाद्या कुटुंबात अकरा मुलं असतील आणि बारावं मूल आईच्या पोटात असेल तर? त्यातही हे कुटुंब अमेरिकेसारख्या प्रगत देशात असेल तर? न्यू मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या कर्टनी रॉजर्सने चर्चमध्ये पास्टर असणाऱ्या ख्रिसशी २००८ साली लग्न केलं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कुटुंब नियोजनाची कुठलीही साधनं वापरलेली नाहीत. त्यांनी लग्न केलं तेव्हा ख्रिसचं म्हणणं होत, की त्याच्या आईला जशी दहा मुलं आहेत, तशीच त्यांनाही दहा मुलं असावीत. कर्टनी म्हणते की मला कायमच आई व्हायचं होतं. त्यामुळे आपल्याला दहा मुलं असावीत, ही कल्पना मलाही आवडली. त्या दोघांना लग्नानंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी एक मूल झालं आहे. कर्टनी म्हणते की दहाव्या मुलाच्या जन्मानंतर मला असं वाटलं की अजून मुलं झाली तरी मला चालणार आहे. म्हणून मग आम्ही अकराव्या मुलाला जन्म दिला!... आता कर्टनी सदतीस वर्षांची आहे आणि मार्चमध्ये ती बाराव्या मुलाला जन्म देणार आहे. त्याव्यतिरिक्त तिचा तीन वेळा गर्भपातदेखील झाला आहे.कर्टनी म्हणते, लोकांना अशी मोठी कुटुंबं आवडत नाहीत. तिचे इंस्टाग्रामवर २९००० फॉलोअर्स आहेत. ती इंस्टाग्राम आणि एकूणच सोशल मीडियावर इतक्या सगळ्या मुलांना जन्म दिल्यामुळे सतत ट्रोल होत असते. ती म्हणते की लोकांना असं वाटतं, की आम्हाला इतकी मुलं असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकणार नाही. त्यामुळे लोक आमच्यावर टीका करतात; पण मी ती टीका मनावर घेत नाही आणि अश्या प्रकारच्या ट्रोलिंगकडे लक्षही देत नाही. मला माहिती आहे की, ही सगळी परकी माणसं आहेत. ती आम्हाला ओळखत नाहीत. त्यांना आमच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे ते त्यांच्या गृहीतकांवर किंवा त्यांच्या मनातल्या ज्या प्रतिमा किंवा कल्पना असतात त्यावर अवलंबून त्यांची मतं बनवतात; पण प्रत्यक्ष परिस्थिती मात्र त्यापेक्षा वेगळी आहे.कर्टनी तिच्या सर्व मुलांचं होम स्कूलिंग करते. त्यांना घरीच शिकवते. सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट झाला की ती अकरा साडेअकरा वाजेपर्यंत त्यांचा अभ्यास घेते. त्यानंतर मुलांची दुपारच्या झोपेची वेळ असते आणि त्यानंतरचा दिवस घरातल्या इतर कामांसाठी वापरला जातो. कर्टनी मुलांची काळजी स्वतःच घेते. ती मुलांसाठी बाजारातील डायपर्स न वापरता कापडी लंगोट वापरते, तयार पॅक केलेलं अन्न आणण्यापेक्षा घरच्या बागेत उगवलेली फळं आणि ताज्या भाज्या वापरते. ही बागदेखील आहे त्याहून मोठी करण्याचा त्यांचा विचार आहे.ख्रिस आणि कर्टनीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना कायमच मोठं कुटुंब पाहिजे होतं आणि खूप मुलं असल्याने ते खूष आहेत. आणि लोकांचं काय? मुलं नसतील तरी बोलतात, एक मूल असेल तर “एकटं मूल” म्हणून बोलतात, दोन मुलं असतील तर त्यांच्या वयात किती अंतर आहे त्यावरून बोलतात. कुछ तो लोग कहेंगे, हीच जनरीत आहे, मग निदान आपण आपल्याला पाहिजे तसं जगावं, असाच विचार ख्रिस आणि कर्टनी रॉजर्सने केला असणार! 

महिन्याचा खर्च किती?तब्बल ११ मुलं (आणि बारावं मार्चमध्ये येणार) असलेलं हे कुटुंब दर आठवड्याला सुपर मार्केटमधून ४०० ते ५०० डॉलर्सचं म्हणजेच सुमारे ३०,००० ते ३७,००० रुपयांचं सामान खरेदी करतं.

टॅग्स :FamilyपरिवारUnited Statesअमेरिका