शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: बाप रे, कोरोनाच्या जगभरातील संसर्गाला चीनइतकाच 'हा' जबाबदार(?) माणूसही जबाबदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:21 IST

कोव्हीड हा अतिशय संसर्गजन्य आहे हे जगापासून लपविण्याच्या प्रयत्नात चीन होता आणि एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेतील अत्यंत जबाबदार पदावरील व्यक्ती त्यांना मदत करीत होती.

ठळक मुद्देअन्य अनेक संस्था व संघटनांप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनाही राजकारणाची बळी ठरत आहे.कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात ट्रेडस गॅब्रिएसस यांनी सातत्याने चीनधार्जिणी भूमिका घेतली आहे. कोव्हीड हा अतिशय संसर्गजन्य आहे हे जगापासून लपविण्याच्या प्रयत्नात चीन होता आणि गॅब्रिएसस त्याला मदत करीत होते.

>> प्रशांत दीक्षित

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही संयुक्त राष्ट्र संघटनेची एक महत्त्वाची शाखा. जगातील जास्तीत जास्त लोकांना उत्तम आरोग्य सेवा लाभावी, साथीच्या रोगांना लगाम बसावा असे चांगले उद्देश  १९५५साली स्थापन झालेल्या या संघटनेच्या उद्देश पत्रिकेत आहेत. वैद्यकशास्त्र व आरोग्य हे या संघटनेचे मुख्य विषय. याच विषयांच्या अनुषंगाने म्हणजे विज्ञानाच्या आधाराने संघटनेचे काम चालावे ही अपेक्षा. मात्र अन्य अनेक संस्था व संघटनांप्रमाणे ही संघटनाही राजकारणाची बळी ठरत आहे.

आरोग्य संघटनेचे सध्याचे प्रमुख ट्रेडस् अभानाम गॅब्रिएसस यांचे वर्तन हे याचे मुख्य कारण. कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात ट्रेडस गॅब्रिएसस यांनी सातत्याने चीनधार्जिणी भूमिका घेतली आहे. जगाला या साथीच्या रोगाच्या तोंडी घातले ते चीनने. चीनने या रोगाबद्दलची माहिती लपवून ठेवली. हा रोग किती गंभीर आहे याबद्दल जगाला कळू दिले नाही. जेव्हा कळविले तेव्हा बराच उशीर झाला होता. आजच्या अंदाजाप्रमाणे सुमारे ७० लाख लोक तोपर्यंत कोरोनाचे विषाणू शरीरात घेऊन जगाच्या विविध भागात गेले होते.

मात्र गॅब्रिएसस हे मानायला तयार नाहीत. उलट चीन या रोगाला कसा प्रभावीपणे काबूत ठेवत आहे, चीनने किती मोकळेपणे जगाला माहिती दिली आहे अशी भलाभण ते सातत्याने करतात. इतकेच नाही तर चीनवर कोणी टीका केली तर त्या देशाला जाहीरपणे दटावतात. हा वेगळा विषाणू पुढे आला आहे व तो धोकादायक आहे असे चीनच्या संशोधकांना डिसेंबरमध्येच आढळून आले. चीनने त्या डॉक्टरांना गप्प बसविले. त्यातील एकाचा याच रोगाने मृत्यू झाला. वुहानमध्ये सर्व काही ठाकठीक आहे असेच चीन सांगत होता व जागतिक आरोग्य संघटनाही मान डोलवत होती. चीन माहिती दडवून ठेवीत आहे हे वुहानमधील एका वकिलाने ब्लॉगवर जाहीर केले. त्याचा ब्लॉग बराच सणसणीत होता. तो प्रकाशित झाल्यापासून तो वकील गायब झाला आहे. कोव्हीड हा अतिशय संसर्गजन्य आहे हे जगापासून लपविण्याच्या प्रयत्नात चीन होता आणि गॅब्रिएसस त्याला मदत करीत होते. या विषाणूचा फैलाव वुहानच्या जवळच्या भागात होऊ लागला आणि त्यानंतर जगातील काही देशांतही त्याची बातमी पोहोचली. त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेला सावध करण्यात आले व चीनमध्ये प्रवास करण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. तथापि, ग्रॅब्रिएसस यांनी त्याला ठाम नकार दिला. चीनमधील प्रवास सुरू राहिला. सीमाबंदी झाली नाही. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात गॅब्रिएसस यांनी बीजिंगला भेट दिली. चीनचे सर्वेसर्वा जीनपिंग यांची खास भेट घेतली. त्यानंतर गॅब्रिएसस यांच्या चीनच्या कौतुकाला अधिकच बहर आला. हा विषाणू चीनमधून आलेला आहे असा उल्लेख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी करताच विषाणूला देश, धर्म, वंश नसतो असे ग्रॅबिएसस यांनी सुनावले. कोव्हिडची जागतिक साथ आहे ही घोषणाही त्यांनी खूप दबावानंतर विलंबाने केली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांच्या या चीनधार्जिण्या वृत्तीचा जगाला फटका बसला. जगात फारच टीका होऊ लागल्यानंतर २२ जानेवारी रोजी चीनने वुहानमध्ये लॉकडाऊन केले. एका अंदाजानुसार हे लॉकडाऊन एक आठवडा आधी झाले असते तर जगातील कोरोनाच्या केसेस ६५ टक्क्यांनी कमी झाल्या असत्या. दोन आठवडे आधी केले असते तर रुग्णांच्या संख्येत ८६ टक्के तर तीन आठवडे आधी केले असते तर रुग्णांची संख्या ९५ टक्क्यांनी कमी झाली असती. कोरोना हा चीनपुरता मर्यादित राहिला असता.

दहा वर्षांपूर्वी आणि त्याआधी २००२मध्ये सार्स व मार्स या साथीच्या आजारांचा उगम चीनमधून झाला. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने वेळीच कडक भूमिका घेऊन चीनमध्ये प्रवास करण्यास वा चीनमधून बाहेर पडण्यास प्रतिबंध केला. त्यावेळी चीनने बराच थयथयाट केला होता व त्यावेळचे अध्यक्ष ठाम राहिले. त्यामुळे कोरोनाइतक्या मोठ्या प्रमाणात त्या रोगांचा फैलाव जगात झाला नाही.

ग्रॅब्रिएसस यांनी चीनच्या इतके कह्यात जाण्याचे कारण काय. ते इथिओपियाचे आरोग्य मंत्री व परराष्ट्र मंत्री होते. सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यात त्यांनी काही चांगले काम केले असले तरी कॉलराच्या साथी लपविण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. इथिओपियाच्या आरोग्य सेवेची ते देत असलेली आकडेवारी संशयास्पद आहे असे अनेक तज्ज्ञ म्हणतात. तरीही जागतिक आरोग्य संघटनेवर ते बहुमताने निवडले गेले. याला कारण चीनची भक्कम मदत. ते चीनचेच उमेदवार होते. गॅब्रिएसस यांच्यामागे चीनने अनेक लहान देशांची मते उभी केली. चीनने असे करण्याचे कारण म्हणजे आपल्या भक्कम आर्थिक बळाच्या जोरावर जागतिक स्तरावरील प्रमुख संघटनांवर कब्जा बसविण्याचा मोठा कार्यक्रम चीनने गेल्या दहा वर्षांपासून हाती घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या महत्वाच्या संघटनांवर आपले होयबा बसवायचे आणि त्यातून आपल्याला हवी तशी धोरणे जगावर लादायची असा हा कार्यक्रम आहे. गॅब्रिएसस हे चीनच्या व्यूहरचनेतील एक प्यादे. चीनला हे जमू शकते आहे कारण गेली काही वर्षे, विशेषतः ट्रंप सत्तेवर आल्यापासून युरोप-अमेरिकेने अशा जागतिक संघटनांची आर्थिक मदत कमी केली आहे. संघटनांसाठी काही निश्चित निधी देण्याऐवजी राष्ट्रांच्या दानशूरपणावर या संघटना अधिकाधिक अवलंबून राहू लागल्या आहेत. चीनने त्याचा फायदा उठविला व आपली तिजोरी उघडली. जागतिक आरोग्य संघटनेला जवळपास ९०० दशलक्ष डॉलर्सची भरघोस मदत चीनने केली आहे. ही मदत फुकट केलेली नाही. त्याची किंमत चीन वसूल करून घेणार आहे.

आज जगाची अर्थव्यवस्था ठप्प करण्यास चीनची दिरंगाई कारणीभूत ठरली आहे. चीनच्या या राजकारणाशी काही देणेघेणे नसलेले मुंबई-पुण्यातील रोजंदारीवरील कामगारांचे रोजचे वेतन थांबले आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्याचे आपले अग्रक्रम बदलून भारताला आरोग्य व अत्यावश्यक सेवांसाठी काही लाख-कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. भारताचा विकासदर २ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ पुढील काही वर्षे भारतातील मध्यमवर्ग व गरीबांना कष्टाचे जीवन जगावे लागणार.

याला जबाबदार चीन आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप हे एकटेच चीनच्या विरोधात उघडपणे बोलतात. कारण आजही चीनच्या दुपट्ट मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. अन्य देश दबक्या आवाजात टीका करतात कारण चीनच्या अर्थसत्तेचा धाक आहे. भारत तितकीही टीका करीत नाही. चीनबद्दल आपलेपणा असलेले येथील बुद्धीजीवी गप्प बसले तर आश्चर्य नव्हे. ट्रेडस गॅब्रिएसस फक्त जागतिक आरोग्य संघटनेत नसतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प