शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

Coronavirus: कसं असेल कोरोनानंतरचं वर्क कल्चर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 05:17 IST

post-coronavirus work culture: कोरोना काळात मुख्यत: बदललं ते ऑफिस कल्चर, वर्क कल्चर.. अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’शिवाय पर्याय राहिला नाही. काहींच्या कामाच्या वेळा बदलल्या, तर काहींच्या ऑफिसमधलं वातावरण बदललं.

कोरोना आला आणि सगळंच बदललं. आपली लाइफस्टाईल बदलली, आपलं वर्क कल्चर बदललं, ‘घरं’ आणि घरांतली नाती बदलली. काहीच पहिल्यासारखं राहिलं नाही. अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेकांच्या नाकाशी सूत धरावं लागलं. अनेक ठिकाणचे कर्मचारी बदलले, तर अनेक कर्मचाऱ्यांनाही नवीन स्किल्स शिकण्याची गरज निर्माण झाली. कोरोना काळात मुख्यत: बदललं ते ऑफिस कल्चर, वर्क कल्चर.. अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’शिवाय पर्याय राहिला नाही. काहींच्या कामाच्या वेळा बदलल्या, तर काहींच्या ऑफिसमधलं वातावरण बदललं. या बदलत्या स्वरूपाशी मेळ घालताना अनेक जण मेटाकुटीला आले, तर काहींनी हा बदल पटकन स्वीकारला आणि आत्मसातही केला. पण, कोरोनानंतरच्या काळात कसं असेल ऑफिस, वर्क कल्चर, त्यात नेमके काय बदल होतील, घरून काम करणारे कर्मचारी ऑफिसात यायला उत्सुक आहेत, की ‘घरातलं ऑफिस’च त्यांना उत्तम वाटतंय.. याबाबत अनेकांचे अनेक अनुभव आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना अनेकांना जड गेलं, जड जातंय. घरून काम करतोय, म्हणून चोवीस तास कामावर आणि एकही दिवस सुटी नाही, अशी अनेकांची स्थिती झाली, ऑफिसमधला माहोल गेला आणि ‘एकांतात’ दिवस काढताना कोणाशी दोन शब्द बोलायलाही कोणाला ‘स्पेस’ राहिली नाही. तर घरून काम करण्याचीही अनेकांना सवय झाली, प्रवासाची दगदग मिटली, ठरावीक वेळेला कामावर हजर राहायची सक्ती मिटली.. कोरोनानंतरच्या काळात ऑफिस कल्चर कसं असेल, याबाबत आता जगभरातच संशोधन चालू आहे. अनेक पर्याय समोर येताहेत. त्यातलं कोणतं, कोणाला सूट होईल, त्यासाठी काय बदल करावे लागतील यावर विचारविनिमय सुरू आहे. कोरोनानंतर  ऑफिसेस पुन्हा सुरू झाली, कर्मचारी पुन्हा कामावर यायला लागले, तरी त्यात पहिल्यापेक्षा आता खूप बदल होतील. कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर आणताना उद्योगधंद्यांनाही मोठी कसरत करावी लागेल. कोरोनानंतरचं वर्क कल्चर म्हणजेही सर्वांसाठी एक नवं जगच असेल. तज्ज्ञ सांगतात, कर्मचाऱ्यांची राहती घरंच ‘मिनी ऑफिस’ म्हणून पुढच्या काळात उदयाला येऊ शकतात. आस्थापनांना त्यासाठी तयार राहावं लागेल. नवीन धोरणं आखावी लागतील. नव्या वर्क कल्चरशी जुळवून घेताना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावं लागेल.जगभरातल्या अनेक महिलांनी ‘वर्क फ्रॉम होम’ आम्हाला (त्रासाचं असलं तरी) बऱ्याच प्रमाणात सोयीचंही असल्याचं सांगितलंय. अनेक महिलांसाठी ती नवी सुरुवात ठरू शकेल. ज्यांना लहान मुलं आहेत आणि मुलांना सांभाळण्याची कोणतीच सोय नाही, अशा महिलांना नोकरी आणि पैशांवर पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. अर्थातच या दोन्ही गोष्टी मॅनेज करणं त्यांच्यासाठी कठीण असेल, पण पर्याय सापडू शकतो. मुळात ‘मल्टीटास्कर’ असलेल्या महिलांची उत्पादनक्षमता यामुळे आणखी वाढू शकते. ज्या कर्मचाऱ्यांच्या घरी म्हातारे पालक आहेत, त्यांची चिंता कमी होऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या रजा कमी होऊ शकतात आणि उत्पादकता वाढून आपली ध्येयं ते निश्चित करू शकतात. ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा छोट्या ऑफिसेसमुळे कंपन्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेंटेनन्सवरील मोठा खर्च कमी होऊ शकतो. मोठमोठ्या बिल्डिंग्ज, भलीमोठी पार्किंग स्पेस, कॅफेटेरिया यासाठी लागणारी जागा कमी होऊ शकते. कंपन्यांची ही ‘कॉस्ट कटिंग’ कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी वापरता येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कामाप्रति आपुलकी, प्रेम वाढतानाच त्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.  तज्ज्ञांचं म्हणणं आहे, हे नवं वर्क कल्चर नव्या अर्थव्यवस्थेला जन्म देईल. प्रदूषण कमी होईल. ‘पिक अवर’ची धावपळ कमी झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण घटेल. अर्थातच त्यासाठी कर्मचाऱ्यांचं सहकार्य, त्यांची बांधिलकी, त्यांची उच्च कार्यक्षमता, उत्साह या गोष्टींचीही आवश्यकता असेल.  जगप्रसिद्ध बुटिक फर्म ‘पेपरस्पेस एशिया’नं यासंदर्भात सिंगापूर येथे नुकतंच प्रदर्शन भरवलं होतं. त्यात आपलं भविष्यातलं ऑफिस कसं असेल, असू शकेल, याबाबतचा दृश्यानुभव नागरिकांना दिला. कंपनीच्या सहसंस्थापक नरिता चिया म्हणतात, प्रत्येकाला आपापल्या कार्यालयात सहानुभूती आणि सहयोग यावर फोकस ठेवावा लागेल. कर्मचाऱ्यांचं हित पाहताना, त्यांची कामाची, बसण्याची जागा, तिथली मोकळी जागा, योग्य सूर्यप्रकाश, वारा, व्यवस्था या गोष्टींकडे अधिक लक्ष पुरवावं लागेल. 

भारतात असतील ‘मल्टि मॉडेल्स’!भारतातलं कोविडनंतरच ‘वर्क कल्चर’ कसं असेल याबाबत आताच भाकीत करणं अवघड आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण भारतात संमिश्र पद्धती पाहायला मिळेल, असा कयास आहे. ‘रिमोट वर्किंग’बाबत कंपन्यांचं धोरण कसं असेल यावर सारं काही अवलंबून असेल. बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आता पुन्हा कामावर बोलवू लागल्या आहेत, काही कंपन्या ‘फ्लेक्जिबल वर्किंग मॉडेल’वर काम करताहेत, काही स्वत:पुरतंच ‘हायब्रिड मॉडेल’ बनवताहेत, तर काही कंपन्या अर्धे कर्मचारी ऑफिसमध्ये आणि अर्धे घरी, त्याचबरोबर त्यांचं रोटेशन या पर्यायावरही विचार करताहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय