शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दिल्लीत कोरोनाचे तांडव; केजरीवालांचे प्रयत्न खुजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 05:26 IST

गेल्या तीन महिन्यांत कोविड-१९ ची स्थिती दिल्ली सरकारच्या आवाक्याबाहेर गेली आहे. याला थोपविणे कठीण आहे असे लक्षात येताच केजरीवालांनी ‘फेकू’ पॅटर्न स्वीकारला.

- विकास झाडे, संपादक, लोकमत, दिल्लीदिल्लीला हस्तिनापूरची बाधा झालेली आहे. त्यामुळे इथे अनेकांची मती भ्रष्ट होते. सामाजिक कार्याचा डमरू वाजवून सामान्य लोकांची मने जिंकत राजकारण करणाऱ्या नेत्यांचे हे शहर आहे. दिल्लीत कामापेक्षा अभिनयाला अधिक महत्त्व आहे. जेवढा चांगला अभिनय तेवढे इथे डोक्यावर धरले जाते. यात निपुण असलेल्या नेत्यांच्या हाती देशाची सूत्रे येतात. लोकही अभिनय सम्राटाच्या हाती सत्ता सोपवितात व नंतर कपाळावर हात मारून घेतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यापासून वेगळे नाहीत.

सामाजिक आंदोलनातून नावारूपास आलेल्या केजरीवालांनी दिल्लीच्या राजकारणात मजबूत पाय रोवले आहेत. अभिनय कौशल्यास कामाची जोड देत ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. ‘वीज, पाणी, शिक्षण’ या त्यांच्या कामांवर भाळत लोकांनी त्यांना भरघोस मते दिलीत; परंतु सुरुवातीच्या पाच वर्षांत दिल्लीकरांनी अनुभवलेले केजरीवाल आता दिसत नाहीत. देशाचे भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आता लोकांची मते बदलत असतील, तर केजरीवालांच्या राजकीय कालखंडाच्या उत्तरार्धास सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. अनुभवातून माणूस परिपक्व होतो आणि त्यानुसार तो बदल घडवीत असतो. किंबहुना तसा बदल करणे ही वर्तमानाची गरज असते; परंतु अलीकडे केजरीवालांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. त्यांना ‘फेकू विषाणू’ची बाधा झाली असे वाटते. ‘फेकू विषाणू’ कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला नाही. २०१४ मध्ये तमाम भारतीयांनी याचा अनुभव घेतला. त्यातूनच याचा शोध लागला. या विषाणूचे सर्वाधिकार एका प्रभावशाली नेत्याकडे असले तरी त्याची बाधा अन्य राजकीय नेत्यांनाही होत गेली. फक्त फेकत राहायचे आणि वास्तवतेला चिरडून टाकायचे, हा या विषाणूचा धर्म आहे. गेल्या तीन महिन्यांत कोविड-१९ ची स्थिती दिल्ली सरकारच्या आवाक्याबाहेर गेली आहे. याला थोपविणे कठीण आहे असे लक्षात येताच केजरीवालांनी ‘फेकू’ पॅटर्न स्वीकारला. लोकांना सत्य न सांगता केवळ स्वप्ररंजन केले. महिनाभरात मुंबईलाही मागे टाकेल असे दिल्लीतील चित्र आहे.
मार्चमध्ये टाळेबंदी लागली तेव्हा दिल्लीत केवळ ३० रुग्ण होते. त्यातील बहुतांश विदेशातून आले होते. केवळ एकाचा मृत्यू झाला होता. आज ८६ दिवस झालेत. या काळात मृत्यूचा आकडा दोन हजारांपर्यंत पोहोचला आहे आणि कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर गेली.डॉ. महेश वर्मा समितीने दिलेल्या अहवालानुसार, जुलै अखेरपर्यंत दिल्लीत रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात जाणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती देत दिल्लीकरांच्या मनातील कोरोनाची भीती अधिक गडद केली आहे. समूहामध्ये विषाणू पसरत असल्याचे केजरीवालांचे विधान तथ्यहीन असल्याचा खुलासा आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेला करावा लागला. यातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. दिल्लीत एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना केजरीवाल सरकारने उभारलेली यंत्रणा अत्यंत खुजी ठरली. कोविड-१९ ला समर्पित रुग्णालयांची यादी जाहीर करण्यात आली. त्यासाठी ‘अ‍ॅप’ सुरूकेले. कुठल्या रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, किती व्हेंटिलेटर आहेत याबाबत माहिती देणाºया अ‍ॅपचा मात्र बोजवारा उडाला. रिक्त खाटा दाखविण्यात आलेले रुग्णालय पूर्ण भरलेले आहे. रुग्णांना प्रवेश मिळत नाही. उपाचारांअभावी रुग्ण मरत आहेत. हा अनुभव केवळ सामान्य लोकांनाच नाही तर संक्रमित वरिष्ठ अधिकाºयांनाही आला आहे. दिल्ली सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाला यासंदर्भात दररोज शेकडो टिष्ट्वट जातात; परंतु त्याची दखलही घेतल्या जात नाही.
विषाणूचा प्रकोप असतानाही बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची वासना जागी झालेल्या मोदी सरकारला केजरीवालांना सहकार्य करण्याची इच्छा नाही. शिवाय भाजपचे राज्य असलेल्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील रुग्णांचे लोंढे कोरोनाच्या उपचारांसाठी दिल्लीत येत आहेत. त्यांना थोपविण्यासाठी दिल्लीतील कोरोना रुग्णांवरच इथे उपचार करण्याचे केजरीवाल जाहीर करतात तेव्हा भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडतात. नायब राज्यपाल कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयाला रद्द करतात. केजरीवाल आता एकाकी पडले आहेत आणि आकडेवारीच्या चक्रव्यूहात ते स्वत:च अडकले आहेत. दुसरीकडे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, आमदार आतिशी, आदी नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीत एकही वस्ती आणि सरकारी कार्यालय असे नाही जिथे कोरोनाचा रुग्ण नाही. केंद्र सरकारच्या आरोग्यसेतू अ‍ॅपमध्ये प्रत्येक एक कि.मी. परिसरात रुग्ण असल्याचा रेड अलर्ट दाखविला जातो. उपचाराची सोयच नसल्याने ७८ टक्के रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. त्यांची सुश्रुषा करणारी सरकारी यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. दररोज रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उपचार देऊ शकलो नाही किमान मृतदेहाची वेळीच विल्हेवाट लागावी म्हणून यमुनेच्या काठावर मोठ्या प्रमाणात शवदहनाची व्यवस्था प्रशासन करीत आहे, इतकी भयावही स्थिती दिल्लीची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा