शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

coronavirus: रुग्णसेवेत गुंतलेल्या परिचारिकांमधील ममत्वाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 4:17 AM

एकीकडे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आणि दुसरीकडे रुग्णांची सेवा करताना मानसिक ताण-तणावालाही या परिचारिकांना नेहमीच सामोरे जावे लागते; मात्र सरकारी आणि सामाजिक सुरक्षितताही नेहमीच वादाची ठरली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईतील सायन आणि केईएम हॉस्पिटलचा विषय भलताच गाजत आहे. एकाच खाटावर दोन-दोन रुग्ण इथंपासून ते मृतदेहाच्या गराड्यातही रुग्ण, अशी अनेक धक्कादायक दृश्ये सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती. इतके दिवस इटली-स्पेनमधील कोरोनाशी संबंधित मृतदेहांची अवस्था दूरस्थपणे पाहणारा मराठी माणूस आता आपल्याच भागातील रुग्णालयांची विचित्र परिस्थिती अनुभवताना मात्र पूर्णपणे हादरला. ज्यांना क्वारंटाईन होण्याची गरज आहे, ते तर सोडाच, अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्णही अशा रुग्णालयात दाखल होण्यासाठी प्रचंड घाबरू लागले. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील दृश्यांची कारणमीमांसा मात्र केली गेली नाही. केवळ एकच वाईट बाजू सातत्याने पुढे आणली गेली, याबद्दल खंत व्यक्त करणारी एक ठाम भूमिका एका वरिष्ठ परिचारिकेने जाहीरपणे मांडली. खरेतर लोकांचे गैरसमज दूर करण्याचे जे काम सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे, तीच जबाबदारी एका परिचारिकेने स्वत:हून पेलली. आता असे का घडले, या प्रश्नाचे उत्तर केवळ एकाच शब्दात मिळू शकते. कारण ती परिचारिका आहे.कोणत्याही संकटाशी सामना करणारी आणि युद्धाच्या काळात पळ न काढता जबाबदारी स्वीकारणारी ती परिचारिका आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभर कोरोनाविरोधात जणू सामाजिक युद्ध पुकारले गेले. पोलीस, सरकारी डॉक्टर्स, परिचारिका आणि जनतेला अत्यावश्यक सेवा देणाºया घटकांनी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम सुरू ठेवले. कोरोनाच्या तिसºया टप्प्यात रुग्णांची संख्या कैकपटीने वाढत चालल्याने सरकारी रुग्णालयातील यंत्रणा तोकडी पडत चालली आहे. अशावेळी सर्वच खासगी डॉक्टरांनी स्वत:हून पुढे येऊन या यंत्रणेला साथ द्यावी, अशी अपेक्षाही सरकारने वारंवार व्यक्त केली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर कामाच्या तुलनेत कमी पगारावर काम करणा-या परिचारिकांची सेवा समाजासाठी खरोखरच आदर्शवत ठरली आहे. देशभरात कोरोनाची लागण झालेल्या घटकांमध्ये परिचारिकांची संख्या अधिक असली तरी मृत्यूच्या भीतीवर मात करीत त्या आजही अत्यंत निडरपणे आणि मोठ्या धाडसाने आपली ड्यूटी चोखपणे बजाविताना दिसतात.

रुग्णसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या मिस फ्लोरिन्स नाईटिंगेल यांचा आज जन्मदिन. बरोबर दोनशे वर्षांपूर्वी म्हणजे १८२० साली त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या महान कार्यानिमित्त त्यांचा जन्मदिन ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. परिचारिका म्हणजे रुग्णाची परिचर्या करणारी स्त्री. ही कला तशी खूप जुनी. डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमधील अचूक दुवा म्हणजे या परिचारिका. परिचर्या ही उदात्त आणि मानवतावादी सेवा म्हणून ओळखली जाते. रुग्णाची शारीरिक काळजी घेत असताना त्याच्या नातेवाइकांनाही मानसिक आधार देणारी हीच परिचारिका आरोग्याशी संबंधित क्षेत्रात गुणवत्ताही राखण्याचा सातत्याने प्रयत्न करते. आपल्या भारतात जवळपास पाच लाख परिचारिका सध्या रुग्णसेवेचे कार्य करीत आहेत. ही संख्या मागणीपेक्षा अत्यंत कमी समजली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतात २४ लाख परिचारिकांची आवश्यकता आहे. आपल्या देशात परिचारिका हा खास महिलांचाच पेशा मानला जातो. अलीकडच्या काळात या क्षेत्रात काही प्रमाणात पुरुषांचाही प्रवेश झालेला आहे; मात्र मुळात स्त्रियांमध्ये सेवाभाव असतो आणि हे काम त्या अधिक संवेदनशीलपणे करू शकतात, अशीही आपल्या देशात भावना आहे.एकीकडे स्वत:च्या कुटुंबाच्या जबाबदा-या पेलत असताना दुसरीकडे रुग्णांची सेवा करताना येणाºया मानसिक ताण-तणावालाही या परिचारिकांना नेहमीच सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर सरकारी आणि सामाजिक सुरक्षितताही नेहमीच वादाची ठरली आहे. २००६ पासून त्यांच्या बदलीचा कायदा वादग्रस्त राहिला. त्यांच्या ड्रेसचा रंग पांढरा की गुलाबी, यावरही सतत चर्चा झडत गेली. रुग्णालयात एखाद्या रुग्णाच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडली गेली तर संबंधितांच्या संतप्त नातेवाइकांकडून होणाºया हल्ल्याचा फटका सर्वप्रथम याच परिचारिकांना बसण्याची शेकडो उदाहरणे आहेत. असे असतानाही या परिचारिका माता-भगिनींच्या ममतेने रुग्णांची सेवा करण्यास तसूभरही कमी पडत नाहीत. त्यामुळेच आजच्या जागतिक परिचारिका दिनी या ममत्वाला मनापासून सलाम.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयMumbaiमुंबई