शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

coronavirus: कोरोना विषाणूबाबत होतेय रोज नवे आकलन, मिळतील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 6:34 AM

बोलण्या-गाण्यासारख्या क्रियेतूनही कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो, हे नव्या संशोधनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे संसर्गाविषयीचे आकलन वाढून काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मानवजातीला मिळतील.

विषाणूंचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिवर्तनीय असतात. भोवतालच्या परिस्थितीनुसार आपल्या संरचनेत आणि संसर्गप्रसाराच्या पद्धतीत ते बदल करत असतात. कोरोनाचा विषाणू मानवजातीसमवेत नांदायला आल्यास आता किमान सात महिने होतील. मात्र, त्याची अनेक वैशिष्ट्ये अद्यापही अज्ञात आहेत. तज्ज्ञांच्या अनेक तर्कांना आजवर तो चकवा देत आला आहे. म्हणूनच जेव्हा २३९ वैज्ञानिकांनी त्याचा प्रसार हवेतूनही होऊ शकतो, असे ठाम विधान सप्रमाण केल्याचे वृत्त आले तेव्हा आश्चर्य वाटले नाही. नवनव्या शक्यता गृहित धरून चालण्याशिवाय शास्त्रांना गत्यंतर नसते. जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणे आपलेच खरे असा दुराग्रह बाळगता येत नाही. केवळ शिंक आणि खोकल्याद्वारे नाका-तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्यातून कोरोना पसरतो, या विधानावर या संघटनेचे तज्ज्ञ आजवर ठाम होते. नव्या पुराव्यांची दखल त्यांना आता घ्यावी लागेल. या पुराव्यांमुळे बरीच गणिते उलटीपालटी होणार आहेत. काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरेही सापडतील.

संसर्गाचा ज्ञात इतिहास नसतानाही काही व्यक्तींना बाधा कशी झाली, असा प्रश्न कोविडचा मागोवा घेणा-या तज्ज्ञांना हल्ली वारंवार पडायचा. हे कोडे आता सुटले आहे. कोरोना विषाणू हवेत सोडण्यासाठी बाधित व्यक्तीने खोकण्या-शिंकण्याची आवश्यकता नाही. जोरजोरात बोलताना, श्वास घेताना आणि गातानाही बाधित व्यक्ती या विषाणूच्या प्रसारास हातभार लावू शकते. अशी कृती करताना त्या व्यक्तीच्या नाका-तोंडातून अतिसूक्ष्म असे थेंब बाहेर पडत असतात. या थेंबाच्या व्यासापेक्षा मानवी केसाचा व्यास पन्नास पटींनी मोठा असतो. यावरून ते थेंब किती सूक्ष्म असतील, याचा अंदाज करता येईल. बंदिस्त, पुरेसे वायूविजन नसलेल्या खोलीत हे वजनाने हलके असलेले थेंब बराच काळ हवेत विहरू शकतात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या निरोगी व्यक्तींपर्यंत संसर्ग पोहोचवू शकतात. म्हणजे घरात बसून राहाणे, हा सुरक्षेचा हमखास उपाय आहे, असे यापुढे म्हणता येणार नाही. अनोळखी व्यक्तींच्या सोबतीने राहाणे धोक्याचे आहे, असा नवा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. कोविडचे विषाणू नेमके किती अंतर पार करू शकतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सर्वसाधारण आकाराच्या बंदिस्त खोलीत त्यांचा संचार सर्वत्र असू शकतो, असेही तज्ज्ञ सांगतात. घरातली हवा खेळती ठेवणे हा यावरला उपाय. अर्थात वरील निष्कर्ष पाश्चिमात्य देशांतील हवामानास गृहित धरून काढलेला आहे.भारतीय उपखंडातला मान्सून, आर्द्रता यामुळे हवेत विहरणाºया थेंबांचे आयुर्मान वाढेल की कमी होईल, यावर इथल्या वैज्ञानिकांना वेगळा अभ्यास करावा लागेल. मात्र, वैैयक्तिक सुरक्षेची अनिवार्यता या नव्या संशोधनानेही अधोरेखित केलेली आहे. दोन मीटरचे अंतर आपल्याला खोकल्या- शिंकांतल्या संसर्गापासून वाचवू शकेल; पण या सूक्ष्म थेंबांपासून तारू शकणार नाही, हे नवे आकलन नाका-तोंडावर मास्क घालण्याचे महत्त्व विषद करते. वरचेवर नाका-तोंडाला स्पर्श करण्याची सवय आता निर्धारपूर्वक सोडावी लागेल. २३९ वैज्ञानिकांच्या या नव्या संशोधनाने शाळा-विद्यालये सुरू करण्याच्या शक्यतेचाही पुनर्विचार करण्यास उद्युक्त केले आहे.

१२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांवर कोरोनाचा परिणाम अत्यंत नगण्य असतो, असे दिसून आल्याने मध्यंतरी काही पाश्चात्य तज्ज्ञांनी सातवीपर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. मात्र, अनेक विद्यालयांतील बंदिस्त खोल्यांचा लहान आकार आणि एकेका वर्गातली पटसंख्या यांचा विचार करता धोक्याची व्याप्ती वाढलेली आहे. वातानुकूलित यंत्रणेला कार्यक्षम फिल्टर्स बसविणे, हवा स्वच्छ करणारी संयत्रे बसविणे किंवा विषाणूंचे पारिपत्य करणाºया अतिनील किरणांना उत्सर्जित करणारे दिवे बसविणे, अशी उपाययोजना करणे आता रुग्णालयांनाही क्रम:प्राप्त झालेले आहे. कोरोनाचा विषाणू अजूनही मानवी प्रज्ञेला भारी ठरलेला आहे. जगभरातले संशोधन अद्यापही बचावात्मक पवित्रा सोडू शकलेले नाही. नव्या संशोधनाने सावधगिरी आणि सतर्कतेचा स्तर उंचाविण्याशिवाय पर्याय नसल्याचेच सूचित केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय