शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ‘कोरोना’ संकटाने दाखविला प्रदूषण रोखण्याचा मार्ग!

By गजानन दिवाण | Updated: March 24, 2020 02:43 IST

Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करीत असताना रविवारी जवळपास सर्वांनीच घरी राहणे पसंत केले. रस्ते अक्षरश: निर्मनुष्य दिसले. त्यामुळे राज्यात मुंबईसह सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रचंड कमी नोंदविले गेले.

- गजानन दिवाण ( उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद)संकटे अनेक गोष्टी शिकवीत असतात. युद्धजन्य परिस्थितीचे, नैसर्गिक आपत्तीचे विविध विभागांकडून मॉकड्रील केले जाते, ते यामुळेच. संकटाच्या काळातच आपली बलस्थाने-कमजोरी समोर येत असतात. ‘कोरोना’च्या संकटाचेच पाहा. दररोज किती वायू प्रदूषण आम्ही टाळू शकतो, हे या संकटाने एका दिवसात दाखवून दिले. ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करीत असताना रविवारी जवळपास सर्वांनीच घरी राहणे पसंत केले. रस्ते अक्षरश: निर्मनुष्य दिसले. त्यामुळे राज्यात मुंबईसह सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रचंड कमी नोंदविले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन आणि ‘कोरोना’विषयीची भीती-काळजी यामुळे लोकांनी वाहने घराबाहेर काढलीच नाहीत. यामुळे अनेकांची कामे खोळंबली, हे खरे असले तरी वाहनांचा अनावश्यक वापर टळला आणि प्रदूषणाला आळा बसला, हे सत्यदेखील नाकारून चालणार नाही.हवेमध्ये ० ते ५० पीएम आढळले तर सर्वात चांगली हवा मानली जाते. ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब आणि ३०१ ते ४०० पीएम अतिखराब हवा मानली जाते. ४०० च्या पुढे पीएम आढळल्यास चिंताजनक परिस्थिती मानली जाते. रविवारी राज्यातील विविध शहरांत वाहने आणि लोकांची वर्दळ नसल्याने प्रदूषणात जवळपास निम्मी घट आढळून आली. १५ मार्चला धोक्याच्या पातळीत असणारी शहरे २२ मार्चला मात्र १०० पीएमच्या खाली आढळून आली. कल्याण १९९ पीएमवरून ६३ वर, मुंबई बांद्रा १२७ वरून ५० वर, पुणे ३१४ पीएमवरून ८० वर, औरंगाबाद ९२ वरून ८१ वर, तर ठाण्यात प्रदूषण १३० वरून ३६ पीएमपर्यंत घसरले. एरव्ही कायद्याचा दंडुका दाखवून किंवा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करूनही हे शक्य झाले नसते. ‘कोरोना’च्या संकटाने ते करून दाखवले.या संकटाच्या आधीची आपल्या राज्यातील प्रमुख शहरांची प्रदूषणाची स्थिती पाहा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०१८-१९ चा प्रदूषण अहवाल नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाला. यानुसार, राज्यात २५ शहरांतील ६५ टक्के नमुने हे २०१७-१८ च्या तुलनेत चांगल्या श्रेणीत, तर ३५ टक्के नमुने हे धोकादायक श्रेणीत आढळले. या अहवालात चंद्रपूर, मुंबईतील सायन, बांद्रा, डोंबिवली ही शहरे अतिप्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले. मागील आठ वर्षांपासून औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे आणि सोलापूर येथे वायू प्रदूषण वाढत असल्याचे हा अहवाल सांगतो. राज्यात धूळ प्रदूषणात चंद्रपूर प्रथम, तर मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.सल्फर डाय आॅक्साईडचे प्रदूषण महाराष्ट्रात कमी असले तरी मुंबई, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते अधिक आहे. प्रदूषणामुळे वर्षाला १२ लाख लोक मरण पावतात, असा निष्कर्ष ‘ग्लोबल एअर २०१९’च्या अहवालातून काढण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील अति २० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १४ शहरे येतात. प्रदूषणामुळे डोके, गळा, नाक, फुफ्फुस, श्वसननलिकेचे आजार होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, मानसिक आजार, जनन क्षमतेवर परिणाम आणि कॅन्सरसारखे आजार होतात. प्रदूषणाचे एवढे मोठे धोके ठाऊक असूनही त्यात कमी होताना दिसत नाही.भरपूर झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्यासोबतच अधिक जुन्या वाहनांचा वापर टाळणे, सीएनजीवर चालणारी वाहने, पर्यावरणपूरक वाहने, दिल्लीप्रमाणे सम-विषम क्रमांकाची वाहने आलटून-पालटून रस्त्यावर आणणे, असे अनेक उपाय केले जात आहेत. यानंतरही हवेतील प्रदूषण कमी होताना दिसत नाही. वाहनांची वाढती संख्या ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे आम्हाला अशक्य नाही, हे ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिले आहे. फक्त नियम-कायदे करून चालत नाही. त्या नियमांची-कायद्याची अंमलबजावणी होणे तेवढेच महत्त्वाचे असते. आमच्याकडे त्याचीच वानवा आहे.कायदे भरपूर असूनही ते तोडण्यासाठीच जणू आमची स्पर्धा असते. एखादी भीती किंवा संकटच आम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो. तो मार्ग या ‘कोरोना’ संकटाने आम्हाला दाखवून दिला आहे. वैयक्तिक वाहने आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत, हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. घरात वाहन असले तरी ते रस्त्यावर आणलेच पाहिजे असे नव्हे. अधिकाधिक वेळी सार्वजनिक वाहनांचा वापर करून आणि वैयक्तिक वाहनांचा अनावश्यक वापर टाळून आम्ही दररोज होणारे प्रदूषण टाळू शकतो. त्यासाठी पुन्हा ‘कोरोना’सारखे दुसरे संकट यायलाच हवे, याची वाट पाहायची कशासाठी?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या