शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हृदय बंद पडून पोलिस मरतात, तरी ताण तसाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 09:55 IST

बारा ते चोवीस तास ड्युटीचा रेटा सहन करणाऱ्या पोलिसांच्या आठ तास ड्युटीची केवळ चर्चा होऊन ती हवेत विरते! वर्षानुवर्षे हे असेच का होते?

रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक, लोकमत, मुंबई

वर्षानुवर्षे ऊर फुटेस्तोवर ड्युटी करणाऱ्या पोलिसांचे अतिरेकी ताणतणावाने अधूनमधून बळी जात आहेत. अशी घटना घडली की, त्यांच्या अनियमित कामाच्या तासांची चर्चा होते. चार दिवसांनी ती थंडावते ती पुढचा बळी जाईपर्यंत. बारा ते चोवीस तास ड्युटीचा रेटा सहन करणाऱ्या पोलिसांच्या आठ तास ड्युटीची केवळ चर्चा होऊन ती हवेत विरते. 

आजवर एम. एन. सिंह, संजय पांडे, दत्ता पडसळगीकर या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कर्मचाऱ्यांची  ड्युटी आठ तास करण्याचे आटोकाट प्रयत्न केले खरे; पण अल्पावधीतच त्यांच्या नियोजनाचे बारा वाजले. आठ तास ड्युटीचे हे गणित जुळून येणे इतके अवघड होण्यामागे एक विचित्र दुष्टचक्र कारणीभूत आहे, हेच खरे!

दिवसेंदिवस एकूणच लोकसंख्या फुगत असताना  पोलिस भरतीचा वेग मात्र लोकसंख्या वाढीच्या वेगाला कधीच गाठू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे प्रतिलाख लोकसंख्येमागील पोलिसांचे प्रमाण तुलनेनं अतिशय कमी आहे. 

केवळ एक लाख ८० हजार पोलिस संपूर्ण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत आहेत. दुसरीकडे दरवर्षी दहा टक्के पोलिस एकतर निवृत्त होतात किंवा इतरत्र बदली होऊन जातात. त्यांची जागा रिकामीच राहते. नव्याने भरती होण्याचा वेग कासवाच्या गतीपेक्षा कमीच आहे. मंजूर पदे आणि प्रत्यक्षातील मनुष्यबळ यांचे प्रमाण व्यस्त आहे, ते तसेच राहते आणि ही व्यस्तता उलट वाढतच राहते. प्रतिलाख लोकसंख्येमागील गुन्ह्यांचे प्रमाणही दशकभरात २८ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. गुन्ह्यांची संख्या वाढली एवढेच नव्हे, तर त्यांचे प्रकारही बदलत्या कलमानानुसार बदलले. हा सगळा भार आणि  सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पोलिसांच्या माथी पडतात. घरापासून पोलिस ठाण्यापर्यंतच्या प्रवासाचा वेळ ड्युटीपेक्षा वेगळा. परिणास्वरूप बहुतेकांना हृदयविकार, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, फुप्फुसाचे विकार कायमचे जडलेले. पोलिसांचे कौटुंबिक स्वास्थ्य तर पार हरवलेले.

पूर्वीपासून मुंबई पोलिस वापरत आलेला फाॅर्म्युला म्हणजे बारा तास ड्युटी आणि पुढच्या दिवशी पूर्ण विश्रांती. त्यातही प्रत्येकवेळी विश्रांतीचा दिवस वाट्याला येईलच याची खात्री नसते. पोलिस ॲक्टमधील तरतुदीनुसार पोलिस हा चोवीस तास पोलिस असतो. त्याला ड्युटी टाळता येत नाही. याचा अर्थ काम पडेल तेव्हा पोलिसाने कामावर हजर व्हावे. त्याला चोवीस तास राबवून घेण्याची पाळी उच्चपदस्थांवर येते. आठ तासांची ड्युटी म्हणजे आदर्श व्यवस्था हे साऱ्यांनाच मान्य; पण ते का शक्य होत नाही? कारण त्यासाठी हवे पुरेसे मनुष्यबळ. पोलिसांची रिक्त पदे एकदम भरता येणार नाहीत. कारण भरती करायची म्हटली की त्या पोलिसांना प्रशिक्षण द्यावे लागतेच. पूर्वी वर्षभराचे प्रशिक्षण दिले जायचे. नंतर  ते नऊ महिन्यांवर आले आणि हळूहळू सहा महिन्यांवर घसरले. लवकर भरती करायची म्हणून नाममात्र प्रशिक्षण द्यायला पोलिस हे काय सिक्युरिटी गार्ड आहेत का?              शिवाय भरती केलेल्या या पोलिसांसाठी घरांचीही व्यवस्था करावी लागते. आवश्यकता भासेल तेव्हा पोलिस वसाहतीत बिगुल वाजवून पोलिसांना पाचारण केले जाते; पण वसाहती उभारून सर्वांना घरे देणे साध्य होत नाही. जितके मनुष्यबळ आवश्यक त्याच्या ८० ते ९० टक्के कर्मचारी प्रत्यक्षात उपलब्ध असले की, कसेतरी कामकाज हाताळता येते; पण तेच प्रमाण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत उतरले असेल तर कामाच्या ताणाने हृदये निकामी होणार नाहीत तर दुसरे काय होणार? नवी भरतीच होत नाही तर ही तूट कशी भरून काढायची, हा प्रश्न कायमच वरिष्ठांना छळत असतो. जसे पैशाचे सोंग आणता येत नाही तसेच मनुष्यबळाचेही आहे. 

पोलिस सुधारणेसाठी आजवर अनेक समित्या नेमल्या गेल्या. त्यांच्या शिफारशी धूळ खात आहेत तोवर पोलिसांचे बळी जातच राहणार. आठ तासांच्या ड्युटीचा प्रश्न तडीस लागायचा असेल तर त्या शिफारशीनुसार हजारोंची नवी भरती, प्रशिक्षण, निवासाची सोय आदी व्यवस्था टप्प्याटप्प्याने का होईना मार्गी लावावी लागेल, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे; पण त्यासाठी लागणाऱ्या अवाढव्य आर्थिक तरतुदीचे काय, हा कळीचा मुद्दा आहे. या तरतुदीबाबत कोणीच बोलायला तयार नाही. 

जवळपास सर्व राज्य सरकारांनी पोलिस सुधारणा बासनात गुंडाळून ठेवल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही म्हणावे लागते की, राज्याचे मुख्यमंत्री सहकार्य करीत नसतील तर आम्ही सुधारणा कशा आणणार? राज्यकर्त्यांना पोलिसांच्या प्रश्नाची जाणीव आहे आणि त्याची उत्तरेही ठाऊक आहेत; पण अभाव आहे तो केवळ त्यासाठीचे आर्थिक गणित जुळवून आणण्याच्या इच्छेचा. तोवर ताणाने बळी जाणाऱ्या पोलिसांच्या केवळ बातम्या वाचायच्या!ravindra.rawool@lokmat.com

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र