शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

ढेपे सरांचे विज्ञानातील योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 1:54 AM

प्रा. राजाभाऊ ढेपे हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. पण होते म्हणणे चूक आहे. कारण इंग्रजीत एक म्हण आहे,  Once a Professor, is all time Professor.. त्या अर्थाने ते अजूनही प्रोफेसर आहेत

- अ. पां. देशपांडेप्रा. राजाभाऊ ढेपे हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. पण होते म्हणणे चूक आहे. कारण इंग्रजीत एक म्हण आहे,  Once a Professor, is all time Professor.. त्या अर्थाने ते अजूनही प्रोफेसर आहेत, शिवाय नुकतेच त्यांनी, ‘विज्ञानाचा वर्ग’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिल्याने ते अजूनही प्रोफेसर आहेतच असे म्हणायचे. निवृत्त झाल्यानंतर गेली ७-८ वर्षे ते महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कुमार कोशाचे एक लेखक आहेत. हा कुमार कोश जीवाशास्त्रावरच असल्याने प्रा. ढेपे अजूनही जीवशास्त्र विषयात रंगलेले आहेत. काही प्राध्यापक मी असे पाहिले आहेत की, मी निवृत्त झालो आहे, आता त्या विषयाचे नावही काढू नका. त्या अर्थाने प्रा. ढेपे कंटाळलेले नाहीत आणि पुस्तक लिहिण्याची त्यांना आवड आहे. ‘विज्ञानाचा वर्ग’ हे ढेपे यांचे दुसरे पुस्तक आहे. ही त्यांची दोन्ही पुस्तके निवृत्तीनंतरची आहेत.या पुस्तकात एकूण दहा प्रकरणे आहेत. त्यांची नावे वाचल्यावर ही प्रकरणे जीवशास्त्रासंबंधी असतील असे वाटणार नाही. पण यातले खरे प्रकरण आहे, उसने मातृत्व या विषयावरचे. रक्ताचा न्याय अर्थात न्यायाधीशाचे आत्मकथन या शीर्षकाचे. इतर प्रकरणे ८-१० पानांची आहेत तर हे प्रकरण ७२ पानांचे आहे.पहिल्याच प्रकरणात सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती असताना त्यांचा ६७वा वाढदिवस जाहीरपणे साजरा करण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरू व इतर काही जण राष्ट्रपती भवनावर गेले असता राष्ट्रपती म्हणाले, माझा एकट्याचा वाढदिवस साजरा करू नका. त्या दिवशी सर्व शिक्षकांचा वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करा. शिक्षकांप्रति राधाकृष्णन यांना असलेला आदरच यातून प्रतीत होतो. राधाकृष्णनही एकेकाळी शिक्षक होते व त्याचा त्यांना अभिमान होता.समाजात सध्या आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि आंतरदेशीय विवाह जरा वाढत्या प्रमाणात होत आहेत. त्याची माहिती देताना प्रा. ढेपे यांनी जीवशास्त्राच्या नियमांप्रमाणे, सजीवांचे गुणधर्म आई-वडिलांची जनुके कशी नियंत्रित करीत असतात ते सांगत असताना जर पारशी लोकांसारखे अगदी जवळच्या नातेवाइकांत विवाह केले तर रंगांधळेपणा, हिमोफेलीया, आॅटिझम, थेलेसेमिया यांसारख्या विकृती निर्माण होतात. त्यामुळे असे आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि आंतरदेशीय विवाह होणे हे मानवाच्या फायद्याचेच ठरणार असल्याचे दाखवून दिले आहे. यामुळे होणारी मुले बलवान आणि अधिक बुद्धिजीवी होतील. हे केवळ मानवजातीतच होते, असे नसून प्राण्यांमध्येही प्रणयाराधनाच्या वेळी नर मादीसमोर आपले सौंदर्य प्रकट करतो. उदा. मोर लांडोरीसमोर आपला पिसारा फुलवून दाखवतो, सिंहाची मर्दानी आयाळ पाहून सिंहीण नराची निवड करते इत्यादी.प्रा. ढेपे यांनी चहाचा पूर्वेतिहास सांगितला आहे. तोही माहितीपूर्ण आहे. इ.स. पूर्व २७३७मध्ये चीनचा राजा देशाटन करत असताना दमल्यावर एका झाडाखाली बसला असताना, त्याने नोकराकरवी गरम पाणी मागवले. ते पाणी गरम होत असता, आजूबाजूच्या रोपांची पाने त्या गरम पाण्यात पडली. त्यामुळे ते गरम पाणी राजाला अधिक चवदार वाटले. मग राजा ती पाने टाकलेले गरम पाणी रोज आवडीने पिऊ लागला. ती पाने चहाची होती. काळ्या चहाला येणारा विशिष्ट स्वाद आणि रंग पोलीफेनॉल आॅक्सीडाईजमुळे येतो. उकळत्या चहाचे तापमान ६० ते ९० अंश सेल्सिअस झाल्यावर होणाºया किण्वन प्रक्रियेमुळे थियाफ्लाविन आणि थियारूबिजिन ही रसायने तयार होतात. हिरव्या चहातील कॅटेचिन आणि इतर रसायनांमुळे मेंदू, पुरस्थ ग्रंथी, गर्भाशय मुख, मूत्राशयाचे कर्करोग यावर तो गुणकारी आहे.तसेच त्यांनी उसने मातृत्व याबद्दल रक्ताचा न्याय अर्थात ‘न्यायाधीशाचे आत्मकथन’ या प्रकरणात सविस्तर चर्चा केली असून, नवरा-बायको दोघांपैकी एकात दोष असल्याने मूल होत नाही त्यांना अन्य मार्गाने मूल मिळणे शक्य आहे. दोषी दाम्पत्यातील स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे वीर्य यांचे फलन टेस्ट ट्यूबमध्ये करायचे आणि मग ते फलित बीज उसने मातृत्व स्वीकारायला तयार असलेल्या बाईच्या गर्भाशयात रोपण करायचे. नऊ महिने तिने ते मूल आपल्या गर्भाशयात वाढवून मूल जन्माला आल्यावर ते ज्या दोघांच्यापासून वाढवले, त्यांना देऊन टाकायचे. ज्या बाईने मूल वाढवण्यासाठी आपले गर्भाशय वापरायला दिले, त्या बाईला त्याचा मोबदला पैशात द्यायचा असा हा व्यवहार सध्या सर्रास होताना दिसतो. हे सगळे प्रकरण प्रा. ढेपे यांनी नाट्यरूपात मांडले आहे. त्यामुळे एका परीने हे विज्ञान नाटक झाले असून, ते त्यांनी फार सबलतेने लिहिले आहे. त्यात लालित्यही असल्याने ते वाचकांना खिळवून ठेवते. हे पुस्तक लिहून प्रा. ढेपे यांनी जीवशास्त्राची भाषा कशी असते याची झलक दाखवली आहे.