शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

देश संरक्षणासाठी खान्देशपुत्रांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 23:38 IST

भामरे, सुनील भोकरे व चंदू चव्हाण या तीन खान्देशपुत्रांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिले आहे.

डॉ. सुभाष भामरे, सुनील भोकरे व चंदू चव्हाण या तीन खान्देशपुत्रांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिले आहे. त्यांचा सत्कार करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त होत आहे. भारतीय सेना दलाचे नावलौकिक उंचावणाऱ्या तीन खान्देशपुत्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा सध्या खान्देशात सुरू आहे. सर्जिकल स्ट्राइकच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप परत आलेला जवान चंदू चव्हाण आणि नौसेनेच्या व्हाईस अ‍ॅडमिरलपदी पोहोचलेले सुनील भोकरे यांचे विविध ठिकाणी होणारे सत्कार, त्यातून सेना दलाच्या कर्तृत्वाचे विराट दर्शन आणि सेना दलात सहभागी होण्याचे तरुणांना आवर्जून केले जाणारे आवाहन या जमेच्या बाजू आहेत.धुळ्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना राजकीय वारसा असला तरी ते आवडत्या वैद्यकीय सेवेत रमले. वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तर आई आमदार, अशी परंपरा असल्याने अखेर गेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेतर्फे रिंगणात उतरले. अपयश आले; पण लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर ते निवडून आले. दोन वर्षातच केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. वैद्यकीय व्यावसायिक असल्याने आरोग्य मंत्रालय मिळेल, अशी अपेक्षा असताना त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशा संरक्षण खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले. वन रँक वन पेन्शन, सर्जिकल स्ट्राइक, सुरक्षा जवानांच्या समाजमाध्यमांमार्फत मांडण्यात आलेल्या कैफीयती हे विषय गाजत असताना डॉ.भामरे हे त्यांच्या मूळ संयमी स्वभावानुसार संरक्षण दलाची भूमिका मांडत होते. सर्जिकल स्ट्राइकच्या दुसऱ्याच दिवशी चंदू चव्हाण हा भारतीय जवान सांबा सेक्टरला कर्तव्य बजावत असताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पोहोचला. सुरुवातीला असा कोणताही जवान पाकिस्तानमध्ये नसल्याची भूमिका पाकिस्तानने घेतली. मात्र भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त रणनीतीमुळे चंदू चव्हाण पाकिस्तानात असल्याचे त्यांना मान्य करावे. डॉ. भामरे यांच्या मतदारसंघातील बोरविहीर या गावातील चंदू हा रहिवासी असल्याने डॉ.भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. भामरे हे संरक्षण राज्यमंत्री असल्याने चंदूसाठी त्यांनी प्रयत्न करावे, अशी खान्देशवासीयांची अपेक्षा होती. या अपेक्षांचे ओझे, सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानसोबत ताणले गेलेले संबंध या पार्श्वभूमीवर शिष्टाई कितपत यशस्वी होईल, या विषयी साशंकता होती. परंतु ११४ दिवसांनंतर चंदू वाघा सीमा ओलांडून भारतात परतला. खान्देशात आनंदोत्सव साजरा झाला.महिन्याभरानंतर डॉ.भामरे हे त्याला गावी घेऊन आले. गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळल्याने चंदूसोबत डॉ.भामरे यांचे जल्लोषात स्वागत झाले. चंदू नसल्याने दिवाळी साजरी झाली नव्हती, ती मार्च महिन्यात साजरी झाली. चंदू पाकिस्तानात पकडला गेल्याच्या वृत्ताने आजीने प्राण सोडला होता. तिच्या अस्थींचे विसर्जन चंदूसाठी थांबविण्यात आले होते. नाशिकला जाऊन त्याने अस्थिविसर्जन केले. चंदू तसा मूळचा सामनेरचा (जि.जळगाव) रहिवासी. लहानपणी आई-वडील वारल्याने तो बोरविहीरला आजोळी आला. मोठा भाऊ भूषण आणि चंदू अशा दोघांचे सैनिक बनण्याचे स्वप्न होते. दोघांची स्वप्नपूर्ती झाली. परंतु चंदूचे सीमा ओलांडणे आणि पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटणे या घटनांमुळे बोरविहीर हे गाव भारतीय माध्यमांच्या नकाशावर आले. चंदूच्या सुटकेनंतर धुळे, सामनेर यासह अनेक गावांमध्ये मिरवणुका, सत्कार, मंदिरांमध्ये आरती, मुलाखती असे कार्यक्रम अजूनही सुरू आहे. त्याची आपबिती ऐकून अंगावर शहारे येतात. परंतु त्याची दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे तो मानसिक व शारीरिकदृष्ट्या सावरत आहे.गुढे (जि. जळगाव) येथील सामान्य कुटुंबातील सुनील भोकरे हे भारतीय नौदलाच्या व्हाईस अ‍ॅडमिरल या महत्त्वपूर्ण पदावर पोहोचल्याबद्दल जन्मगावी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. कारगिल युद्धात भोकरे यांनी विशेष कामगिरी बजावली होती. छोट्या गावातून आणि मराठी माध्यमातून शालेय शिक्षण झालेला विद्यार्थी सैनिकी स्कूल व एनडीएमध्ये यशस्वी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मराठी तरुणांनी सेना दलाकडे करिअर म्हणून पहावे, असे आवाहन त्यांनी केले. इंग्रजीवर प्रभुत्व आणि संवादकौशल्यात वाढ केल्यास मराठी तरुण यशस्वी होऊ शकतात, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. - मिलिंद कुलकर्णी