शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

संसर्गाचा सारीताप, कोरोनाचा सारिपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 22:51 IST

गेल्या महिनाभरापासून या सारी रुग्णांची संख्या वाढत असून, औरंगाबादेत या आठवड्यात चौदाजणांचा बळी गेला आहे.

संजीव उन्हाळेराज्यभर कोरोनाचे थैमान असतानाच, तुलनेने कमी संसर्गजन्यता असूनही कोरोनाशी तंतोतंत साधर्म्य असलेला ‘सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ म्हणजेच सारी हा आजार मराठवाडा आणि विदर्भामध्ये वाढत आहे. तथापि, कोरोनापेक्षा या तीव्र वेदनादायी ‘सारी’मध्ये श्वसनसंस्थेची संसर्गबाधा झाल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त म्हणजे किमान १५ टक्के आहे. राज्यभर या सारी आजाराने बाधित रुग्णांचे शासनाने सर्वेक्षण केले असून, त्यामध्ये ३.८ टक्के कोरोनाबाधित सापडले आहेत. अगदी अलीकडे शासनाने सर्व खासगी डॉक्टरांना ‘सारी’चा रुग्ण सापडला, तर अगोदर सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा आदेश दिला; पण गर्दी वाढल्याने उपचार आणि बडदास्त ठेवता-ठेवता नाकीनऊ आले आहे.

गेल्या महिनाभरापासून या सारी रुग्णांची संख्या वाढत असून, औरंगाबादेत या आठवड्यात चौदाजणांचा बळी गेला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गांभीर्य ओळखून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘ताप उपचार केंद्र सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. कोविड केअर सेंटरचा ताप उपचार केंद्र हा एक भाग असून, आता सार्वजनिक आरोग्य विभागाने बांधून पूर्ण केलेल्या; पण अद्याप वापरात नसलेल्या इमारती, स्टेडिअम, हॉटेल याठिकाणी आता सारी ताप असलेल्या रुग्णालासुद्धा दाखल करण्यात येईल. वस्तुत: कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल येऊनही जर ताप, श्वसनाचा आजार दिसून आला, तर त्याला सारी रुग्ण म्हणून दाखल करण्यात येते. असेही घडले आहे की, अगोदरचा निगेटिव्ह अहवाल नंतर पॉझिटिव्ह आढळला. मग कोरोनाचा रुग्ण म्हणून धांदल उडते. ‘सारी’साठी दाखल रुग्णांना प्रथम कोरोनाचे औषधोपचार चालू करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयात दाखल झालेला कोणताही ‘सारी’चा रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह आहे, असे समजूनच सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे,’ असे ज्येष्ठ डॉक्टर मंगला बोरकर यांनी सांगितले. वस्तुत: ‘सारी’ हा काही वेगळा आजार नाही, तर तीव्रतम श्वसन संस्थेचे आजार, शीतज्वर या संसर्गजन्य आजारांच्या समूहाला साकल्याने ‘सारी’ असे संबोधण्यात येते. त्यात स्वाईन फ्लू, बॅक्टेरिअल इन्फेक्शन, फ्लूपासून अलीकडे आलेल्या कोरोनाचाही समावेश होतो. मुळामध्ये न्यूमोनिया या आजारामध्ये अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत होते; पण त्याची माध्यमांनी कधीच गंभीरपणे दखल घेतली नाही. कोरोनाच्या आगमनानंतर या आजाराला विशेष महत्त्व आले आहे. ‘सारी’ची लक्षणे व कोरोनाची लक्षणे एकसारखीच आहेत. दम लागणे, ताप येणे, श्वासोच्छ्वासास त्रास होणे, खोकला यांपासूनच दोन्ही आजारांची सुरुवात होते. ‘सारी’ हा आजार कमी संसर्गजन्य आहे एवढेच. जागतिक तापमानवाढीमुळे ‘सारी’च्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याघडीला महाराष्ट्रातील आठ जिल्हे, तमिळनाडू, गुजरात, केरळ, आदी राज्यांतही ‘सारी’ने हात-पाय पसरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वयस्करांना लवकर होतो, तसे ‘सारी’चे नाही. लहान मुलांपासून मध्यमवयीन माणसांपर्यंत ‘सारी’चा संसर्ग दिसतो.मुंबईहून आलेले स्टेट बँक आॅफ इंडियाचे एक व्यवस्थापक देवळाई चौकामध्ये राहिले. त्यांना न्यूमोनिया झाला. त्यामुळे ‘सारी’ वॉर्डात दाखल करण्यात आले. शेवटच्या क्षणी ते कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. त्यानंतर श्वासोच्छ्वासक लावला; पण काही उपयोग झाला नाही. नंतर अल्पावधीत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनियाचा रुग्ण समजून घरातील सर्वांनी संपर्क ठेवला आणि चारजणांना न्यूमोनियाची बाधा झाली. अशा कितीतरी सारी-कोरोनाच्या कथा.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केलेल्या संशोधनामध्ये असे लक्षात आले आहे की, ‘सारी’च्या रुग्णांमध्ये कोविड-१९चे रुग्ण सापडतात. ५,९११ सारी रुग्णांमध्ये १०४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून, ‘सारी’च्या पुरुष रुग्णांमध्ये कोरोना सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. जवळपास ४० टक्के न्यूमोनियासदृश आजार असलेल्या सारी-कोरोना संशयित रुग्णांमध्ये परदेशी पर्यटनाचा इतिहास नाही. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आयसीएमआरने केलेल्या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील ५५३ सारी रुग्णांचा अभ्यास केला असता कोरोनाचे २१ पॉझिटिव्ह सापडले. या अहवालात सर्वाधिक ‘सारी’चे रुग्ण गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले. सारीच्या संसर्गजन्य आजाराच्या गटामध्ये कोरोनाचा समावेश अपरिहार्य झाला आहे.अगोदरच सगळी जनता लॉकडाऊनने हैराण आहे. त्यात कोणत्या एखाद्या भागामध्ये कोरोना रुग्ण निघाला की, पोलीस व्यवस्था कडक होते. त्या सगळ्या यातनांतून मार्ग काढत असताना मध्येच ‘सारी’चा हा सारिपाट काही वेगळाच आहे. ‘सारी’चे रुग्ण हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून, ग्रामीण भागातूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर येतआहेत. अगदी खेड्यातील सामान्य खासगी डॉक्टरसुद्धा सध्या सारी रुग्णांची जोखीम घ्यायला तयार नाहीत. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयाची वाट दाखविण्यात येते. प्रश्न एवढाच आहे की, शासनाच्या आरोग्य विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ आहे व अशा तोकड्या मनुष्यबळाच्या जोरावर कोरोनाप्रमाणेच ‘सारी’च्या रुग्णांची व्यवस्था ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. यापैकी एकही रुग्ण कोरोनाबाधित असेल, तर आरोग्य कर्मचाऱ्यांचे भविष्यही टांगणीला लागल्यासारखे होणार आहे.( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या