शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

देशात आता दररोज ४० किलोमीटर रस्त्याची बांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:10 IST

निवृत्तीनंतर राजकारणात उतरणारे पहिले लष्करी अधिकारी आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांची बातचीत.

- व्ही.के. सिंग(केंद्रीय राज्यमंत्री, वाहतूक आणि नागरी उड्डयन मंत्रालय)

आपण लष्करात घेतलेले प्रशिक्षण सरकार चालवताना उपयोगी पडते आहे काय? सैन्यदल आणि राजकारण यात तसा  बराच फरक आहे. मात्र ‘काम झाले पाहिजे’, ही गोष्ट दोन्हीमध्ये समान दिसते. सरकार चालवताना आपल्याला अनेक प्रकारच्या लोकांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये नोकरशहा, लोकप्रतिनिधी, सामान्य माणसे असतात. लष्करी शिस्तीची येथे अपेक्षा करता येत नाही. तरीही नरेंद्र मोदी यांनी सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून शिस्त आणि काम होणे या दोन्ही बाबतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

आपले मंत्रालय रोज किती किलोमीटर रस्ते बांधते? सध्या दिवसाला आम्ही ३२ किलोमीटर रस्ता बांधतो. वर्षअखेरीपर्यंत हे प्रमाण ४० किलोमीटरपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. विचार करा, यूपीएच्या राजवटीत दिवसाला केवळ दोन किलोमीटर रस्ता बांधला जात होता.

इतक्या गतीने काम करण्यासाठी पुरेसा निधी आहे? तो प्रश्नच नाहीये. सरकारने आमच्या मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद १.९० लाख कोटींनी वाढवली आहे. शिवाय बीओटी, बीओडी, हायवे ॲन्युईटी अशा काही मार्गांनी आम्ही पैशाची उभारणी करतो. परदेशी गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्याऐवजी सामान्य भारतीयांकडून सात टक्के दराने पैसे घेण्याचे आम्ही ठरवले आहे. बँकांचे व्याजदर पाच ते सहा टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. आमच्या प्रस्तावाला गुंतवणूकदारांचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. सेबीकडून मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत.

टोलचे भरमसाट दर हाही एक प्रश्न आहे...बांधकाम खर्चानुसार टोलचा दर ठरवला जातो. हमरस्त्यांमुळे केवळ प्रवास सुकर होतो, असे नाही तर स्वस्तही होतो. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे तुम्हाला बारा तासांत मुंबईला पोहोचवेल आणि ट्रकला बावीस तास लागतील. सध्या ट्रकच्या प्रवासाला ४८ तास आणि मोटारीला २८ तास लागतात. आता एक्स्प्रेस वेमुळे इंधन खर्च नक्कीच वाचेल.

सुपीक जमीन वापरून ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे कशासाठी बांधायचे? आता असे पाहा की जेव्हा जेव्हा हमरस्ता बांधला जातो तेव्हा बाजूच्या जमिनींचे भाव गगनाला भिडतात. पायाभूत सुधारणा होतात. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होतो. आम्ही पन्नास ते साठ हजार कोटी रुपये दरवर्षी भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना देत आहोत.

रेल्वे किंवा जलमार्ग वाहतूक अधिक बळकट केली तर ते स्वस्त पडणार नाही का? आपले बरोबर आहे. जलवाहतूक रस्त्यापेक्षा खूपच स्वस्त पडते. रस्त्याने जायला जर तुम्हाला किलोमीटरमागे दहा रुपये पडत असतील तर रेल्वे सहा रुपयांना पडते आणि जलवाहतुकीसाठी केवळ एक रुपया खर्च येतो. पण स्वातंत्र्यानंतर आपण जलवाहतूक कधीच गांभीर्याने घेतली नाही. सध्या ७० टक्के मालवाहतूक आणि ९० टक्के प्रवासी वाहतूक रस्त्याने होते. दररोज गाड्या खरेदी केल्या जातात. आपल्याला अधिक संख्येने आणि जास्त चांगले रस्ते गरजेचे झाले आहेत.

हमरस्ता बांधणी खर्चात  ४ ते १०० कोटी प्रति किलोमीटर इतका फरक कसा पडतो? खर्च अनेक घटकांवर अवलंबून असतो. पूल, उड्डाणपूल, बोगदे वगैरे किती आहेत त्यानुसार खर्च कमी-अधिक होतो. दुहेरी रस्त्यासाठी साधारणतः एक किलोमीटरला दोन कोटी रुपये लागतात, पण तिहेरी रस्ता त्यावरचे पूल आणि भूसंपादन यावर होणारा खर्च प्रति किलोमीटर पंधरा ते सोळा कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो..

इलेक्ट्रॉनिक वाहनांबाबत घाई होत आहे असं वाटत नाही? हळूहळू ही वाहने स्वस्त होतील. पुढच्या दोन वर्षांत पेट्रोल कार तयार करायला जेवढा खर्च येतो तेवढ्यात इलेक्ट्रिक कार तयार होईल. दुचाकी तसेच ऑटो रिक्षांसाठी हीच स्थिती असेल. पेट्रोल आणि डिझेल गाड्या कालबाह्य होण्याचा दिवस फार लांब नाही.

टॅग्स :VK Singhव्ही के सिंग