शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

सततच्या स्क्रोलिंगने आपले माकड केले आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:15 IST

माणसे एक अख्खा सिनेमा सलग पाहत नाहीत. पूर्ण गाणे ऐकत नाहीत! कुठल्याही एका जागी थांबतच नाहीत! माणसांचे हे काय चालले आहे?

- समीर गायकवाड, स्तंभलेखक, ब्लॉगर आणि सामाजिक कार्यकर्तासोशल मीडियापासून दूर असलेली माणसे अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. दीड जीबीचा डेटा हा आता विनोदाचा विषय होऊ पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे, याहीपुढला खरा प्रश्न हा  की, माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय? 

फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, लिंक्डइन इत्यादीत अकाउंट असते. माणसे लॉग इन करतात आणि त्यात हरवून जातात. मग सुरू होते स्क्रोलिंग! तासन्तास माणसे स्क्रोल करत  या वॉलवरून त्या वॉलवर, या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये भरकटत राहतात. या प्रोफाइलवरून त्या प्रोफाइलवर जातात. डिस्प्ले पिक्चर, फोटो अल्बम, व्हिडिओ रिल्समध्ये खोल-खोल फिरत राहतात. पटापट चित्रे बदलत राहतात. मजकुरावरून नुसती नजर भिरभिरत राहते, मध्येच एखादा व्हिडिओ रन होतो, मध्येच एखादी ऑडिओ क्लिप प्ले होते, अचानकच टीझर येते, टिकटिक करणारे टिकर येते. मन एकीकडे असते, नजर एकीकडे आणि बोटांची हालचाल अविरत सुरू असते.   

सोशल मीडियाने दिलेला सर्वांत मोठा शाप जर कुठला असेल तर तो अधीरतेचा आहे. हे चित्र संवेदनशील मनास अंतर्बाह्य हलवून टाकणारे आहे. सोशल मीडियात पोस्ट, फोटो, व्हिडिओ वा मजकूर स्क्रोल होत नसून माणूसच स्क्रोल होतोय. इथे माणसे अधीरतेच्या कमाल पातळ्या गाठण्यासाठी पेटून उठलीत. एखाद्या चांगल्या वॉलवर, पोस्टवर ती थांबू शकत नाहीत. मोठा मजकूर सलग नि पूर्ण वाचू शकत नाहीत. झरझर पुढे जातात. या स्क्रोलिंगची सवय आस्ते कदम त्याच्या दैनंदिन जीवनातदेखील भिनू लागलीय.  माणूसपण लोप पावून आपले डिजिटल आत्ममग्न स्वरूप सतत कसल्या न् कसल्या तरी अज्ञात वस्तूच्या, घटनेच्या, अणुरेणूच्या शोधात आहे. हा शोध अंतहीन आहे आणि त्यातून सुरू असलेले स्क्रोलिंग मानवी भावनांच्या मुळांवर उठलेले आहे. 

सोशल मीडिया सातत्याने वापरणारी माणसे एकसलग एक गोष्ट करूच शकत नाहीत. सिनेमा नाटकास गेले, तर दहाव्या मिनिटाला विचलित होतात. एखाद्या गाण्याच्या मैफलीत गेले, तर काही वेळातच अस्वस्थ होतात.   टीव्ही पाहत बसले की, मिनिटागणिक चॅनल बदलत राहतात. आवडीचा सिनेमादेखील सलग पाहण्याची क्षमता हरवून गेलीय. पुस्तक हाती घेतले तरी माणसे  भराभर पाने पालटत राहतात. कुठे भटकंती करायला गेले, तर कधी एकदा इथून निघून दुसरीकडे जातो यासाठी आतुर होतात.  माणसे वेळ काढून बाहेर पडली, बाजारात गेली तरी  एका जागी खरेदी करू शकत नाहीत. हे पाहू की ते पाहू, हे घेऊ की ते घेऊ, अशी द्विधा मन:स्थिती होते. ठरवतात एक आणि आणतात दुसरेच काही!  गप्पा मारत एका जागी अधिक वेळ बसू शकत नाहीत. कुठे सेलेब्रेशनला वा कार्यक्रमात गेले तर अवघ्या काही मिनिटांतच आपले वेगळे कोंडाळे करून बसतात.  कुठे काही दिसले जाणवले तर डोळ्याने पाहत नाहीत, तर हातातला मोबाइल काढून शूट करू लागतात. लोकांनी खोलात जाऊन विचार करणे आणि स्वतःला प्रश्न विचारणे बंद केले आहे.   

ज्याला त्याला आताच्या घडीला कुठला ट्रेंड सुरू आहे, हे जाणून घेण्याची एक अनामिक ओढ लागून असते.  माणसे ट्रेंडप्रमाणे बोलतात, लिहितात, रडतात, हसतात, धावतात, थांबतात, श्रद्धांजली वाहतात, शुभेच्छा देतात! जित्या जागत्या देहाचे रूपांतर बाहुलीत होऊ लागलेय. लोक नुसते धावताहेत, पुढे- पुढे जाताहेत. कुणाला कुणासाठी वेळ नाही, मग सोशल मीडियावर इतका अफाट वेळ कुठून देता येतो?

- अशा वेळी वाट पाहावी टॉलस्टॉयच्या ‘त्या’ गोष्टीतल्या शेवटाची. जमिनीच्या हव्यासापोटी धावणाऱ्याच्या अखेर कोसळण्याची, आहे तो आनंद गमावून बसल्याची जाणीव होण्याची! खऱ्या अर्थाने याची वाट पाहण्याचा हा काळ आहे.  ...म्हणूनच मी टॉलस्टॉयला शोधतो आहे. तुम्हालाही स्वतःचा शोध घ्यायचा असेल, तर त्याला शोधलेच पाहिजे. कुणी पाहिलेय का त्याला?sameerbapu@gmail.com

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया