शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

काँग्रेसयुक्त भाजपा हेच खरे

By संदीप प्रधान | Updated: December 1, 2017 00:31 IST

विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने माधव भंडारी दु:खात उसाचा रस पित बसले आहेत. तेवढ्यात अत्यंत मृदु स्वरात त्यांच्या कानावर हाक ऐकू येते...

विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने माधव भंडारी दु:खात उसाचा रस पित बसले आहेत. तेवढ्यात अत्यंत मृदु स्वरात त्यांच्या कानावर हाक ऐकू येते... माधव... माधव... भंडारी दचकून इकडे तिकडे बघतात तर त्यांना गांधीजी दिसतात.माधवराव : दिलीप प्रभावळकर आज इकडे कुठे आणि हे काय चक्क बापूंच्या वेशात. काय फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती की काय? (खिन्न हसतात)बापू : मी प्रभावळकर नाही. मी ओरिजनल बापू अर्थात मोहनदास करमचंद गांधी.माधवराव : काय चेष्टा करताय राव. विधान परिषदेची उमेदवारी मिळणार... मिळणार म्हणून आशेला लावून केलेली चेष्टा पुरी नाही झाली का?बापू : मला सगळं कळलं म्हणूनच तर मी तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला वेळीच जागं करायला आलो.माधवराव : चला क्षणभर आपण मानू की, तुम्ही खरेखुरे गांधीजी आहात. पण मी पडलो संघवाला. कट्टर नथुरामवादी. मग तुम्ही कशाला आलात मला जागं करायला.बापू : तुमचे विचार माझ्या विचारांपेक्षा भिन्न असतील. पण तुमच्या विचारांवरील निष्ठा पक्क्या आहेत. तुम्ही जेव्हा जेव्हा नथुरामचा विचार केला तेव्हा तेव्हा तुम्हाला माझे स्मरण करावेच लागले. हेच काय ते तुमच्या माझ्यातील नाते.माधवराव : बापू, तुम्ही म्हणताय की, तुम्ही मला जागं करायला आलाय. पण वेळ निघून गेली. माझ्याऐवजी दोनशे खोके गांधी असलेल्या लाडोबाला पक्षाने उमेदवारीचा प्रसाद दिला. मागेही निष्ठावंतांच्या गळ्यावर सुरी फिरवली गेलीच.बापू : ही सर्व कहाणी मला ठाऊक आहे. माधवराव : मग आता?बापू : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून तुम्ही संघ-भाजपाची मंडळी ‘काँग्रेसमुक्त भारता’करिता आपली सर्व शक्ती पणाला लावताय. पण काँग्रेस ही प्रवाही विचारधारा असून ती त्या त्या वेळच्या समाजाच्या अवस्थेचे प्रतिबिंब दाखवते. मला अभिप्रेत काँग्रेस आजची काँग्रेस नाही. पण ‘काँग्रेसमुक्त भारत’ निर्माण करता करता तुम्ही ‘काँग्रेसयुक्त भाजपा’ जन्माला घातलाय ते बघा. 

टॅग्स :BJPभाजपाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र