शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आघाडीत एकी तर भाजपामध्ये बेकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 13:24 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांच्या संतापाची झळ चंद्रकांत पाटील यांनाही बसली. मी काही आकाशातून आलेला नेता नाही.

मिलिंद कुलकर्णी

लोकसभा, विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्याने राजकीय पक्ष अधिक सक्रीय झाले आहेत. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची यात्रा आटोपली. आता बूथपातळीवर हा पक्ष काम करीत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील त्यासाठी जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. निवडणुकांसाठी जोरबैठका सुरु झाल्याचे चित्र आहे.ही पार्श्वभूमी असताना खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच धुळ्याच्या महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी महापालिकेच्या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा शरद पवार यांच्याहस्ते घडवून आणला.

या सोहळ्याच्या निमित्ताने कॉंग्रेस नेते अमरीशभाई पटेल, आमदार कुणाल पाटील यांनाही व्यासपीठावर स्थान दिले. पवारांनीही पटेल यांना महत्त्व दिले. तुम्ही शिरपूरपुरते मर्यादीत राहू नका. राज्याला तुमच्यासारख्या नेत्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले. पवार यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. याही वक्तव्याचे तसेच झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्ह्यात एकत्र राहावे, पटेल यांनी राष्ट्रवादीत यावे असे तर्क लढविण्यात आले. पण पटेल आणि कदमबांडे यांचे घनिष्ट संबंध आहेत. जिल्हा बँक, जिल्हा परिषद या संस्थांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित काम करीत आहे. नंदुरबारात राष्ट्रवादीचे बळ फार नाही. तेथे काँग्रेसच प्रबळ आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सामंजस्य ठेवल्यास भाजपापुढे मोठे आव्हान निर्माण करु शकतात. पवार यांना हेच सुचवायचे असावे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रथमच धुळे आणि नंदुरबारचा दौरा केला. राष्ट्रवादीची संघटनात्मक स्थिती त्यांच्या लक्षात आली असावी. त्यादृष्टीने ते पुढील रणनीती ठरवतील.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांच्या संतापाची झळ चंद्रकांत पाटील यांनाही बसली. मी काही आकाशातून आलेला नेता नाही. मला कुणी आमदार, मंत्री बनविलेले नाही. मी खालून वर आलो आहे, असे म्हणत त्यांनी पाटील यांनाच टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खडसे आता ‘एल्गार यात्रा’ काढणार आहेत. ओबीसीचे कार्ड हाती घेत खडसे खरोखर यात्रा काढतात काय, पक्षश्रेष्ठी त्यांच्या वक्तव्य आणि संभाव्य कृतीची काय दखल घेतात, हे पुढील काळात स्पष्ट होईल. धुळे महापालिका निवडणुकीत आता खरा रंग भरु लागला आहे. महामार्गावरुनच धुळ्याला ‘बायपास’ करणाऱ्या गिरीश महाजन यांनी दहीहंडीच्या निमित्ताने धुळ्यात प्रवेश केला. जळगावसारखी कामगिरी करुन दाखविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. महाजन समर्थकांना आव्हान सोपे वाटते. पण परिस्थिती तशी नाही, हे महाजन यांनाही धुळ्यात गेल्यावर लक्षात आले असेल. जळगावविषयी महाजन यांना इत्यंभूत माहिती आहे. विश्वासू कार्यकर्ते सोबत आहेत. धुळ्यात नेते सोबत आहेत, पण जळगाव, जामनेरहून कार्यकर्ते घेऊन जाऊन काम भागणारे नाही. आव्हान केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे नाही तर भाजपातील दुहीचेदेखील आहे. स्वपक्षीय आमदार अनिल गोटे हे निवडणुकीच्या तयारीला केव्हाच लागले आहेत. त्यांचा आक्रमक स्वभाव, तडफदार कार्यशैली पाहता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी ते कसे जुळवून घेतात, रघुनाथ कुलकर्णी यांच्यासह पक्षश्रेष्ठी ही मोट कशी बांधतात, हा उत्सुकतेचा आणि भाजपाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. गोटे यांचे पूत्र तेजस आणि खडसे यांचे निष्ठावंत सहकारी सुनील नेरकर यांनी राज ठाकरे यांची घेतलेली सदिच्छा भेट ही नवीन समीकरणांना उदय देणारी ठरु शकते. गोटे यांनी महाजन यांच्या भूमिकेला छेद देण्याचे जाहीर वक्तव्य करुन रणशिंग फुंकले आहे. गोटे यांची भूमिका पसंत नसणारी मनोज मोरे यांच्यासारखी मंडळी एकत्र येऊन काही पर्याय उभा करु शकतात काय, हे बघणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

मन की बात की मनसे?नाशिक, पुण्यात मनसेचा चमत्कार दिसून आला होता. जळगावातही दखलपात्र उमेदवार निवडून आले. पण त्याला पाच वर्षे उलटली आहेत. मनसेकडे सध्या कोणतीही संस्था नाही. त्यामुळे कोरी पाटी घेऊन राज ठाकरे मतदारांपुढे जात आहे. मराठी अस्मिता, विकासाचा मुद्दा, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार हे मुद्दे घेऊन ठाकरे यांची मनसे ‘धन की बात’ कळलेल्या भाजपाला टक्कर देऊ शकतील काय, हा प्रश्न आहेच. .

टॅग्स :BJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसेcongressकाँग्रेस