शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Chinchwad Byelection Result: एक अफवा, 'वंचित'ची भूमिका अन् काटे-कलाटे विभागणीनं राष्ट्रवादीला रुतला पराभवाचा काटा!

By संजय आवटे | Updated: March 2, 2023 18:56 IST

Chinchwad Byelection Result: चिंचवड मतदारसंघ राखण्यात भाजपला यश आलं हे खरं, पण त्यासाठी त्यांची दमछाक झाली.

>> संजय आवटे

चिंचवड मतदारसंघ राखण्यात भाजपला यश आलं हे खरं, पण त्यासाठी त्यांची दमछाक झाली. पोटनिवडणूक असूनही अत्यंत चुरशीची अशी ही लढत होती. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे प्रभावी आणि शक्तिशाली नेते. जगताप हे अजित पवारांच्या जवळचे. ते भाजपमध्ये गेले आणि देवेंद्र फडणवीसांचे 'खास' झाले. जगतापांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला, अश्विनी यांना भाजपने उमेदवारी दिली. कारण, जगतापांविषयी काही प्रमाणात असलेल्या सहानुभूतीचा फायदा भाजपला घ्यायचा होता. 

'ही निवडणूक बिनविरोध होणार नाही', हे अजित पवारांनी सर्वप्रथम जाहीर केले, ते 'लोकमत'च्या व्यासपीठावरच. पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार हे खास नाते आहे. मागच्या महापालिका निवडणुकीतील पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. त्यामुळे वचपा काढण्याची ही चांगली संधी होती. इथे अजित पवारांचा दबदबा आहे. त्यांनी ही निवडणूक व्यक्तिशः हातात घेतली. 

मात्र, राहुल कलाटे यांच्या उमेदवारीने चित्र बदललं. महाविकास आघाडीने एकच उमेदवार द्यावा, अशी व्यूहरचना होती. तसे घडले नाही. कलाटे हे शिवसेनेचे. गेल्या निवडणुकीत त्यांनी लाखाहून अधिक मते घेतली होती. मात्र, तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कलाटेंना पाठिंबा होता. यावेळी 'राष्ट्रवादी'चे उमेदवार नाना काटे होते, तर राहुल कलाटे अपक्ष होते. 'वंचित'ने कलाटेंना पाठिंबा दिला. कलाटेंमुळे भाजपचा विजय पक्का झाला. मतांचे विभाजन झाले. शिवाय 'कुजबुज कॅम्पेन' चालले. 

शिवसेनेचा पाठिंबा कलाटेंनाच आहे, अशी अफवा पसरली. उद्धव ठाकरे स्वतः आले असते, तर चित्र बदलले असते. आदित्य आले, पण त्यांनी कलाटेंविषयी भाष्य केले नाही. दुसरे म्हणजे, जगताप आणि अजित पवार यांचा स्नेह जुना. त्यामुळे अजित पवारांचाच जगतापांना छुपा पाठिंबा आहे, अशी कुजबुजही होती. अजित पवारांनी निवडणूक हातात घेतली. 'राष्ट्रवादी'च्या केडरनेही जोरकस काम केले. पण, मतविभाजनाचा फटका बसला. स्थलांतरित उच्चवर्गीय मतदार भाजपसोबत होता. जगतापांचे वलय होतेच. भाजपनेही ताकदीने काम केले. शिवाय, कुजबुज कॅम्पेन. त्यामुळे अर्थातच भाजपला हा मतदारसंघ राखता आला आणि 'राष्ट्रवादी'ची एक संधी गेली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक