वास्तूरचनेतही होतोय मुलांचा विचार
By Admin | Updated: November 9, 2014 01:20 IST2014-11-09T01:20:34+5:302014-11-09T01:20:34+5:30
पल्या पाल्याच्या आनंदासाठी आईवडील अहोरात्र झटत असतात. मुलाला त्याच्या आवडीचा सिनेमा दाखवण्यापासून, हॉटेलिंग आणि मॉलची सफर घडवून त्याला आनंद देण्यात त्यांना अपार समाधान मिळतं.

वास्तूरचनेतही होतोय मुलांचा विचार
पल्या पाल्याच्या आनंदासाठी आईवडील अहोरात्र झटत असतात. मुलाला त्याच्या आवडीचा सिनेमा दाखवण्यापासून, हॉटेलिंग आणि मॉलची सफर घडवून त्याला आनंद देण्यात त्यांना अपार समाधान मिळतं. म्हणूनच मुले भेट देणारी ही ठिकाणं त्यांच्या अधिकाधिक सोयीची कशी होतील, याचा विचार आजच्या वास्तूस्थापत्य शास्त्रत प्राधान्याने होत आहे. किंबहुना भविष्यात तो अधिकाधिक रुजण्याची गरज आहे.
अगदी गेल्या दोन - तीन दशकांर्पयत कुठल्याही ठिकाणी उपभोक्ता प्रौढच असल्याचे ठामपणो गृहीत धरूनच हॉटेल, थिएटरमधील रचना आणि सजावट केली जात असे. त्यात कधी मुलांचा विचारच होत नसे. त्यातल्या त्यात क्राय रूम हीच काय ती पहिली सुविधा. गेल्या आठ-दहा वर्षापासून मात्र लहान मुलांच्या सोयीचा अतिशय सूक्ष्मपणो विचार होत आहे, ही समाधानाची बाब आहे. त्यानुसार एकूणच वास्तूरचनेपासून इंटिरियर डिझाइनमध्ये वेगवेगळे बदल होत आहेत.
पूर्वी हॉटेलमधील डायनिंग टेबल ही प्रौढांची उंची विचारात घेतच तयार होत असे. कमी उंची असलेल्या मुलांना त्या टेबलवर बसून खाणो, गप्पा मारणो गैरसोयीचे होत असे. वर्षानुवर्षे या गैरसोयीचा विचार झाला नव्हता. आता मात्र खास मुलांसाठी आखूड उंचीची डायनिंग टेबलं तयार केली जातात. पालकांच्या टेबलशेजारीच ती मांडून बालक - पालक एकत्रित जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. टेबलाची उंची कमी करू न इच्छिणारे हॉटेलमालक मुलांना सोयीच्या असलेल्या उंच खुच्र्या ठेऊ लागले आहेत.
शॉपिंग सेंटर, मॉलमधील काउंटर, शोकेस या नानाविध उत्पादनांनी भरलेले असतात. ही काउंटरही पाच - सहा फूट उंचीच्या ग्राहकांच्याच सोयीची असत. पूर्वी पालक स्वत:च मुलांसाठी खरेदी करीत तोर्पयत ते ठीकही होते. मात्र आता मुलांच्या निवडीकडे आवजरून लक्ष दिले जाते. त्यामुळे कमी उंचीचे काउंटरही आता तयार केले जातात. मुले सहजगत्या आपल्या पसंतीची उत्पादने निवडू शकतात.
शॉपिंग सेंटर, मॉलच्या एकूणच रचनेतही मुलांच्या सोयीचा, त्यांच्या आकर्षणाचा विचार केला
जातो. मुलांसाठी अधिकाधिक हवेशीर, प्रशस्त जागा कशी उपलब्ध करून देता येईल याचाही विचार केला जातो. असेच बदल हॉटेल, थिएटरमधल्या युरीनलमध्येही होत आहेत. पुरुषांसाठी असलेले युरीनल वापरताना मुलांची पंचाईत होत असे. ती गैरसोय लक्षात घेऊन कमी उंचीची युरीनल वापरात येऊ लागली आहेत.
अगदी मुलांच्या बेडरूमची रचना, सजावटीबाबतही पालकांची सजगता वाढत आहे. प्रत्येक बाबतीत मुलांची आवडनिवड लक्षात घेतली जाते, ही बाब खचीतच स्वागतशील आहे.
(लेखक वास्तूरचनाकार आहेत़)
- दिनेश नगराळे