शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

तेलंगणात शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 03:56 IST

देशभरात राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक, राफेलसारख्या विषयांवर निवडणूक प्रचार केंद्रित झाला़ मात्र तेलंगणातील निजामाबादमध्ये शेती आणि हमीभाव हाच मुद्दा प्रचारात वरचढ ठरला.

- धर्मराज हल्लाळेदेशभरात राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक, राफेलसारख्या विषयांवर निवडणूक प्रचार केंद्रित झाला. मात्र तेलंगणातील निजामाबादमध्ये शेती आणि हमीभाव हाच मुद्दा प्रचारात वरचढ ठरला. ज्यामुळे तेलंगणा राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांना निजामाबाद मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न देशासमोर उभा करणाºया सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीला हा मोठा धक्का आहे़ त्याहीपेक्षा शेतकऱ्यांनी ठाम राजकीय भूमिका घेऊन सत्ताधाºयांना शेती प्रश्नावर कोंडीत पकडले, ही बाब दिशा देणारी आहे़रयतू बंधू अर्थात शेतकरी मित्र ही योजना आणून वर्षामध्ये दोन वेळा प्रत्येक शेतकºयाला ४ हजारप्रमाणे एकूण ८ हजार रूपये बी-बियाणे व खते खरेदीसाठी देण्यात आले़ केंद्र सरकारच्या आधी राबविलेली योजना देशभर चर्चेत राहिली़ ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत टीआरएस ६३ जागांवरून ८८ जागांवर पोहोचली़ २०१४ च्या निवडणुकीत १७ पैकी ११ मतदारसंघात टीआरएस खासदार निवडून आले. मात्र २०१९ च्या लढाईत टीआरएसचे संख्याबळ घटून ९ वर आले़।निजामाबादचे उदाहरणदेशभरात लाटेनंतर आलेली दुसरीसुप्त लाट ही चर्चा अनेक दिवसहोत राहील़ जय-पराजयाची अनंत कारणे सांगितली जातील़ परंतु, शेतकºयांनी भूमिका घेऊन एखाद्या मतदारसंघात तेथील मुख्यमंत्र्यालाच आव्हान देऊन सत्ता उलथवून टाकल्याचे निजामाबादचे उदाहरण इतिहासात नोंदविले जाईल़

>अत्यंत प्रतिष्ठेच्या निजामाबादमधील लढाईत मुख्यमंत्र्यांची कन्या कविता पराभूत झाली़ तिथे १८५ उमेदवार रिंगणात होते़ त्यापैकी १७८ शेतकरी होते़एकीकडे रयतू बंधू योजना साकारणाºया टीआरएसला मोठ्या संख्येने असलेल्या हळदी उत्पादक शेतकºयांना दिलासा देता आला नाही़ अशावेळी शेतकºयांनी राज्यात प्रभाव असलेल्या टीआरएसला केवळ जाब विचारला नाही तर राजकीय भूमिका घेतली़ हजारावर शेतकºयांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ त्यातील १७८ शेतकरी शेवटपर्यंत रिंगणात राहिले़ तर अन्य पक्ष मिळून एकूण उमेदवारांची संख्या १८५ होती़
केवळ शेतकरी असलेल्या १७८ उमेदवारांनी ९८ हजार ७३१ मते घेतली़ ज्यामुळे टीआरएसच्या कल्वाकुंतला कविता ७० हजार ८७५ मतांनी पराभूत झाल्या़ तिथे पहिल्यांदाच भाजपाचे अरविंद धर्मापुरी निवडून आले़विशेष म्हणजे २०१४ च्या मोदी लाटेच्या निवडणुकीत कविता १ लाख ६७ हजार १८४ इतके मताधिक्य घेऊन निवडून आल्या होत्या़

टॅग्स :Telangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल 2019Telanganaतेलंगणा