शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्याचाच विरोधी पक्षनेता! कोर्टात जाण्याऐवजी गिनीज बुकच्या ऑफिसात जायला हवं

By अतुल कुलकर्णी | Updated: August 21, 2022 05:45 IST

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई  साहेब नमस्कार,  आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळालं. अभिनंदन..! पण विरोधी पक्षनेतेपद देखील आपल्याच पक्षाला मिळालंय... एकाच ...

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई साहेब नमस्कार, आपल्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळालं. अभिनंदन..! पण विरोधी पक्षनेतेपद देखील आपल्याच पक्षाला मिळालंय... एकाच पक्षाला ही दोन्ही पदं कशी काय मिळू शकतात...? डोकं पार भंजाळून गेलंय. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता हे कसं काय घडू शकतं...? देशात असं एखादं तरी उदाहरण आहे का...? असेल तर नक्की सांगा... नसेल तर गिनीज बुकात नोंद करायला तरी पाठवा...  शिंदे गट का ठाकरे गट...? या वादापेक्षा एकदम भारी मुद्दा... हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे..! तेव्हा तो गिनीज बुकात नोंदवलाच पाहिजे... याची कागदपत्र गोळा करायला सांगा आणि कोर्टात पाठवायच्या ऐवजी गिनीज बुकात पाठवा... कायमची नोंद तरी होईल..! कारण असा विक्रम पुन्हा होणे नाही..., असं नाही वाटत साहेब तुम्हाला...?शिवसेना कोणाची..? या वादाचा निकाल लागायचा तेव्हा लागेल... त्यात काही वर्षे जातील... त्यापेक्षा गिनीज बुकात पटकन नोंद होऊन जाईल...! पोरांना, नातवंडांना गोष्टी सांगताना हे रेकॉर्ड कामाला येईल...! आपला पक्ष भारी... आपले नेते भारी.... आयला, आपलं सगळंच लई भारी...! मराठी माणूस उगाच नाही म्हणत साहेब आपल्याला...

मागे देखील आपल्या पक्षानं असाच एक रेकॉर्ड केला होता... पंधरा-वीस दिवस आपले आमदार विरोधी पक्ष म्हणून सभागृहात बसले...  त्या पंधरा दिवसांत किती मागण्या केल्या...! कर्जमाफी झाली पाहिजे, वीजमाफी झाली पाहिजे... आणि पंधरा दिवसानंतर आपले लोक सत्ताधारी पक्षात गेले...! विरोधी पक्षात बसून आपण केलेल्या मागण्यांचं पुढे काय झालं? हे विचारण्याची कोणाची मजाल झाली नाही पुढं पाच वर्षे...! त्यानंतर पाच वर्षे आपण राजीनामे खिशात घेऊन फिरत राहिलो... सरकारमध्ये राहून सरकारला ठोकत राहिलो... हे असं इतर कोणत्या पक्षाला आजपर्यंत जमलंय का साहेब..! आपला पक्ष म्हणजे जोक नाही साहेब..? 

आपला तो पण एक विक्रमच होता... पण तो कुठे ना कुठे झाला असेल. हल्ली कुठे काय घडेल सांगता येत नाही. तिकडे नितीशकुमारचंच बघा ना... आदल्या दिवशी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्याचा पदर धरून मुख्यमंत्री झाले...! (आपला तर आदर्श घेतला नाही ना साहेब त्यांनी... हे असं काही करण्याचे कॉपीराईट तातडीनं आपण आपल्याकडे घेतले पाहिजेत) आपण जे पंधरा-वीस दिवसांत केलं ते नितीश कुमार यांनी काही वर्षांनी एक दिवसात केलं. पण ज्याचा मुख्यमंत्री, त्याचाच विरोधी पक्षनेता, असा आपल्या पक्षाचा विक्रम त्यांनाही मोडता आलेला नाही...! आपल्यासारखा पक्ष देशातच काय जगात कंदील लावून शोधला तरी सापडणार नाही...! तेव्हा जमवून आणा आणि कोर्टात जाण्याऐवजी गिनीज बुकच्या ऑफिसात जायला सांगा... या विक्रमाची नोंद पक्की करून घ्यायला लावा...

इतका आपुलकीने, आत्मियतेने आपल्याला कोणीही सल्ला देणार नाही बरं का साहेब... मी म्हणून देतोय..! ते जमतच नसेल तर एक आयडिया देऊ का..? तुम्ही आपले म्हणून तुम्हाला आयडिया देतो, हळूच सांगतो. कोणाला कळायच्या आत आपणच एक गिनीज बुकाची शाखा आपल्या शाखेजवळ काढून टाकू...! नाहीतरी दादरला दोन-दोन शाखा सुरू झाल्याच आहेत... त्यात तिसरी गिनीज बुकाची शाखा काढू... आपणच आपला विक्रम, आपल्याच गिनीज बुकात नोंदवून टाकू.... कोर्ट कचेऱ्या ज्याला करायच्या त्याला करू द्या... आहे की नाही भन्नाट आयडिया..? तेव्हा साहेब, कोणाला तरी कामाला लावा, आणि हे करून टाका. बाकी बरे आहात ना...?-  तुमचाच, बाबूराव

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना