शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. माधवी म्हणतात, माझं ‘एकटीचं’ कौतुक नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:23 IST

Dr. Madhavi Lata: आपला सहभाग असलेला एखादा मोठा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला की कौतुकाच्या केंद्रस्थानी आपण असलेलं प्रत्येकालाच आवडतं. पण, प्रकल्पाचं यश हे संपूर्ण टीमचं आहे, माझं अवास्तव कौतुक करु नका, मला माझं काम करू द्या आणि माझ्या खासगीपणाचा आदर करा, असं सांगणारी माणसं मात्र दुर्मीळ असतात.

आपला सहभाग असलेला एखादा मोठा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला की कौतुकाच्या केंद्रस्थानी आपण असलेलं प्रत्येकालाच आवडतं. पण, प्रकल्पाचं यश हे संपूर्ण टीमचं आहे, माझं अवास्तव कौतुक करु नका, मला माझं काम करू द्या आणि माझ्या खासगीपणाचा आदर करा, असं सांगणारी माणसं मात्र दुर्मीळ असतात. डॉ. माधवी लता यांचं नाव अशा दुर्मीळ माणसांच्या यादीत घेतलं जायला हवं. 

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन केलं. त्या पुलाच्या बांधणीत ज्या अनेकांनी मोलाचं योगदान दिलं, त्यातलं प्रमुख नाव म्हणजे डॉ. माधवी लता. डॉ. माधवी लता या बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. चिनाब पूल उभारणी प्रकल्पात गेली १७ वर्षे भू-तंत्रज्ञान सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावत एम. टेक. आणि नंतर आयआयटी मद्रासमधून त्याच विषयात डॉक्टरेट असा डॉ. माधवी लता यांचा प्रवास आहे.

चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर सर्वत्र डॉ. माधवी लता यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि ते स्वाभाविकही आहे. मात्र, त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमधून त्यांचं वेगळेपण अधोरेखित होत आहे. “चिनाब पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. हा पूल हे स्थापत्य अभियांत्रिकीतील आपल्या प्रगतीचं द्योतक आहे, त्यामुळे त्याबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन! या पुलाचं नियोजन, आरेखन आणि बांधणीचं संपूर्ण श्रेय हे भारतीय रेल्वे आणि ॲफकॉन्स इन्फ्राचं आहे. माझा त्यात खारीचा वाटा आहे, म्हणूनच मला गरजेपेक्षा जास्त ‘फेमस’ करु नका. या पुलाच्या यशस्वी उभारणीत योगदान दिलेल्या हजारो व्यक्तींपैकी मी एक आहे, हे लक्षात ठेवा” असं आवाहन डॉ. माधवी लता यांनी केलं आहे.

टॅग्स :IndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल