येचुरींपुढचे ‘अ.भा.’ आव्हान
By Admin | Updated: April 23, 2015 00:50 IST2015-04-23T00:33:05+5:302015-04-23T00:50:43+5:30
मीडियातील काही माणसे सोबतीला ठेवली आणि पक्षातील काही चाहते प्रसन्न राखले की आपण कोणालाही नमवू शकतो या धारणेने पछाडलेल्या

येचुरींपुढचे ‘अ.भा.’ आव्हान
गेवराई : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील ९७ जागांसाठी बुधवारी ७९.४० टक्के इतके मतदान झाले. उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले असून संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.
१४ ग्रा.पं. मधील निवडणूक कार्य्रकम पार पडला. सूर्डी व टाकगव्हाण या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. त्यामुळे १२ ग्रा.पं.साठी निवडणूक झाली. सकाळी सात ते सायंकाळी पाच या दरम्यान मतदानप्रक्रिया झाली. गढी, तलवाडा, पांढरवाडी, जवाहरवाडी, मुळूकवाडी, चव्हाणवाडी, चोपड्याचीवाडी, डोईफोडवाडी, कुंभारवाडी, तळेवाडी, वंजारवाडी, गोविंदवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
उन्हामुळे दुपारी शुकशुकाट
मतदारांना हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर पोहोचताना घामाघूम व्हावे लागले. सकाळी व दुपारनंतर मतदानासाठी गर्दी झाली होती. दुपारी पारा चढल्याने केंद्रे ओस पडली होती.
गढी, तलवाड्याकडे लक्ष
सर्वांत मोठ्या तलवाडा ग्रामपंचायतीसह गढी येथील निवडणूक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. तलवाड्यात १७ सदस्यांसाठी ५५ जण रिंंगणात आहेत. अॅड. सुरेश हात्ते यांच्या त्वरितापुरी ग्रामीण विकास आघाडी, प्रा. शाम कुंड यांच्या परिवर्तन विकास आघाडीच्या पॅनलमध्ये थेट लढत झाली. स्वाभिमानी विकास आघाडीचा पॅनलही आखाड्यात होता. चार अपक्षही नशीब आजमावत आहेत.
गढी येथे ११ सदस्यांच्या ग्रा. पं. मध्ये २२ जणांत थेट सामना झाला. उद्धव खाडे व अंकुश गायकवाड यांच्यात झुंज झाली. (वार्ताहर)