शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र आराधनेचे शताब्दी पर्व! जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:05 IST

‘पंच परिवर्तना’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे.

योगी आदित्यनाथमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

भारतभूमी ही त्याग, तपस्या आणि धर्माची अखंड परंपरा जपणारी आहे. संकटांच्या काळात या भूमीतूनच जागृतीच्या ज्वाला उठल्या आणि जनमानसाला नवी दिशा मिळाली. १९२५ साली नागपूरमध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी प्रज्वलित केलेली एक छोटी ज्योत आज ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी सांस्कृतिक संघटनेचा अखंड राष्ट्रदीप बनली आहे.संघाचा जन्म हा राजकीय महत्त्वाकांक्षेतून नव्हे, तर भारतीय आत्म्याच्या ऊर्जेतून झाला. जेव्हा समाज अंतर्बाह्य सुदृढ, संघटित आणि चरित्रवान बनेल, तेव्हाच स्वातंत्र्याचे सार्थक होईल अशी डॉ. हेडगेवार यांची भावना होती. त्यामुळे संघाची शाखा ही केवळ खेळ अथवा व्यायामाची जागा नसून चरित्रनिर्मितीची कार्यशाळा ठरली.आज संघाच्या ८३ हजार शाखा आणि लाखो सेवा प्रकल्प शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आपत्ती निवारण यांसारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या निराशाजनक काळातही संघाने सेवाभावातून राष्ट्राला सकारात्मक दिशा दिली. युद्धकाळ असो वा नैसर्गिक आपत्ती – स्वयंसेवक नेहमी आघाडीवर राहिले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही संघाचे शिस्तबद्ध नेतृत्व निर्णायक ठरले. डॉ. हेडगेवारांनंतर गुरुजी गोळवलकर, बाळासाहेब देवरस, रज्जुभय्या, सुदर्शनजी आणि आता डॉ. मोहन भागवत यांनी संघाला काळानुरूप दिशा दिली. या प्रवासातूनच देशाला पं. दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन, अटल बिहारी वाजपेयी यांचे उदार राष्ट्रवाद आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्षम नेतृत्व लाभले.आजच्या जागतिकीकरणाच्या काळात जेव्हा संस्कृती आणि कुटुंबसंस्था डळमळीत दिसतात, तेव्हा संघाची उपयुक्तता अधिकच ठळक होते. भारताचे भविष्य केवळ तांत्रिक प्रगतीवर नाही तर संस्कार, चरित्र आणि सांस्कृतिक स्थैर्यावर उभारलेले असेल, याचे संघ सतत स्मरण करून देत आला आहे.शताब्दी पर्व हा केवळ इतिहासाचा उत्सव नसून, नव्या शतकासाठीचा संकल्प आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंबबोधन, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्यबोध या ‘पंच परिवर्तनां’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे. शताब्दी पर्वाचा हा क्षण आपल्याला स्मरण करून देतो की गेलेला काळ हा फक्त इतिहास आहे, पण येणारी शताब्दी हे आपले कर्तव्य आहे. जर प्रत्येक भारतीयाने आपल्या अंतःकरणात संघाच्या संस्कारांचा दीप प्रज्वलित केला तर कोणतीही शक्ती भारताला विश्वगुरु होण्यापासून रोखू शकणार नाही.  भारत माता की जय!

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Centenary: A Century of Nation-Building, World's Largest Cultural Organization

Web Summary : RSS, born from Indian spirit, promotes unity and character. Eighty-three thousand branches serve in education, health, disaster relief. It shaped leaders like Vajpayee and Modi, emphasizing cultural values amid globalization. The centenary marks a pledge for social harmony and national progress.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघyogi adityanathयोगी आदित्यनाथ