शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

फेरीवालांच्या प्रकरणात कायद्यानेच घातला घोळ, न्यायालयाला हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 5:15 AM

‘स्ट्रीट वेंडर अ‍ॅक्ट, २०१४’मध्ये तरतूद असतानाही अद्याप हे फेरीवाले स्टेशनजवळील परिसरात किंवा गर्दीच्या ठिकाणी का बस्तान मांडतात, असा प्रश्न सामान्यांच्या मनाला नेहमी पडत असेलच.

-दीप्ती देशमुखगर्दी किंवा मोक्याच्या ठिकाणावरून फेरीवाल्यांना हटवून त्यांच्यासाठी शहरात एका ठिकाणी ‘फेरीवाले क्षेत्र’ करण्याची ‘स्ट्रीट वेंडर अ‍ॅक्ट, २०१४’मध्ये तरतूद असतानाही अद्याप हे फेरीवाले स्टेशनजवळील परिसरात किंवा गर्दीच्या ठिकाणी का बस्तान मांडतात, असा प्रश्न सामान्यांच्या मनाला नेहमी पडत असेलच. मात्र, दुर्दैवाने हा प्रश्न सध्या तरी सरकार सोडवू शकत नाही. याला कारणीभूत सरकार आहे. सरकारने कायदा तयार करताना घातलेला घोळ सरकारही सोडवू शकत नाही. आता यात न्यायालयाला हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नाही. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाना देण्याचे काम कायद्याने ज्या टाऊन वेंडिंग कमिटीला (टीव्हीसी) दिले आहे, ती कमिटी अस्तित्वात कशी आणायची? हा पेच राज्य सरकारपुढे आहे. कमिटीतील २० सदस्यांपैकी आठ सदस्य नोंदणीकृत फेरीवाले असतील, तर या फेरीवाल्यांची नोंदणी करण्याचा अधिकार टीव्हीसीला आहे. पण, घोळ तर यातच आहे. टीव्हीसी अस्तित्वात आल्याशिवाय फेरीवाल्यांची नोंदणी होणार नाही आणि नोंदणीकृत फेरीवाले टीव्हीसीचे सदस्य बनल्याशिवाय कायद्याला अभिप्रेत असलेली टीव्हीसी पूर्ण होऊ शकत नाही. कायद्यातील हा पेच सोडविण्यासाठी फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत आणि न्यायालयाने या याचिकांवरील निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे लवकरच ही गुंतागुंत सुटेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.फेरीवाल्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१३ मध्ये काही मागदर्शक तत्त्वे आखत केंद्र सरकारला ही मागदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन कायदा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार केंद्र सरकारने २०१४ मध्ये ‘स्ट्रीट वेंडर अ‍ॅक्ट, २०१४’ अस्तित्वात आणला. या कायद्यात महत्त्वाची भूमिका टीव्हीसीला देण्यात आली आहे. परंतु, ही टीव्हीसी अस्तित्वात आणण्यासाठी राज्य सरकारला दोन वर्षे लागली. आॅगस्ट २०१६ मध्ये राज्य सरकारने टीव्हीसीसंदर्भात अधिसूचना काढली. मात्र या कायद्यातील नियमांचा आणि योजनेचा काहीच पत्ता नव्हता. नियमाशिवाय कायदा पूर्ण होणार कसा? अखेरीस याबाबत अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर सरकारला जाग आली. राज्य सरकारने गेल्या वर्षी यासंदर्भात योजना आखली. तरीही रस्त्यावर हातपाय पसरणाºया फेरीवाल्यांना सरकार अडवू शकले नाही. ज्या फेरीवाल्यांना महापालिकांनी नोटीस बजावल्या त्या सर्व फेरीवाल्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. टीव्हीसीच अस्तित्वात न आल्याने फेरीवाल्यांना हटवणार कसे, असा प्रश्न न्यायालयालाही पडला. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याशिवाय न्यायालयापुढे गत्यंतर उरले नाही. मूळ मुद्द्यालाच हात घातल्याशिवाय पर्याय नसल्याने उच्च न्यायालयाने या सर्व याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवल्या. मुंबई, ठाणे, नवी मुंबई पालिकांच्या हद्दीतील फेरीवाल्यांच्या वकिलांचे, महापालिका व राज्य सरकारचे म्हणणे मांडून पूर्ण झाले आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे.।2004 मध्ये केंद्र सरकारने राज्यांशी चर्चा करून फेरीवाला धोरणाचा मसुदा तयार केला़ मात्र या मसुद्यात त्रुटी असल्याने त्यात सुधारणा करून २००९ मध्ये सुधारित मसुदा तयार करण्यात आला होता़ त्यानंतर २०१२ मध्ये हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते़ 15159 अधिकृत फेरीवाले आहेत. फेरीचा व्यवसाय बेकायदेशीरपणे करणाºयांची संख्या दोन लाखांच्या आसपास आहे़ 2.5% फेरीवाल्यांना शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी परवाना देण्याचा राष्ट्रीय धोरणाचा नियम आहे़ एकूण तीन लाख २० हजार परवाने देण्यात येणार आहेत. मात्र एक लाख २० हजारच अर्ज आले आहेत.।टीव्हीसीम्हणजे काय?दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करणे, सर्व फेरीवाल्यांचे कागदपत्र पडताळून त्यांना अधिकृत किंवा अनधिकृत ठरवणे व अधिकृत फेरीवाल्यांना प्रमाणपत्र देणे, अशी महत्त्वाची भूमिका टीव्हीसीला बजावायची आहे.या टीव्हीसीचे सदस्य संबंधित महापालिकांचे आयुक्त अन्य सरकारी अधिकारी आणि नोंदणीकृत आठ फेरीवाले असणे आवश्यक आहे.हे फेरीवाले टीव्हीसीचे सदस्य नसतील तर कमिटी होऊ शकत नाही. टीव्हीसीने नोंदणी केल्याशिवाय आठ फेरीवाले सदस्य होऊ शकत नाहीत आणि त्याशिवाय टीव्हीसी पूर्ण होऊ शकत नाही.

टॅग्स :hawkersफेरीवाले