शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त पाहून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी एवढा विचार करावा, की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 08:00 IST

मुहूर्त पाहून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे नेते ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हे संवैधानिक मूल्य पायदळी तुडवत आहेत, तसेच संतांचाही अपमान करीत आहेत!

कृष्णा चांदगुडे

भारत हा अनेक दृष्टीने विसंगतींचा देश समजला जातो. त्यातील एक विसंगती म्हणजे टोकाचा  वैज्ञानिक दृष्टिकोन व टोकाच्या अंधश्रद्धा अशा दोन्हींचे अस्तित्व! पं. जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळणार होते, तशी तारीख पक्की झाली होती, पण काही ज्योतिषांनी हा दिवस अशुभ असल्याचा व त्यामुळे देशाचे भविष्य चांगले होणार नसल्याचा शोध लावला. काहींनी स्वातंत्र्यासाठी एक दिवस उशिराचा मुहूर्त धरण्याचा  आग्रह नेहरूंकडे धरला; परंतु नेहरूंनी ही मागणी फेटाळून लावली. तसे केले तर तो शहिदांचा अपमान होईल, असे नेहरूंनी म्हटले होते. पं. नेहरू यांच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सध्या राजकारण्यांना विसर पडला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांनी मुहूर्त पाहून आपले उमेदवारी अर्ज भरून ते दाखल करण्याचा सपाटा लावल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ते फलज्योतिषांचे उंबरठे झिजवत आहेत. यामुळे फलज्योतिषासारख्या थोतांड विषयाला मोठी प्रसिद्धी आणि फलज्योतिषांच्या  धंद्यात बरकत होण्याचा मार्ग  प्रशस्त होऊन धंद्याला सुगीचे दिवस येणार आहेत. जे उमेदवार मुहूर्त पाहून आपला उमेदवारी अर्ज भरतात, त्यांची कीव करावी, अशी परिस्थिती आहे. त्यांचा स्वतःच्या स्वकर्तृत्वावर अजिबात विश्वास नाही, हे त्यांच्या मुहूर्त पाहण्याच्या कृतीवरून सिद्ध होते.

जर त्यांनी  कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे आणि नैतिकपणे  लोक समस्या  सोडविण्याचा वेळच्यावेळी आटोकाट प्रयत्न केला असता तर लोकांनीच त्यांना उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असता. मग त्यांना अर्ज भरण्यासाठी  फलज्योतिषाकडे जाऊन त्याचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन मुहूर्त पाहण्याची गरज उरली नसती.  एकाच मतदारसंघातील अनेक उमेदवार मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज भरतात. मात्र, त्यापैकी एकच उमेदवार निवडून येतो.  मुहूर्त पाहून  उमेदवारी अर्ज  भरलेले आणि तरीही पराभूत झालेले उमेदवार या  विसंगतीचा  विचार मतदारांनीच करायला हवा.दुसऱ्या बाजूला हे लोकप्रतिनिधी निवडून जाऊन भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहेत, असे मानले तर मुहूर्त पाहून अर्ज भरण्याची त्यांची ही दैववादी कृती राज्यघटनेतील प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पूर्णपणे विसंगत आहे. नशीब, प्राक्तन, मुहूर्त, शुभ-अशुभ वेळ, शकुन-अपशकुन  अशा अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धायुक्त संकल्पनांबाबत महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्या त्या काळात समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांनी तर अशुभ समजल्या जाणाऱ्या अमावास्येच्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेक लढाया लढल्या व जिंकल्याही!  त्यांचाही आदर्श राजकारणी विसरत आहेत.

जे उमेदवार मुहूर्त पाहून आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत, ते संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन या  मौलिक मूल्याला पायदळी तुडवत आहेत तसेच संतांचाही अपमान करीत आहेत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत. कर्नाटकातील विवेकवादी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश झारकीहोळी हे  कोणताही मुहूर्त न पाहता मुद्दाम अमावास्येच्या दिवशी अथवा अशुभ मानल्या जाणाऱ्या वेळेत आपला उमेदवारी अर्ज भरतात. स्मशानभूमीतून प्रचार यात्रा सुरू करतात.  असे करून ते  चार वेळा विधानसभेवर निवडून आलेले असून  त्यांनी मंत्रिपदही  भूषविले आहे. खरोखर  त्यांचा  अभिमान वाटतो. मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या  उमेदवारांबद्दल सारासार विवेक वापरून आणि कोणत्याही प्रलोभनाला व  दबावाला बळी न पडता, प्रत्येक मतदाराने  मतदान करावे, असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. 

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राज्य कार्यवाह आहेत)

krishnachandgude@gmail.com

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा