शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

यमकेची बकेट लिस्ट...

By राजा माने | Updated: June 11, 2018 00:16 IST

महागुरू नारदांचा ‘बकेट लिस्ट कळवा’, हा मेसेज वाचून आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज सुखावला होता. आपली बकेट लिस्ट इंद्रदेव पाहणार आणि आपली सगळी स्वप्नं पूर्ण होणार, असा विचार करीत असतानाच नारदांचा दुसरा मेसेज इनबॉक्समध्ये येऊन थडकला...

महागुरू नारदांचा ‘बकेट लिस्ट कळवा’, हा मेसेज वाचून आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज सुखावला होता. आपली बकेट लिस्ट इंद्रदेव पाहणार आणि आपली सगळी स्वप्नं पूर्ण होणार, असा विचार करीत असतानाच नारदांचा दुसरा मेसेज इनबॉक्समध्ये येऊन थडकला... ‘बकेट लिस्टमधील फक्त एकच स्वप्न-इच्छा कळव.’ या मेसेजमुळे मात्र यमके हिरमुसला. केवळ एकच इच्छा कळवायची म्हणजे इतर इच्छांवर पाणी सोडायचे! अखेर त्याने ‘कळीच्या नारदा’प्रमाणे ‘कळीचा सुपरस्टार रिपोर्टर’ बनण्याची इच्छा कळविली. तसा मेसेजही धाडला. मेसेजला उत्तर न देता नारदांनी थेट फोनच केला. रिंगटोन वाजू लागली... नारायणऽ...नारायणऽ...! यमकेने फोन घेतला.नारद : खुळ्या शिष्या! मी तुला तुझी बकेट लिस्ट मागितली नाही. मराठी भूमीतील दिग्गजांची माहिती मागितली आहे.यमके : (गोंधळून जाऊन) बकेट लिस्ट सिनेमाला १० कोटींचा धंदा झालाय. मग माधुरी दीक्षित-नेनेंची बकेट लिस्ट पाठवू?नारद : नेन्यांची सगळी लिस्ट पूर्ण झालेली आहे. आता लिस्टमध्ये नवे ते काय देणार?नारद : अरे, अमितभाई ‘संपर्क से समर्थन’ साठी तिथे गेले होते. बाकी काही नाही. तू मराठी भूमीतील इतर दिग्गजांना भेटून प्रत्येकाची बकेट लिस्ट पाठव. अर्थात...लिस्टमधील एकच इच्छा!यमकेने होकार दिला आणि दिग्गजांच्या भेटीसाठी धावला. सुदैवाने देवेंद्रभाऊ, पृथ्वीराजबाबा, सुशीलकुमार, अशोकराव, अजितदादा, चंद्रकांतदादा, राऊत, विनोदभाऊ, सुभाषबापू, इस्लामपूरचे जयंतराव ही सगळीच मंडळी मंत्रालयाच्या आवारात भेटली. या संधीचा फायदा घेत, यमकेने त्यांना थांबविले आणि लिस्टमधील एक इच्छा सांगण्याची विनंती केली.देवेंद्रभाऊ : रेशीमबागेत पाहिली जाणारी सगळी स्वप्नं सेनेच्या साथीने साकार होवोत.राऊत : स्वतंत्र लढणार...२०१९ ला सेनेचाच झेंडा फडकणार!यमके : इच्छा सांगा राऊतसाहेब...राऊत : स्वतंत्रच लढणार...मोठ्या साहेबांचे स्वप्न तेच माझे स्वप्न...समजून घ्या! (यमके लगेच पृथ्वीराजबाबांकडे वळला)पृथ्वीराजबाबा : हात तंदुरुस्त झाले आहेत. आता अजितदादांच्या साथीने पुन्हा फायलींवर सह्या करण्याची संधी लाभो... (शेजारीच उभे असलेले अशोकराव लगेचच बोलते झाले)अशोकराव : मला तर लोकाश्रय आहे. फायलींवर सह्याची पहिली संधी मलाच लाभो. (यानंतर मात्र हजर असलेला प्रत्येक दिग्गज गडबडीने बोलू लागला)सुशीलकुमार : बुढ्ढी के बाल विकून शाळा शिकलेला मी मुलगा...जनतेने मला भरभरून दिले...आता, सोलापूरकरांनी लोकसभेत धाडावे, एवढेच!चंद्रकांतदादा : देवेंद्रभाऊंनी विश्रांती घेतली तर रेशीमबाग व अमितभाई दाखवतील तेच माझे स्वप्न.विनोदभाऊ : ‘सायलेंट मोड’ लवकर संपवा.अजितदादा : साहेब पाहतील तेच माझे स्वप्न!जयंतराव : अजितदादांचं स्वप्न साकार होवो.सुभाषबापू : मी गरीब, प्रामाणिक माणूस. गडकरीसाहेब पाहतील तेच माझे स्वप्न. (एवढ्यात तिथे नारायणदादा दाखल झाले) नारायणदादा : कोकणाला टाळता काय? सेनेला चारीमुंड्या चित करणे, ही एकच इच्छा! (यमकेने सगळ्यांची बकेट लिस्ट पाठविली व शेवटी एक ता.क. लिहिले...‘कुणाच्या बकेट लिस्टमध्ये असो वा नसो, सर्वांच्या युत्या होणारच!’ ) 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र