शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘धनुष्य’वाल्यांची अ‍ॅलर्जी

By सचिन जवळकोटे | Updated: March 15, 2018 00:17 IST

गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या.

गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या. अनेकांचं वजन अकस्मातपणे घटत चाललेलं. भल्या-भल्यांची नाडी ओळखण्यात माहीर असलेल्या मिलिंदालाही म्हणे या दुखण्याचं मूळ सापडेनासं झालेलं.पाठीमागं हात बांधून विमनस्क अवस्थेत येरझाऱ्या घालणाºया उद्धोंनी हाक मारताच सुरुवातीला रडत-खडत रामदास भाई आले. महाबळेश्वरला साहेबांना कानठळ्या बसताच एका क्षणात भलं-मोठं हॉटेल बंद करताना त्यांनी जो उत्साह दाखविला होता, त्याच्या दहा टक्केही एनर्जी या क्षणी त्यांच्यात कुठं दिसत नव्हता. त्यांच्या पाठोपाठ विस्कटलेली दाढी कुरवाळत एकनाथ भाईही आले. ‘तुम्ही सीएम् व्हाल,’ असा आशीर्वाद मनोहरपंतांनी देऊनही त्यांच्या चेहºयावर म्हणावा तसा आनंद दिसत नव्हता. सुभाषरावही नेहमीच्या गंभीर चेहºयानंच आले. ‘मातोश्री’वरच्या अनेक स्थित्यंतराचा अनुभव गाठीशी असल्यानं त्यांच्या चेहºयावरची रेषाही बदलली नसली तरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, हे कळत होतं.दिवाकररावही पाठीत वाकूनच आत आले. एसटीतल्या खासगीकरणाचा प्लॅन एवढा जड असू शकत नाही, हे माहीत असल्यानं त्यांच्याही दुखण्याचा कुणालाच शोध लागेना. त्यानंतर दीपक डॉक्टरही एखाद्या रुग्णासारखंच थकल्या अवस्थेत आले. सातारी अधिकाºयांना पुरंदरच्या निवासस्थानी बोलावून तेथून परजिल्ह्यावर कंट्रोल करू पाहणारे विजयबापूही केविलवाण्या चेहºयानंच प्रवेशले.या साºयांना वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तपासलं. सारे रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळं या साºयांचं दुखणं समजतच नव्हतं. उद्धोंची घालमेल वाढतच चाललेली. कुणीतरी मांत्रिकाचा उतारा देण्याचा सल्ला दिला. मात्र, नारायणदादांच्या लाल दिव्याचं भविष्य खोटं भरल्यापासून कोकणातले बहुतांश भगत म्हणे गायब झालेले.‘एकीकडं ओरडून ओरडून माझा घसा बसला तरी हरकत नाही; परंतु तुम्ही सारे व्यवस्थित खाऽऽ प्याऽऽ,’ असा सल्ला आपण आपल्या लाल बत्तीवाल्यांना देऊनही हे सारे खराब का होत चाललेत, याचं कोडं काही उद्धोंना सुटत नव्हतं. अनेक राजकीय तज्ज्ञही येऊन हात हालवत परतले. आता मात्र या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली. नितीनराव डोंबिवलीत बोलल्यानंतर जेवढा गदारोळ उडाला, त्याहीपेक्षा जास्त ‘धनुष्यवाल्यांचा अनामिक आजार’ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळं थोरले काका बारामतीकरही गोंधळले. चॅनेलवाल्यांसमोर धनंजय बीडकरांचं नाव घेण्याऐवजी धनंजय कोल्हापूरकरांचा उल्लेख करू लागले.पाहता-पाहता ही बातमी जगभरात पोहोचली. चंद्राबाबूंच्याही कानावर पडली. ते मात्र हळूच हसले. त्यांनी थेट उद्धोंना मोबाईल लावला... अन् या आजारामागचं खरं कारण सांगितलं, ‘गेल्या अनेक महिन्यांपासून तुमचे सारे सरदार खिशात राजीनाम्याचा कागद घेऊन फिरत असल्यानं त्याचं इन्फेक्शन झालंय. एक तर ही बुरशी लागलेली कागदं ताबडतोब कचरा कुंडीत फेकून द्या किंवा देवेंद्रपंतांकडं तरी पाठवा.’

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे