शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रक्तरंजित महिना!

By admin | Updated: December 18, 2014 00:02 IST

मलाला युसूफझाई ही पाकिस्तानची सुकन्या आणि कैलास सत्यार्थी हा जगभरातील दुर्लक्षित चिमुकल्यांचा भारतीय बाप यांना नॉर्वेतील भरगच्च समारंभात शांततेच्या नोबेलनं सन्मानित करण्यात आलं

पवन देशपांडे(लेखक लोकमत मुंबईचे मुख्य उपसंपादक आहेत.)  - मलाला युसूफझाई ही पाकिस्तानची सुकन्या आणि कैलास सत्यार्थी हा जगभरातील दुर्लक्षित चिमुकल्यांचा भारतीय बाप यांना नॉर्वेतील भरगच्च समारंभात शांततेच्या नोबेलनं सन्मानित करण्यात आलं. अगदी त्याच दिवशी म्हणजे ११ डिसेंबरला एका पाहणीतील धक्कादायक वास्तव समोर आलं़ ते होतं एका रक्तरंजित महिन्याचं़ नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या देशांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल ५ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला़ एकाच महिन्यात एवढे बळी जाण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी़ या अहवालाकडे अजूनही फारसे गांभीर्याने पाहिलं जात नाही, हीही एक धक्कादायक बाब आहे़नोबेल सन्मानाला उत्तर देताना आणि जगभरातील दिग्गजांना संबोधित करताना १७ वर्षांच्या शांतिदूत मलालाने विकसित देशांवर गंभीर आरोप केला़ तिनं म्हटलं होतं़, ‘‘मुलांच्या हातात बंदुका देणं सोपं आहे; पण त्यांच्या हाती पुस्तकं सोपवणं कठीण़’’ जे देश शस्त्रास्त्र निर्मिती करून महासत्तेच्या शिखरावर आहेत, त्यांच्यासाठी मलालाचं हे वाक्य बोचरं असावं़ नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये गेलेल्या बळींची संख्या बघता, साऱ्या जगाला यातून धडा घ्यावा लागणार आहे़ बीबीसी या वृत्तवाहिनीने लंडनच्या किंग्ज कॉलेजच्या मदतीने नोव्हेंबर महिन्यातील दहशतवादी हल्ल्यांबाबत सर्वेक्षण केले आहे़ ती आकडेवारी कोणत्याही शांतताप्रिय देशाला धक्कादायक ठरणारी आहे़ या एकाच महिन्यात जगभरात सुमारे ६६४ दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात सैनिक, सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी मिळून ५ हजार ४२ लोकांचे प्राण गेले़ दिवसाला जवळपास १६८ लोकांचा बळी़ म्हणजेच मुंबईवर झालेल्या हल्ल्यात बळी गेलेल्यांएवढी संख्या दररोज अख्खा महिनाभर दहशतवादी हल्ल्यात बळी पडली आहे़ जिहादी संघटनांनी चालवलेल्या या कारवायांमुळे जग अस्थिरतेकडेच नव्हे, तर विनाशाकडे वळत आहे, याचे हे द्योतक आहे़ गेल्या वर्षभरापासून इराक आणि सीरियामध्ये ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घातलेला आहे़ इसिसने इस्लामच्या नावाखाली प्राणाची बाजी लावणाऱ्या हजारो तरुणांची फौज उभी केली़ त्या साऱ्यांना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवले़ त्यांच्याच माध्यमातून या इसिसने इराक आणि सीरियात नोव्हेंबरमध्ये ३०८ हल्ले केले आणि त्यात सुमारे २२०६ जणांचे प्राण घेतले, असे बीबीसीचे सर्वेक्षण सांगते़ (याच काळात अमेरिकेने इसिसचा नायनाट करण्यासाठी हवाई हल्ले चढवले होते, हे उल्लेखनीय.) अल् कायदा या संघटनेनंतर जगभरात इसिसची दहशत पसरत आहे आणि त्यांची पाळेमुळेही घट्ट होताना दिसत आहेत़ अल् कायदा संघटनेच्या मदतीने काम करणाऱ्या जभात-अल-नुसरा या संघटनेनेही इसिसला इराकमध्ये साथ दिली आहे़ जभात-अल-नुसरा या संघटनेने इराकमध्ये २५७ जणांचे बळी घेतले आहेत़ इसिसपाठोपाठ घातक ठरली आहे ती बोको हराम ही नायजेरियन संघटना़ बोको हरामने ८०१ बळी घेतले, तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कारवाया करणाऱ्या तालिबान या संघटनेने १५१ हल्ले चढवत ७२० जणांना ठार मारले आहे़ अल् कायदा या संघटनेने ४१०, अल शबाबने २६६ बळी घेतले आहेत. त्यात आता पेशावरमधील शाळकरी मुलांवरील हल्ल्याची भर पडली आहे.सर्वसामान्यांना टार्गेट करून दहशत पसरवणे आणि देशोदेशीच्या सरकारांना धडा शिकवणे अशी या संघटनांची कूटनीती असल्याचे स्पष्ट दिसते. मग त्यांच्या मार्गात कोणीही आले तरी त्याला जिवंत सोडायचे नाही आणि प्राण गेला तरी मागे हटायचे नाही, अशी शिकवणच त्यांना दिलेली असते. पाहणीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसते की, या एकाच महिन्यात दहशतवाद्यांनी तब्बल २ हजार ७९ लोकांना ठार केले आणि या हल्ल्यांदरम्यान त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या किंवा त्यांचा कट हाणून पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या १ हजार ९५२ जवानांना या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. या दहशतवाद्यांना आत्मघाती हल्ल्यांचे खास ट्रेनिंग असते आणि ते बाहेर पडतात तेच मुळी मृत्यूला मुठीत ठेवून. गेल्या महिन्यात बळी गेलेल्यांमध्ये ९३५ दहशतवादी होते. यावरून वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांची अवाढव्य फौज जगभरात कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यांना रोखणे आता नवे आव्हान आहे. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये शिरून कंठस्रान घातले. त्या वेळी साऱ्यांनाच असे वाटत होते की, आता अल् कायदा आणि त्यासारख्या दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. आता हळू हळू त्यांचा खात्मा होईल; पण परिस्थिती उलट दिसत आहे. दहशतवाद आणखी फोफावत चालला आहे आणि नवनवीन संघटना आणि त्यांच्यासाठी प्राणांची आहुती देणारे तरुण त्यांना बळी पडत आहेत. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या सार्क परिषदेत सर्वच सदस्य देशांनी दहशतवाद मोडून काढण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यात पाकिस्तानही होता. पण पाकिस्तानमध्येच गेल्या अनेक वर्षांपासून अशा दहशतवादी संघटनांना पाठीशी घालण्याची आणि कारवाया करण्यासाठी प्रसंगी मदत करण्याची भूमिका तेथील लष्कर आणि सरकारने ठेवलेली आहे. हे जगापासून लपलेले नाही. भारत कायम दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर राहिला आहे. काश्मीर तर दहशतवादी कारवायांनी सतत धुमसत आहे. कल्याणचा एक तरुण इराकमध्ये जाऊन इसिसमध्ये सहभागी होऊन परतला. आणखी ३९ तरुण अजूनही तिथे इसिससाठी लढत असल्याची शंका आहे. भारताने या साऱ्या घटनांकडे पाहून सतर्क व्हायला हवे.