शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रात परिवर्तन शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 06:56 IST

स्वत:च्या भविष्यासाठी अभ्यासक्रमाची निवड करून तेथे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ज्या तणावातून जावे लागते तो टाळता येऊ शकतो. प्रवेशासाठी पुरेसे मार्क मिळणे, योग्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आणि तो अभ्यासक्रम परवडणारा असणे हे विद्यार्थ्याला बघावे लागते. त्यात काहींना यश मिळते आणि मनाजोगत्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळतो तर काहींना मात्र जो मिळेल तो अभ्यासक्रम ...

स्वत:च्या भविष्यासाठी अभ्यासक्रमाची निवड करून तेथे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ज्या तणावातून जावे लागते तो टाळता येऊ शकतो. प्रवेशासाठी पुरेसे मार्क मिळणे, योग्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आणि तो अभ्यासक्रम परवडणारा असणे हे विद्यार्थ्याला बघावे लागते. त्यात काहींना यश मिळते आणि मनाजोगत्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळतो तर काहींना मात्र जो मिळेल तो अभ्यासक्रम आणि मिळेल ते कॉलेज यात समाधान मानावे लागते. काहींना मात्र पैशाच्या अभावामुळे स्वत:च्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते.

जे विद्यार्थी कॉलेजात प्रवेश घेतात, त्यापैकी काहींना प्राध्यापकांची लेक्चर्स कंटाळवाणी वाटतात. आपण चुकीच्या ठिकाणी आलो असे वाटते. तर काहीजण प्राध्यापकांची अर्थशून्य बडबड ऐकत राहतात, परीक्षा उत्तीर्ण होतात आणि पदविका किंवा पदवी प्राप्त करून नव्या जगाला सामोरे जातात, तसेच मिळणाऱ्या चौकटीत स्वत:ला बसविण्याचा प्रयत्न करतात. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सोपा नसतो. काही कॉलेजेस विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे परत करण्यास चालढकल करतात तर काही कॉलेजेस पूर्ण न केलेल्या वर्षाची फी जमा करण्याचा आग्रह धरतात.

कॉलेजात इंग्रजीतून विषय शिकविले जातील हे मान्य केलेले असते. पण प्रत्यक्षात स्थानिक भाषेतूनच शिकविले जाते. चांगले कॅन्टीन, क्रीडाविषयक चांगल्या सोयी आणि मूलभूत गोष्टींचाही अनेक ठिकाणी अभाव असतो. क्लासरूममध्ये जे शिकविले जाते त्याने समाधान न झालेले विद्यार्थी अखेर शिकवणीवर्गांकडे वळतात. चांगल्या प्रयोगशाळांचा अभाव, चांगल्या प्राध्यापकांची कमतरता, यातून शिक्षणाचा दर्जा घसरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थी बाजारातून प्रोजेक्टस विकत घेऊन सादर करतात आणि काही शिक्षणसंस्था त्यांच्या आधारे बनावट प्रमाणपत्रेही देतात. विद्यार्थ्यांना नोकरी देणाºया व्यक्तीही अलीकडे अशा प्रमाणपत्रावर विश्वास ठेवत नाहीत. एकूणच विद्यार्थ्यांच्या सतत परीक्षा घेतल्या जातात. त्यातून विद्यार्थ्यांजवळ प्रमाणपत्रे जमतात. प्रत्येक विद्यालय, महाविद्यालय, विद्यापीठ, शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना अधिकारपत्रे देत असते. पण त्यांची विश्वसनीयता हाच कळीचा मुद्दा असतो. अभ्यासातून विद्यार्थ्यांनी कोणते ज्ञान मिळविले याला गौण स्थान असते. उलट प्रमाणपत्रालाच जास्त महत्त्व प्राप्त होते. विद्यापीठातून ज्यातºहेचे ज्ञान विद्यार्थ्याला मिळायला हवे असते, तसे ते मिळाले नाही म्हणून तो विद्यार्थी विद्यापीठाला न्यायालयात खेचू शकतो का? विद्यार्थ्याला फी देणेच परवडत नसते तेथे तो वकिलाची फी कशी देऊ शकेल? ब्लॉकचेनमुळे हे प्रश्न सुटणार नाही. पण ब्लॉकचेन तंत्रज्ञान आता आवश्यक झाले आहे. ते केवळ बिटकॉईनमध्ये नाही तर अन्य सेवांमध्ये तसेच अन्यत्रही उपलब्ध आहे. पण त्यामुळे प्रश्न सुटू शकतील का? तांत्रिक दृष्टीने ब्लॉकचेन हा डाटाबेस असतो. जो अनेक संगणकांपर्यंत पसरलेला असतो. त्याचे काम प्रशासनास हातभार लावणे हे असते. प्रत्येक ब्लॉक हा पारदर्शक असतो तसेच मजबूत असतो. व्यवहाराची नोंद करण्यासाठी त्यात वेळेची नोंद केलेली असते. त्यातील नोंदी कायम टिकणाºया असतात. तिसºया व्यक्तीवर विसंबून राहण्यापेक्षा कुणाशीही संघर्ष न येता त्याच्यामार्फत व्यवहार करता येतात. एकूणच मध्यस्थाची गरज राहात नाही. प्रत्येक व्यवहारांची वेळ, तारीख आणि अन्य तपशिलासह नोंद केली जाते. तसेच स्मार्ट यंत्रणेमार्फत त्याची तपासणीही होते. व्यवहार हाताळण्याची ही पद्धत अधिक कार्यक्षम, अधिक सुरक्षित आणि अधिक पारदर्शक आहे. त्यामुळे प्रशासन, नोकरशाही, श्रम आणि वेळ यांची मोठी बचत होईल.

ब्लॉकचेनमुळे कॉलेजात न झालेल्या लेक्चर्सच्या नोंदी होतील आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांना पैसे द्यावे लागणार नाही. त्यामुळे विद्यापीठेही प्रामाणिकपणे काम करू लागतील. अशा सेवा देणाºया ई-गव्हर्नन्सचा प्लॅटफॉर्म हा ब्लॉकचेनचा भाग बनू शकेल. त्यामुळे कुणी दिलेली अभिवचनेही पाळली गेली की नाही हेही तपासून पाहता येईल आणि त्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना त्याची किंमतही चुकवावी लागेल. ब्लॉकचेनमुळे न पाळलेल्या अभिवचनांसाठी होणारा दंड विद्यार्थ्यांच्या खात्यात आपोआप जमा होईल. पण अशा बदलासाठी आपण तयार आहोत का? ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे प्रत्येक शिक्षणसंस्थेला लागू होऊ शकेल. त्यामुळे संस्थांकडून दिल्या जाणाºया प्रमाणपत्रांची विश्वासार्हता वाढेल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिक्षणाचा पुरावा उपलब्ध होऊ शकेल. ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे त्यांना सिस्टीम जनरेटेड डिसेन्ट्रलाईज्ड क्लिअरिंग नंबर मिळेल.

एम.ओ.ओ.सी.सारख्या अभ्यासक्रमांकाकडून मिळणाºया क्रेडिटची अपेक्षा काही संस्था करीत आहेत. प्रिन्स्टन विद्यापीठात बिटकॉईन आणि ब्लॉकचेनसोबत एम.ओ.ओ.सी. मिळते पण तेथे प्राध्यापकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधता येत नाही. तरीही लोक एम.ओ.ओ.सी. घेत आहेत. अशाप्रकारे विद्यादानाचे स्वरूपच बदलण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठांनासुद्धा फेरविचार करणे भाग पडते आहे. त्यांच्यापासून प्रमाणपत्र मिळणे हा एक वेगळाच विषय आहे. प्रत्येक एम.ओ.ओ.सी. स्वत:चे वेगळे प्रमाणत्र देत असते. एम.ओ.ओ.सी.चा पुरवठा करणाºयांकडून जर करार करण्यात आला तर एम.ओ.ओ.सी.ची मागणी वाढू शकेल. त्यामुळे प्रत्यक्ष पदवी प्राप्त करण्यापूर्वी एम.ओ.ओ.सी.च्या प्रमाणपत्राचीही गरज भासू शकेल. एम.ओ.ओ.सी. च्या माध्यमातून विकेंद्रीकरण होत असल्याने आयोजकांना त्याची गरज भासणार आहे. याशिवाय कॉन्फरन्सेसना हजेरी लावल्याची माहिती सी.पी.डी. (कन्टीन्यूड प्रोफेशनल डेव्हलपमेंट)मार्फत मिळणार आहे. तसेच संभाव्य एम्प्लॉयर्सना शिक्षणाच्या अनेक प्रकारांची माहिती उपलब्ध होऊ शकेल.अशातºहेने ब्लॉकचेनचा वापर अनेक क्षेत्रापासून मिळणाºया शैक्षणिक अनुभवांसाठी करता येऊ शकेल. त्यासाठी गरज आहे ती लहानशा ट्रॅन्झॅक्शन मॉडेलची. हे मॉडेल एपीआयसारखे असते जे शैक्षणिक अनुभवाचे पुरावे साठवून ठेवते. ही माहिती लर्निंग रेकॉर्ड स्टोअरमध्ये साठविण्यात येते. ब्लॉकचेनचा उपयोग करण्यासाठी हा नैसर्गिक मार्ग समजला जातो. हे तंत्रज्ञान असे आहे ज्याचा वापर शिक्षण क्षेत्रातील संस्थांना, व्यक्तींना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर करता येईल. ते शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे, एम.ओ.ओ.सी., सी.पी.डी., कॉर्पोरेटसह, अप्रेन्टीसशिप आणि मूलभूत ज्ञानासाठी उपयुक्त असेल. सध्या दिवसागणिक शिक्षण क्षेत्राची अवस्था खालावते आहे. विद्यापीठांनी नवीन काही करावे यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे. आजच्या बदलत्या शैक्षणिक वातावरणाशी मिळता जुळता चेहरा विद्यापीठांनी धारण करावा अशी विद्यापीठाशी संबंधित असणाºया मुखंडांनी आजच्या युगातील डिजिटल साक्षर विद्यार्थ्यांच्या आणि आजच्या युगातील उद्योजकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी स्वत:ला सक्षम करण्याची गरज आहे, असे वाटत नाही का?डॉ. एस.एस. मंठा(लेखक एआयसीटीईचे माजी चेअरमन आणि एनआयएएस बंगळुरूचे एडीजे. प्रोफेसर आहेत)

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र