शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 7:57 PM

भाजपा सरकारप्रमाणेच पक्षाला उतरती कळा; आमदारांप्रमाणेच बहुतांश कार्यकर्ते नाराज

- राजू नायककोविड कळात गोव्यातील परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही, उलट कोविड बाधितांचा उद्रेक होऊ दिला व त्यात अनेक बळी गेले याबद्दल प्रमोद सावंत सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागतेय.गेल्या चार महिन्यांतील या सरकारचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. त्याची झळ जनतेला बसली. बुधवारी या सरकारने दुसरा लॉकडाऊन जाहीर केला तर तोही लोकांना धक्का होता, कारण कालपर्यंत आणखी लॉकडाऊन नाही, असेच मुख्यमंत्री म्हणत होते. मांगोरहिल जेथे उद्रेक घडला त्या वास्को शहरातील नागरिक लॉकडाऊन करा, असे सांगत असूनही मुख्यमंत्री त्यांचे ऐकत नव्हते आणि काल अचानक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु तो करताना आचारसंहिता जाहीर केलेली नाही; परिणामी गुरुवारी (16 जुलै) सकाळपासून लोकांनी जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. सरकारी विश्वासार्हतेलाही लागलेला हा डाग आहे.अचानक तीन दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ व शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यामागे राजकीय निर्णय आहे असे म्हणतात. मागच्या तीन महिन्यांत सरकारची विश्वासार्हता तळाला पोहोचली आहे. केवळ दोन प्रशासकीय अधिकारी निर्णय घेतात, असा जनतेचा समज झाला आहे. या अधिका-यांना ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नाही. त्यामुळे जेथे कण्टेनमेण्ट झोन जाहीर केले तेथे जनतेचे हाल झाले आहेत. लोक सतत आंदोलन करू लागले आहेत. कारण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत झालेला नाही.दुसरे दोन मंत्री वगळता इतर मंत्रिमंडळ सदस्य यांचे काहीच अस्तित्व नाही. जेथे मलिदा आहे, तेथेच मंत्री व आमदार काम करतात असा आरोप होतो. खनिजाच्या खाणी चालू आहे, सरकारच्या मर्जीतील फार्मा उद्योग व जमीन रूपांतरे चालू आहेत, अशी टीका होते. लोह खनिजाला सरकारने मुक्तद्वार दिले आहे, त्यामुळे पावसाळ्यातही पहिल्यांदा हा उद्योग चालू राहिला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत खाण व्यवसायात असल्याने त्यांना काही उद्योगांना उपकृत करायचे आहे, अशी टीका झाली आहे. पर्यटनालाही त्यांनी या काळात मान्यता दिल्याबद्दल लोक नाखुश आहेत.या काळात भाजपा सरकारप्रमाणेच पक्षाला उतरती कळा लागली आहे. आमदारांप्रमाणेच बहुतांश कार्यकर्ते नाराज आहेत. या पक्षाची येत्या निवडणुकीत शाश्वती नाही, असे लोक समाजमाध्यमांमध्ये बोलू लागले आहेत. त्यामुळे पक्षाची कोअर कमिटी अस्वस्थ बनली असून मुख्यमंत्र्यांवर संघटनेचा दबाव वाढू लागला आहे. नजीकच्या काळात नेतृत्वबदलाची मागणी होऊ शकते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक  यांचे पर्यायी नेते म्हणून नाव घेतले जाते.भाजपाला जनाधार नसतानाही त्या पक्षाने त्यांचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली २०१७ साली सरकार घडविले होते. पर्रीकरांच्या शेवटच्या काळात ते सत्तेला चिकटून राहिल्याने जनतेत रागाची भावना निर्माण होत गेली. परंतु त्यानंतर प्रमोद सावंत यांना नेतेपद मिळाले आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्थैर्य प्राप्त करण्यासाठी कॉँग्रेस पक्षाला भगदाड पाडले व त्यानंतर कोविडची परिस्थिती हाताळली यामुळे लोक नाराज आहेत. सरकारने गेल्या दोन वर्षात पाच हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. गोव्यावर अजूनपर्यंत २० हजार ५०० कोटींच कर्ज साचले आहे. सावंत यांना अर्थव्यवस्थेला दिशा देण्यातही अपयश आल्याने व ते केवळ खाण उद्योगांच्या दबावात असल्याने खाणींच्या लिजांचा लिलाव होऊ देत नसल्याची टीका होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंतManohar Parrikarमनोहर पर्रीकर