शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

भाजपा प्रवक्त्यांची राफेलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:03 PM

राफेलप्रकरणावरुन कॉंग्रेसने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले आहे

मिलिंद कुलकर्णीराफेलप्रकरणावरुन कॉंग्रेसने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले आहे. गावपातळीपासून तर संसदेपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासह स्थानिक नेते नवनवीन आरोपांचे बाण सोडत आहे. पहिल्यांदाच भाजपा आणि पंतप्रधान मोदी याविषयावर अडचणीत आल्याचे आणि काहीसे गोंधळात असल्याचे जाणवत आहे. अगदी ९५ मिनिटांच्या दूरचित्रवाहिनीवरील अलिकडील मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी यासंबंधी स्वत:वरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे आरोप सरकारवर आहेत, माझ्यावर नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यासोबतच संरक्षणसामग्री खरेदीविषयी वाद का उपस्थित केला जातो, असा सवाल करीत याचा लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळात पावणे पाच वर्षात प्रथमच असा वादंग घडतो आहे.कॉंग्रेसने जिल्हा पातळीवर राफेलप्रकरणी निदर्शने आणि जिल्हा प्रभारींच्या पत्रकार परिषदा घेऊन भाजपा सरकारवर तोफ डागली. काँग्रेसच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेदेखील प्रदेश प्रवक्त्यांचे राज्यभर दौरे आयोजित केले. जळगावात केशव उपाध्ये तर नंदुरबारात अतुल शहा येऊन गेले. या दोघांनी राफेलप्रकरणी सरकार व भाजपाची भूमिका जोरकसपणे मांडली. परंतु, कॉंग्रेस आणि भाजपाच्या पत्रकार परिषदांमध्ये फरक एवढाच होता की, काँग्रेसचे प्रभारी नेते राफेलशिवाय अन्य विषयांवरदेखील बोलले. पण भाजपाच्या प्रवक्त्यांनी मात्र राफेलशिवाय कोणत्याही विषयावर बोलायला चक्क नकार होता. ही पत्रकार परिषदच मुळी राफेलविषयावर बोलावली आहे, त्यामुळे अन्य विषयांवर प्रश्न विचारु नये, असे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले.राफेल, अनिल अंबानी, एचएएल, डसाल्ट हे शब्द सहा महिन्यांपासून प्रत्येकाला परिचित झाले असले तरी ‘गैरव्यवहार’ एवढेच सामान्य माणसाला कळते. बाकी करार, किंमती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा अशा तपशीलात तो फारसा जात नाही. त्यामुळे जिल्हा पातळीवर झालेल्या काँग्रेसचे आंदोलन असो की, दोन्ही पक्षाच्या पत्रकार परिषदा, त्याविषयी फारशी उत्सुकता प्रसार माध्यमे आणि सामान्य माणसामध्ये दिसून आली नाही.मात्र यातून राजकीय पक्षांचा अट्टाहास आणि हतबलता दिसून आली. लोकसभा निवडणुका पाच महिन्यांवर आल्या असताना आणि सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसमधील घडामोडींना वेग आलेला असताना सामान्य माणूस आणि प्रसारमाध्यमांना त्यात रस असणे स्वाभाविक आहे. पण आम्ही तुम्हाला जे हवे त्याविषयी काहीही बोलणार नाही, आम्ही सांगतो, तेवढेच ऐका आणि छापा हा झाला अट्टाहास. राफेलविषयी पक्षीय निवेदन झाल्यानंतर कोणत्याही पत्रकाराने प्रश्न विचारला नाही, यावरुन मुरब्बी राजकीय नेत्यांना वास्तविकता लक्षात आली असेल. पण पक्षाच्या आदेशापुढे काही चालत नसल्याची हतबलता त्यांच्या देहबोलीवरुन दिसून येत होती. पक्षाने सांगितले म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली. आम्हाला सोपविलेली जबाबदारी पार पडली, असेच एकंदर चित्र होते.काँग्रेसच्या डॉ.हेमलता पाटील, भाजपाचे केशव उपाध्ये,अतुल शहा यांच्यासारखे अभ्यासू, व्यासंगी नेत्यांची एकप्रकारे ही कोंडी होती, पण त्यांनी पक्षादेशाला सर्वोच्च मानले.बोफोर्सवरुन भाजपासह अन्य विरोधकांनी उठविलेले रान काँग्रेस नेत्यांना आठवत असेल, त्याची परतफेड आता राफेलच्या मुद्यावरुन केली जात आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून किती अपरिहार्यता असते, याचा अनुभव भाजपा नेते घेत आहे. एरवी सगळ्या विषयांवर मनसोक्त संवाद साधणारे प्रवक्ते यावेळी मात्र ‘अळीमिळी, गुपचिळी’सारखे दिसले. भाजपामध्ये गेल्या पावणे पाच वर्षात ही नवीन संस्कृती उदयाला आली आहे. अर्थात तिचे मूळ रा.स्व.संघात आहे. आदेशाशिवाय काहीही बोलायचे नाही. कृती करायची नाही. प्रसिध्दीपासून दूर राहणाऱ्या संघ कार्यकर्त्यांना भाजपामध्ये आल्यावर हायसे वाटायचे. बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटायचे.पण अलिकडे भाजपामध्येदेखील ते वातावरण तयार होऊ लागले आहे, या विषयावरुन स्पष्ट झाले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव